मायोकार्डायटीस काय आहे?
हृदयाच्या स्नायूंना ज्यांना, मायोकार्डियम असेही म्हणतात त्यांना सूज आल्यास, त्याला मायोकार्डायटीस म्हणतात. इतर हृदय रोगा प्रमाणे, या रोगाला जीवनशैली कारणीभूत ठरत नाही. मायोकार्डायटीस ला प्रतिबंध करण्यासाठी अजूनपर्यंत कोणताही पर्याय उपलब्द्ध नाही आहे. काही केसेस मध्ये, मायोकार्डायटीस झालेली व्यक्ती काहीही गुंतागुंत न होता ठीक होतात, पण दुर्मिळ केसेस मध्ये, हृदयाला हानी पोहोचू शकते. तरीही, हा गंभीर दाह झालेल्या केसेस मध्ये येतो.
याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
संसर्ग झाल्याच्या एक ते दोन आठवड्यानंतर खालील लक्षणे दिसू शकते:
- व्यायाम झाल्यावर किंवा भरपूर काम केल्यावर श्वास घ्यायला त्रास होणे.
- छातीत कडकपणा वाटणे आणि दाटल्यासारखा वेदना होणे आणि पूढे त्या पूर्ण शरीरात पसरणे.
- आराम करत असताना श्वास घ्यायला त्रास होणे.
- अनियमित हृदयाची हालचाल (आणखी वाचा: टचींकार्डीया चे कारणे).
- पायामध्ये सूज येणे.
- फ्लू - सारखे लक्षणे, उदा., थकवा, कंटाळा आणि ताप.
- अचानक शुद्ध हरपणे.
याचे मूख्य कारणे काय आहेत?
कधीकधी मायोकार्डायटीस ची कारणे अज्ञात असतात, माहित असलेली कारणे खालील प्रमाणे आहेत:
- सामान्य कारणे: विषाणू, उदा., वरच्या श्वसन मार्गाच्या संसर्गा साठी विषाणू कारणीभूत असतात.
- कमी सामान्य कारणे: लाईम रोगासारखे संसर्गजन्य रोग.
- दुर्मिळ कारणे: कोकेन चे सेवन करणे, विषारी घटकाच्या प्रभावाने जसे सापाच्या चावण्याने, कोळ्याच्या चावण्याने, आणि धातुचे विष.
याचे निदान आणि उपचार कसे करतात?
बऱ्याच केसेस मध्ये, मायोकार्डायटीस कोणतीही लक्षणे दाखवत नाही आणि निदान न होता तसेच राहते. तरीही, जर एखादी व्यक्ती मायोकार्डायटीस ची लक्षणे अनुभवत असेल, तर निदान करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करतात:
- इलेकट्रोकार्डिओग्राम: हृदयाच्या इलेकट्रिक क्रियेचा अभ्यास.
- इकोकार्डिओग्राम: तुमच्या हृदयाची इमेज बनवणे आणि रक्त प्रवाहाचे निरीक्षण करणे.
- छातीचा एक्स-रे: हृदय आणि फुफुसाच्या रचनेत काही बदल झाला का याचा अभ्यास करणे.
- कार्डियाक मग्नेटिक रेजोनान्स इमेजिंग(एम आर आय): तुमच्या हृदयाच्या इमेज चे निरीक्षण करणे.
- हृदयाची बायोप्सी: निदानाची खात्री करण्यासाठी कधीकधी करतात.
मायोकार्डायटीस साठी खालील उपचार पद्धती असू शकतात:
- हृदय फेल्युअर साठी वापरण्यात येणारी औषधे.
- कमी मीठ असलेला आहार.
- आराम.
- दाह कमी करण्यासाठी स्टेरॉईड्स.
- मायोकार्डिटीस झालेल्या व्यक्तीला मानसिक आधारासाठी कौन्सलिंग उपयोगी पडते.