खूप वेळा, अंडाशयांतील वळू काही महिन्यांत उपचाराशिवाय सुद्धा विरघळतात. अधिकतर प्रकरणांमध्ये, कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
उपचाराची गरज यावर आधारित असते:
- अंडाशयातील वळूचे आकार
- वळूची दिसत असलेली लक्षणे.
- स्त्रीला रजोनिवृत्ती झाली आहे का नाही.
काही वेळ अंडाशयातील वळूची पाहणी करणें
अधिकतर प्रकरणांमध्ये, डॉक्टर तुम्हाला सल्ला देईल की तुम्हाला कोणतेही उपचार तात्काळ दिले जाणार नाही, पण वैद्यकीय चाचण्या उदा. अल्ट्रासाउंड, केल्या जातील, जेणेकरून माहीत पडेल की वळू बरा होत आहे की नाही. रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रियांना कमीत कमी वर्षभर दर चार महिने अल्ट्रासाउंड करून घ्यावे लागते, कारण त्यांना अंडाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. अल्ट्रासाउंडमध्ये वळू नसल्याचे दिसून आल्यास, पुढील उपचाराची गरज पडत नाही.
औषधोपचार
डॉक्टर अंडांचे उत्सर्ग थांबवण्यासाठी हार्मोन असलेली औषधे (गर्भनिरोधक गोळ्या) लिहून देऊ शकतात. याने कोणतेही कार्यात्मक वळू बनणें टळते.
शस्त्रक्रिया
दाह किंवा सूजसारखी लक्षणे दिसून येणारे मोठ्या आकाराचे वळू शस्त्रक्रियेने काढण्याची गरज पडू शकते. ही शस्त्रक्रिया दोन पद्धतींनी केली जाते:
- लॅप्रोस्कोपी
अशी शस्त्रक्रिया कर्करोगजनक नसलेल्या लहान वळूंवर केली जाते. यामध्ये, डॉक्टर बेंबीजवळ एक छोटे चीर लावून त्यामधून घुसवलेल्या उपकरणाद्वारे वळू काढतात.
- लॅपरोटॉमी
आकाराने मोठे किंवा कर्करोगजनक असू शकणारे वळू काढण्यासाठी ही शस्त्रक्रियात्मक पद्धत आहे. या शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरांना वळू काढून ते पुढील चाचणीसाठी पाठवणे सोपे जाते. वळू कर्करोगजनक असल्याचे निर्धारित झाल्यास, एखादे कर्करोगतज्ञ पुढील उपचार करतील. तीव्रतेप्रमाणे, अंडाशय काढूनही टाकावे लागू शकते.
शस्त्रक्रियेनंतर, तुम्हाला पोटाच्या भागातील थोडी गैरसोय जाणवू शकते. तरी, शस्त्रक्रियेमुळे होणारी वेदना काही दिवसांमधील बरी होते. लॅपरोस्कोपीसाठी पुनर्लाभाचा वेळ दोन आठवडे, तर लॅपरोक्टॉमीसाठी आठ आठवडेही असू शकतो.
शस्त्रक्रियेनंतर, खालीलपैकी कोणतेही लक्षण असल्यास ते संक्रमणाचे सूचक असून, लगेच त्याची सूचना दिली पाहिजे:
- शस्त्रक्रिया झालेल्या भागातून रक्तस्त्राव
- पोटामध्ये तीव्र वेदना
- शस्त्रक्रिया झालेल्या भागात सूज
- ताप
- योनीमधून असाधारण गळती.
जीवनशैली व्यवस्थापन
अंडाशयातील वळूंना हाताळण्यात काही पावले उचललेले खूप मदतीचे ठरू शकते. यामध्ये आरोग्य व्यवस्थापनाचे भाग म्हणून खालील गोष्टींचा समावेश आहे:
- धूम्रपान सोडणें
संशोधनांअंती दिसून आले आहे की, धूम्रपान करणार्र्या महिलांना वळू बनण्याचा अधिक धोका असतो. म्हणून, अनाठायी धूम्रपान आणि मद्यपान कोणत्याही परिस्थितीत टाळलेच पाहिजे.
- कॅफीन घेणें कमी करणें
कॅफीन अंडाशयातील वळूंच्या निर्मितीसाठी संप्रेरक म्हणून कार्य करते. म्हणून, तिचे सेवन मर्यादेतच केले पाहिजे.
- साखर घेण्यावर आळा घालणें
अतिरिक्त साखर घेतल्यास दाह आणि सूज होऊ शकते. साखर आणि परिष्कृत कार्बोदकांचे इतर स्त्रोतसुद्धा, आधीच वळूचा त्रास असल्यास, वेदनेत भर घालतात. म्हणून साखर घेण्यावर नियंत्रण हवे. प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे सेवनही टाळले पाहिजे.
- एस्ट्रोजेन ग्रहण कमी करणें
सोया आणि फूड एडिटिव्हसारख्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात एस्ट्रोजन आणि झेनोएस्ट्रोजन असतात. शरिरात अत्यधिक एस्ट्रोजन असल्याने हार्मोनसंबंधी असमतोल होऊन, वळू बनू शकतात.
- स्टेरॉय्डचे औषधोपचार टाळणें
स्टेरॉय्डचे औषधोपचार हार्मोनसंबंधी असमतोलास कारणीभूत असतात, ज्यामुळे वळू बनण्यास सुरवात होते, आणि म्हणून टाळले पाहिजे. वेदनेत आराम होण्यासाठी, नियमित वेदनाशामकांएवजी पॅरासिटमॉल घेतले पाहिजे.
- संतुलित आहार घेणें
तुम्हाला आधीच वळूचा त्रास असल्यास, निरोगी व संतुलित आहार घेण्याची विशेष खबरदारी घ्यायला हवी. आहारामध्ये, वळू परत बनणें टाळण्याकरिता, फळे, भाज्या आणि डाळींचा समावेश हवा. या पदार्थांमध्ये प्रचुर मात्रेत फायबर असते, जे नैसर्गिकरीत्या वळू बरे होण्यास व त्यांचे पुनरावर्तन टाळण्यासही मदत करते.
- व्यायामाची सवय करणें
योगासने आणि इतर व्यायाम न केवळ वळू, तर ऋतुचक्राच्या वेळी गैरसोयामध्ये उदा. रजोस्रावातील वेदना आणि पोटात व पाठीत कळा येणें, ही फायदेशीर असतात. नियमित व्यायाम केल्याने तणाव घटते आणि शरिरातील रक्तसंचार वाढवतात, ज्यांमुळे अंडाशयातील वळू कमी करण्यावर सकारात्मक प्रभाव पडतो.
- ऋतुचक्रादरम्यान आरामदायक कपडे घालणें
रजोस्रावादरम्यान घट्ट कपडे घातल्यास घातल्यास पोटावर दाब पडून वेदनेला संप्रेरणा मिळते. म्हणून, आरामदायक व सैल कपडे घालावेत.
- भरपूर पाणी पिणें
दिवसातून 7-8 ग्लास पाणी पिल्याने शरिरातील विषारी पदार्थ निघून जाऊन, दाहही कमी होतो. म्हणून, स्वतःला पाण्याचा भरपूर पुरवठा करावा.
- शिथिलाकरणाच्या पद्धतींचे सराव करा.
तणाव आणि काळजीचे आरोग्यावर विपरीत परिणाम होते व त्यामुळे हार्मोनमधील असमतोल वाढवण्यास वाव असतो. तणाव कार्यात्मक वळूंचेही एक सामान्य कारण आहे. म्हणून, शिथिलीकरण पद्धती उदा. दीर्घ श्वास घेणें, ध्यान, व्यायाम किंवा थेरपी घेतल्यास, मन आणि शरीर संतुलित स्थितीत परत जाऊ शकते.