पॅजेट रोग काय आहे?
पॅजेट रोग ही एक वैद्यकीय अवस्था आहे ज्यात आनुवांशिक उत्परिवर्तन (म्युटेशन) झाल्यामुळे दोषपूर्ण हाडे तयार होतात. असंतुलित हाडांच्या पुनर्निर्मितीमुळे, सांगाड्यामध्ये (स्केलेटन) असामान्य हाडे बनतात. या रोगात, नवीन हाडं अशक्त आणि ठिसूळ असतात. ऑस्टियोपोरोसिसनंतर, हा दुसरा सर्वात सामान्य हाडांचा चयापचय विकार (मेटाबोलिझम डिसऑर्डर) आहे. जेव्हा ही हाडे फ्रॅक्चर होतात तेव्हा हाडांच्या नूतनीकरणाच्या प्रक्रियेतील दोषांमुळे या स्थितीने पीडित व्यक्तीला बरे होण्यासाठी जास्त वेळ लागतो. पाय, डोक्याची कवटी (स्कल), श्रोणि (पेल्व्हिक) आणि पाठीचा कण्यामध्ये हे सर्वसाधारणपणे पाहिले जाते.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
याची सामान्य चिन्हे आणि लक्षणे ही आहेत:
- हाड किंवा सांध्यांमध्ये वेदना.
- त्वचेचा लालसरपणा.
- कोमलता.
- हाडे किंवा सांध्यांमध्ये सूज.
- हाडाचे फ्रॅक्चर.
- असाधारण मोठी हाडं.
- कार्टिलेजचे नुकसान.
- सांधे किंवा हाडांमध्ये कडकपणा.
- शरीराच्या हालचाली किंवा संवेदना कमी होणे कारण हाडे वाढल्यामुळे नर्व संकुचित होतात.
- पोटदुखी.
- बद्धकोष्ठता.
- अशक्तपणा.
- थकवा.
- भूक न लागणे.
याची मुख्य कारणं काय आहेत ?
याचे अचूक कारण अद्याप अज्ञात असले तरी, असे मानले जाते की खाली वर्णित कारणांमुळे हे होऊ शकते :
- ऑस्टियोक्लास्ट्सजुनीुन हाडे शोषून घेणाऱ्या पेशी) आणि ऑस्टियोब्लास्ट्स (नवीन हाडे तयार करणाऱ्या पेशी) असामान्यपणे कार्य करतात.
- रुबेला व्हायरसमुळे हाडांच्या पेशींमध्ये कसल्यातरी प्रकारचा संसर्ग.
- अनुवंशिकता सुद्धा एक कारण आहे ज्यात परिस्थिती कुटुंबामध्ये पिढ्यानपिढ्या दिसून येते.
- वय हे देखील एक महत्त्वपूर्ण घटक आहे कारण 40 वर्षांखालील व्यक्तींमध्ये हा क्वचितच दिसतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
विविध प्रकारच्या पद्धतींद्वारे याचे निदान केले जाऊ शकते जसे की:
- शारीरिक तपासणी
हे हाडाच्या आकारामध्ये कोणत्याही प्रकारच्या विसंगती शोधण्यात मदत करते. - रक्त तपासणी
रक्तातील फॉस्फेट्सचे अस्तित्व हे पॅजेट रोगाचे सूचक आहे. - एक्स-रे
हे रोगाची पुष्टी करते आणि फ्रॅक्चर आणि हाडांची कमी घनता (लो बोन डेन्सीटी) ओळखण्यात देखील मदत करते.
जरी पूर्णपणे बरे होणे अशक्य असले तरी उपचार हाडांचे उलटणे मंद करू शकतात आणि रोगाचा प्रभाव नियंत्रित करू शकतात. उपचार हे आहेतः
- पॅजेट रोगामुळे हाडे गंभीररीत्या फ्रॅक्चर झाली असतील किंवा नुकसान झाले असेल किंवा त्यांमध्ये विकृती असल्यास, शस्त्रक्रिया हा उपचाराचा पर्याय आहे.
- अँटी-इंफ्लेमेटरी औषधे.
- ॲनलजेसिक्स (वेदना मुक्त करणारे).
- बायस्फोस्फोनेट औषधे जे ऑस्टियोक्लास्ट्सच्या कार्यात अडथळा आणतात.