वेदना काय आहेत?
वेदना एक अप्रिय शारीरिक संवेदना किंवा मानसिक भावना (इमोशनल फिलिंग) आहे जी कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही स्थानापासून उद्भवू शकते. वेदनेची संकल्पना वैयक्तीक आहे आणि वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळी असते. शारीरिक वेदना या लहान वेदनेपासून धडधडणाऱ्या गंभीर वेदना असू शकतात आणि त्या अल्पकालीन किंवा दीर्घकालीन असू शकतात. तुम्ही वेदनेची पुनरावृत्ती अनुभवू शकता किंवा ही तात्पुरती संवेदना असू शकते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
वेदना या स्वतःच कुठल्यातरी स्थितीचे लक्षण आहे. लक्षणे जी वेदनेशी मोठ्या प्रमाणात संबंधित असतात ती आहेत:
- अस्वस्थता.
- उत्तेजना.
- खिन्न वेदना.
- धडधडणाऱ्या आणि स्पंदनासारख्या संवेदना.
- कळा येणे.
- सामान्य क्रिया करण्यास असमर्थता.
- एकाग्रतेची कमतरता.
याची मुख्य कारणं काय आहेत?
तुम्हाला पुढील स्थितींमुळे वेदनेचा अनुभव येऊ शकतो :
- टिश्यूला दुखापत आणि नुकसान.
- सोमॅटोसेंसरी तंत्राला नुकसान किंवा रोग.
- सूज येण्यासंबंधीचे रोग.
- संसर्ग.
- फ्रॅक्चर्स.
- मासिक पाळी.
- गर्भधारणा.
- दातांना कीड लागणे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
वेदना शरीराच्या कोणत्याही स्थानापासून उद्भवू शकतात. गंभीर वेदनेचे निदान आणि व्यवस्थापन एकाच वेळी करणे आवश्यक असते. रुग्णाचा संपूर्ण इतिहास घेतला जाऊ शकतो ज्यामध्ये पुढील चाचण्या केल्या जाऊ शकतात:
- शारीरिक तपासणी.
- रक्त चाचणी.
- एक्स-रे.
- अल्ट्रासाऊंड इमेजिंग.
- मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (एमआरआयI).
- इलेक्ट्रोमायोग्राफी (स्नायूच्या क्रिया तपासण्यासाठी).
यापैकी कोणत्याही एका स्केलवर वेदना मोजली जाते: वेदने साठी व्हिज्युअल एनलॉग स्केल (व्हीएएस वेदना),वेदनेसाठी न्युमरिक रेटिंग स्केल (एनआरएस वेदना), क्रोनिक पेन ग्रेड स्केल (सीपीजीएस), शॉर्ट फॉर्म -36 बॉडीली पेन स्केल (एसएफ -36 बीपीएस), इंटरमीटेंट आणि कॉन्स्टंट ऑस्टियोआर्थराइटिस पेन (आयकोएपी). वेदनेच्या उपचारामध्ये खालील पद्धती समाविष्ट आहेत:
- औषधे
- कर्करोग आणि मुळात दुर्बल रुग्णांसाठी ओपिऑइड अनाल्जेसिक्स.
- नॉन स्टेरॉइडल अँट-इंफ्लॅमेटरी ड्रग्स (एनएसएआयडीएस).
- स्नायू शिथिलक.
- चिंता कमी करणारी औषधे.
- फिजियोथेरेपी.
- शरीर ताणून व्यायाम (स्ट्रेचिंग व्यायाम).
- अॅक्युपंक्चर.
- योगा.
- गरम आणि थंड संकुचन.
- हर्बल औषधे.
- होमिओपॅथी.
एक किंवा अधिक उपचारांच्या संयोगाने प्रभावी वेदना व्यवस्थापन केले जाऊ शकतात. निरोगी जीवनशैली, योग्य कार्यप्रणाली आणि नियमित योग आणि ध्यान हे सर्व नियमित औषधोपचारासोबत जोडून वेदनेच्या मूळ कारणाचा उपचार केला जाऊ शकतो जे वेदनेच्या व्यवस्थापनात चांगले परिणाम देतात.