स्वादुपिंडातील कर्करोग म्हणजे काय?
काही घातक (कर्करोगाच्या) पेशींची स्वादुपिंडातील वाढ म्हणजे स्वादुपिंडाचा कर्करोग होय. स्वादुपिंडाच्या एक्झोक्राइन (नलिका) किंवा एंडोक्राइन (हार्मोन किंवा एंझाईम निर्माण करणाऱ्या) भागात होऊ शकतो. हा स्त्रियांपेक्षा जास्त पुरुषांमध्ये आढळून येतो.
याची प्रमुख कारणे व लक्षणे काय आहेत?
सामान्यपणे, स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे विशिष्ट लक्षणे माहीत नसल्याने प्रमाण जास्त झाल्यावर आढळून येतो. काही सामान्य कारणे व लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
- मळमळ.
- पाठ व पोटात दुखणे.
- यकृत किंवा पित्ताशय फुगणे.
- भूक न लागणे.
- अपचन.
- गिळण्यात त्रास होणे.
- उलटीमध्ये रक्त दिसणे.
- उलट्या.
- थकवा.
- थंडी व ताप.
ह्या आजारात काविळ सारखे लक्षणे दिसू शकतात.
प्रमुख कारणे काय आहेत?
स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे धोके वाढवणारी प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
- मधुमेह.
- यकृतावरील व्रण.
- स्वादुपिंडात जळजळ( क्रॉनिक पँक्रियाटीटीस).
- पोटातील संसर्ग.
- ॲनेमिया.
- हायपरग्लायसेमिया.
- दारूचा गैरवापर.
- स्वादुपिंड, पोट व यकृताशी संबंधित आनुवंशिक आजार.
- स्थूलता.
- धुम्रपान किंवा तंबाखूचा वापर.
- फॅटचे अती सेवन.
- स्तन किंवा ओवरियन कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
डॉक्टर स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी बऱ्याच तपासण्या घेतात:-
- रक्त तपासण्या:
रक्त तपासण्या यकृताने तयार केलेल्या बिलरुबिन चे प्रमाण तपासण्यासाठी मदत करतात. यामुळे डॉक्टरांना यकृताचे कार्य व काविळीची कारणे समजण्यास मदत होते. ते स्वादुपिंडाच्या हार्मोन्स च्या वाढलेल्या पातळ्या व एन्झायम साठी मदत करतात. - बायोप्सी:
स्वादुपिंडातील कर्करोगाच्या पेशी शोधण्यासाठी. - अल्ट्रासाऊंड:
पोटातील कर्करोगाचा आकार व प्रसार पाहण्यासाठी. - सी टी स्कॅन:
जर कर्करोग स्वादुपिंडाजवळील अवयवात पसरला असल्यास ते शोधण्यासाठी. - एमआरआय:
हे डॉक्टरना पित्त व स्वादुपिंडातील नलिकांची स्वच्छ छायाचित्रे देतात. - ट्युमर मार्कर टेस्ट:
सी ए-19-9, कर्सिनोएम्ब्रिओनिक अँटी जेन ही काही ट्युमर मार्कर्स आहेत.
निदान झाल्यानंतर ह्या आजारावर खालील प्रमाणे उपचार केले जातात:-
- शस्त्रक्रिया:
जिथे शक्य होईल तेथील ही सर्वात चांगली पद्धत आहे. जेथे कर्करोगाचा भाग जास्त पसरला नसेल तेथून तो शस्त्रक्रियेने थेट काढून टाकला जातो. - केमोथेरपी:
औषधे तोंडावाटे किंवा नालिकांतून देऊन कर्करोगाच्या पेशी मारल्या जातात. याचे इतर परिणाम म्हणजे केस गळणे, थकवा, जखमा व तोंड आंबट पडणे इ. - इतर
काही उपचार पद्धती (काही तंत्रांनी ट्युमर काढून न टाकता त्याची तीव्रता कमी करणे) क्रायोसर्जरी, मायक्रोवेव थर्मोथेरपी, रेडिओ फ्रिक्न्सी चे उपचार इ.