पॅनिक अटॅक आणि डिसऑर्डर काय आहे?
पॅनिक अटॅक आणि विकार हा एक प्रकारचा चिंतेशी संबंधित विकार आहे, जो एखाद्या वस्तू, व्यक्ती किंवा परिस्थितीसोबत संबंधित असतो ज्यात भय आणि दहशतीची भावना तीव्र असते. पॅनिक अटॅकचा सामना करताना, व्यक्तीला असे वाटते की तो त्याच्या स्वतःच्या प्रतिक्रिया आणि भावनांवर नियंत्रण गमावत आहे. तीव्र भीतीचे प्रकरण पॅनिक अटॅक म्हणून ओळखले जाते, पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला दीर्घ काळासाठी पॅनिक अटॅक येतात तेव्हा त्याला वैद्यकीयदृष्ट्या पॅनिक डिसऑर्डर म्हटले जाते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
पॅनिक अटॅक दरम्यान व्यक्तीला मनोवैज्ञानिक लक्षणांचा अनुभव येतो, जसे की :
पॅनिक अटॅक सोबत सहसा शारीरिक लक्षणेही दिसतात जसे :
- हृदयाचे जलद ठोके (अधिक वाचा:टॅकीकार्डियाची कारणे आणि उपचार).
- छातीत वेदना.
- श्वास घेण्यात अडचण.
- जास्त घाम येणे.
- चक्कर येणे.
- अशक्तपणा.
- पोटदुखी.
याची मुख्य कारणं काय आहेत?
पॅनिक डिसऑर्डर हा तणावाच्या सर्वोच पातळीचा परिणाम आहे. मात्र, ही एक मानसिक स्थिती आहे ज्याला वैद्यकीय सल्ल्याची गरज आहे. ताणाच्या विशिष्ट पातळीवर प्रतिक्रिया व्यक्ती नुसार बदलू शकते. सहसा, पॅनिक डिसऑर्डर कालांतराने विकसित होतो जेव्हा व्यक्ती दीर्घ काळासाठी अत्यंत चिंता किंवा तणाव अनुभवतात.
बऱ्याच व्यक्तींमध्ये, एक विशिष्ट उत्तेजना किंवा ट्रिगरमुळे पॅनिक अटॅक येतात. उदाहरणार्थ, काही व्यक्तींमध्ये, पॅनिक अटॅकचे कारण आसपासची गर्दी असू शकते. पॅनिक अटॅकची कारणे वेगळी असतात आणि एखाद्या प्रिय व्यक्तीस गमावणे , स्वत: ला किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीला होणाऱ्या नुकसानाची भिती वाटणे, मोठे आर्थिक नुकसान इ. असू शकतात.
तरी, कोणत्याही चेतावणीशिवाय पॅनिक अटॅक होऊ शकतात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
मानसिक आजाराचे चिकित्सक, बहुतेकदा मनोचिकित्सक किंवा मनोवैज्ञानिक, या रोगाचे वैद्यकीय निदान करतात. पॅनिक डिसऑर्डर हाताळण्याचा पद्धतीमध्ये मुख्यतः विश्रांती घेणे, व्यायाम करणे आणि श्वासाचा व्यायाम (ब्रिदिंग एक्सरसाईज) करून त्यांची लक्षणे नियंत्रित करण्यासाठी व्यक्तीस सक्षम करणे हे लक्ष्य आहे. मानसिक तणाव मुक्त करण्यासाठी, व्यावसायिक सल्ला आणि कॉग्निटिव्ह बिहेविओरल थेरेपी देखील केली जाऊ शकते.
गंभीर प्रकरणांमध्ये औषधं आवश्यक असू शकतात. अशा प्रकरणात चिंता विरोधी औषधांची शिफारस सामान्यपणे केली जाते.
हे जाणून घेणे आवश्यक आहे की पॅनिक डिसऑर्डर ही जीवघेणी स्थिती नाही, पण आपल्या आत्मसन्मानाला आणि आत्मविश्वासाला प्रभावित करू शकते. लक्षणे व्यवस्थापित करण्यायोग्य आहेत आणि पॅनिक डिसऑर्डर वेळेवर मदत करून आणि लक्षणांबद्दल जागरूक राहून नियंत्रित केला जाऊ शकतो.