पुरुषाच्या लिंगाचा विकार (पेनिस डिसऑर्डर) म्हणजे काय?
लिंग म्हणजेच पेनिस हा पुरुषांचा संभोग करणारा अवयव आहे, जो पुनरुत्पादन प्रणालीचा (रीप्रॉडकटिव्ह सिस्टिम) भाग आहे. पुरुषाच्या लिंग विकारात (पेनिस डिसऑर्डर) केवळ अस्वस्थता आणि वेदनाच होत नसतात तर, एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक कार्यावर प्रभाव पडतो आणि प्रजनन संबंधी चिंता उद्भवू शकतात. काही सामान्य लिंगाच्या स्थितींमध्ये इरेक्टाइल डिस्फंक्शन, बॅलानिटिस, प्राइपीझम, पेयोनॉईज रोग आणि क्वचितच पेनाईल कॅन्सर यांचा समावेश असू शकतो.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत ?
काही लक्षणे अंतर्निहित स्थितींशी संबंधित असतात आणि त्यानुसार त्याचे वर्णन केले जाऊ शकते:
- इरेक्टाइल डिस्फंक्शन: ही सर्वात सामान्य स्थिती आहे ज्यात लिंग सतत उभा ठेवण्यात अडचण किंवा अक्षमता येते.
- प्रायप्रिझम एक वेदनादायक परिस्थिती आहे ज्यामध्ये लिंग 4 तासांपेक्षा जास्त काळासाठी उभा राहतो.
- फिमोसिस: या स्थितीत, लिंगाच्या वरील त्वचा खूप टाईट होते आणि स्वतःला मागे जाण्यास सक्षम नसते ज्यामुळे तीव्र वेदना होतात.
- पेयरोनी रोग - या रोगामध्ये, लिंगाच्या आतील भागात स्कार टिशूच्या कठोर गुठळ्या तयार होतात त्यामुळे ज्यावेळेस लिंग उभा असतो, तो एकाबाजूला वाकला जातो. सुपरफेशिअल स्किन डिसऑर्डरमध्ये लिंगावर पुरळ (रॅशेस), खाज, त्वचेवर डाग आणि अल्सर होऊ शकतात.
त्याची मुख्य कारणं काय आहेत ?
- प्रायप्रिझमच्या कारणांमध्ये काही औषधं, मद्यपान, जखम, मेरुदंडाच्या स्थितीचा समावेश असतो.
- कार्यक्षमतेची चिंता, तणाव आणि लैंगिक नैराश्याच्या इतिहासामुळे प्रीमॅचुअर इज्याक्युलेशन होत असते.
- फीमोसिस सामान्यत: त्या पुरुषांमध्ये पाहिले जाते ज्यांची सुंता (खतना) झालेली नसते.
- पेयरोनी रोगाचे अचूक कारण माहित नाही, परंतु व्हॅस्क्युलाइटिस, जखम आणि आनुवंशिक कारणे हे काही जोडलेले घटक आहेत.
- धूम्रपान आणि एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस-HPV) हे लिंगाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहेत.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?
निदान हे सहसा लिंग आणि अंडाशय तपासून केले जातात. त्या व्यक्तीची प्रजननक्षमता व्यवस्थित असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी एक नियमित शुक्राणूंची गणना (रुटीन स्पर्म काऊंट) आणि स्थानिक सोनोग्राफी केली जाते. उपचार हे कारणांवर अवलंबून असतात.
- प्रायप्रिझमचा उपचार सुईचा वापर करून लिंगातून रक्त काढून केला जातो
- फीमोसिसमध्ये सहसा शस्त्रक्रिया आवश्यक असते
- पेयरोनी रोग जर सौम्य असेल तर कोणत्याही उपचाराशिवाय स्वतःच 15 महिन्याच्या आत बरा होतो.
- लिंगाच्या कर्करोगाचा उपचार शस्त्रक्रियेने, विकिरणांच्या साहाय्याने (रेडिएशन), आणि केमोथेरेपीने केला जातो.
पेनिस डिसऑर्डर हाताळने त्रासदायक असू शकतो आणि ते एखाद्याच्या भावनिक आरोग्यावर परिणाम करू शकते.
स्वत: ची काळजी घेणाऱ्या काही टिप्स पेनाईल डिसऑर्डर प्रतिबंधित करण्यात मदत करतात आणि व्यक्तीला निरोगी लैंगिक जीवन जगू देण्यात मदत करतात. या टिप्समध्ये समाविष्ट आहे :
- लिंग स्वच्छ ठेवणे.
- लैंगिक अंगांची नियमित तपासणी करणे.
- एकापेक्षा अधिक लैंगिक साथीदार नसणे.
- टाईट अंडरगारमेंट न घालणे.
- लिंगाला अत्यंत उष्णता प्रदर्शनापासून संरक्षण करणे.
- धूम्रपाण सोडणे.
वेळेवर निदान आणि उपचार करण्यासाठी, लिंगामध्ये काही असामान्य बदल आल्यास व्यक्तींनी डॉक्टरांना तंतोतंत भेट देणे आवश्यक आहे.