प्लेग - Plague in Marathi

Dr. Ajay Mohan (AIIMS)MBBS

May 09, 2019

March 06, 2020

प्लेग
प्लेग

प्लेग काय आहे?

प्लेग एक अत्यंत संसर्गिक जीवाणूजन्य रोग आहे जो मनुष्यांना आणि इतर स्तनधाऱ्यांना प्रभावित करतो. एकदा मध्ययुगात युरोपमधील लाखो लोकांना ठार मारण्यासाठी हा रोग जबाबदार होता. याचा उद्रेक हा ब्लॅक डेथ म्हणून ओळखला जात असे. सध्या, युनायटेड स्टेट्सच्या पश्चिम प्रदेशात मानवी प्लेग सुरू आहे, परंतु आफ्रिका आणि आशियाच्या दूरस्थ भागामध्ये त्याच्या उपस्थितीची घटना महत्त्वपूर्ण आहे.

त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

प्लेग हा तीन प्रकारचा असतो आणि त्याची लक्षणे त्याच्या प्रकारानुसार बदलत असतात.

  • ब्युबॉनिक प्लेगमुळे गंभीर दाह सूज किंवा टॉनलीसची सूज आणि प्लीहाला सूज होते त्यामुळे ताप, शरीर दुखणे, ब्लबस फोड तयार होतात आणि लिम्फ नोड्समध्ये कोमलता निर्माण होण्यासारखी लक्षणं होतात. अशा प्रकारचा प्लेग लिम्फ नोड्सपासून शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो.
  • सेप्टिसिकॅमिक प्लेगमुळे अत्यंत अशक्तपणा, ताप, थंडी, पोटात गंभीर वेदना आणि हात-पाय काळे पडणे सारखी लक्षणे दिसून येतात. अशा प्रकारचा प्लेग बहुतेक वेळा उपचार न केलेल्या ब्युबॉनिक प्लेगचा परिणाम आहे.
  • न्यूमोनिक प्लेगने छातीत दुखणे, श्वास घेण्यात अडचण, सतत खोकला आणि निमोनिया यासारखी लक्षणे दिसून येतात.

याची मुख्य कारणं काय आहेत?

हा संसर्ग यर्सिनिया पेस्टीस या जीवाणूमुळे होतो जे रोडेन्ट (उंदीर, घूस, ससा, इ  कुरतडणारा प्राणी) आणि पिसू मध्ये सापडतो. हा जीवाणू मानव आणि इतर स्तनधारी प्राण्यांना प्रभावित करतो ज्यांना संसर्गित उंदीर आणि पिसुंनी चावा घेतला आहे. हा अत्यंत संसर्गित रोग थेट संपर्काने देखील पसरतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

प्लेग ची उपस्थिती निश्चित करण्यासाठी एकापेक्षा अधिक नैदानीक चाचण्या केल्या जातात ज्यामध्ये रक्त आणि संसर्गित टिशूचें नमुने समाविष्ट असतात. हा लक्षात येण्यायोग्य रोग आहे आणि याचा प्रसार थांबविण्यासाठी स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना ताबडतोब अहवाल दिला पाहिजे.

प्लेग एक गंभीर आजार असून यासाठी त्वरित उपचार करणे आवश्यक आहे. वैद्यकीय अभ्यासातील प्रगतीमुळे, प्लेग आता अँटीबायोटिक्सच्या मदतीने उपचार करण्यायोग्य आहे. लवकर ओळख आणि त्वरित उपचार पुनर्लाभाची शक्यता वाढवतात.

संसर्गित व्यक्तीची काळजी घेणारे लोक देखील निरीक्षणाखाली ठेवावेत आणि संसर्ग टाळण्यासाठी थेट संपर्क टाळावा. यासाठी आजपर्यंत कोणतीही लस उपलब्ध नाही आहे.

 



संदर्भ

  1. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Diagnosis and Treatment.
  2. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Symptoms.
  3. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Plague.
  4. National Institute of Allergy and Infectious Disease. [Internet]. U.S. Department of Health & Human Services; Plague.
  5. National Health Portal [Internet] India; Plague.