पीएमएस म्हणजे काय?
पीएमएस किंवा मासिक पाळी आधीचा सिंड्रोम म्हणजे मासिक पाळी आधी स्त्रियांनी अनुभवलेली शारीरिक व मानसिक लक्षणे होय. पीएमएस हा सामान्यपणे स्त्रियांच्या मासिक पाळी मध्ये दिसून येतो. हा कमी ते तीव्र प्रमाणात दिसतो. ही स्थिती जीवघेणी नसली तरी व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करू शकते.
पीएमएस शी संबंधित प्रमुख कारणे व लक्षणे काय आहेत?
पीएमएस मुळे स्त्रिया अनेक लक्षणे अनुभवू शकतात. परंतु, स्त्रिया सर्व लक्षणे अनुभवतील, असे गरजेचे नाही. त्यामध्ये:
शारीरिक लक्षणे:
- पोट फुगणे.
- हृदयात जळजळ.
- डायरीया किंवा अतिसार.
- खाण्याची तीव्र इच्छा.
- बद्धकोष्ठता.
- डोकेदुखी.
- स्तनांचे दुखणे.
- पोटरी दुखणे.
- पाठ दुखी.
- वात.
मानसिक लक्षणे:
याची प्रमुख कारणे काय आहेत?
मासिक पाळी मध्ये हार्मोन्स च्या पातळ्यांमध्ये झालेले बदल हे मासिक पाळी आधी च्या सिंड्रोम चे प्राथमिक कारण मानले जाते. तरी, नक्की कारण कोणालाही माहीत नाही आहे.
या लक्षणांना कारणीभूत ठरणारे अनेक घटक आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत:
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
पीएमएस चे निदान करण्यासाठी कोणतीही विशिष्ट निदानाची चाचणी नाही आहे. तरीही, डॉक्टर स्त्रियांनी अनुभवलेल्या लक्षणांची चौकशी करतात. सामान्यपणे, लक्षणांचा नमुना ओळखला जातो व बऱ्याच स्त्रियांनी अनुभवलेली लक्षणे जी गंभीर ठरू शकतात यांचा विचार केला जातो. ही लक्षणे लिहून ठेवल्यास त्याची मदत होते.
पीएमएस चा काही विशिष्ट उपाय नसला तरी स्त्रियांकडून यात मोठा धोका असल्याचे सांगितले जात नाही. पीएमएस च्या लक्षणांचे योग्य आहार, जीवनशैलीत बदल व प्राणायामाद्वारे नियमन केले जाते.
- दुखणे घालवण्यासाठी, डॉक्टर योगा, व्यायाम किंवा गरम पाण्याची बाटली वापरायचा सल्ला देतात. तीव्र वेदने चे शमन करण्यासाठी वेदनाशामक औषधं दिली जाऊ शकतात.
- सूज कमी करण्यासाठी डाययुरेटिक्स दिली जातात.
- नैराश्याच्या गंभीर बाबतीत अँटी स्ट्रेस व अँटी डिप्रेसंट औषधे दिली जातात.
तरीही, आहारात बदल आणि घरगुती उपायांच्या वापराने या लक्षणांचे व्यवस्थापन करण्यास मदत होते.