पॉयझन आयव्ही, ओक, आणि सुम्याक ॲलर्जी काय आहे?
पॉयझन आयव्ही, ओक आणि सुम्याक हे ते झाडं आहेत ज्यामध्ये उरूशीऑल नावाचा घटक सगळ्या भागात जसे पाने, मुळे, आणि खोडामध्ये असतो. ह्या झाडांना किंवा त्यांच्या भागाला डायरेक्ट किंवा इन्डायरेक्ट संपर्क झाल्यास त्वचेला ॲलर्जी होऊ शकते त्यालाच पॉयझन आयव्ही, ओक, आणि सुम्याक ॲलर्जी म्हणतात. मृत झाडात पण ॲलर्जी करण्याची क्षमता असते. ॲलर्जीक रिॲक्शन उरूशीऑल च्या संपर्कात आल्यानंतर काही तास ते पाच दिवसापर्यंत दिसू शकते.
याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
याचे चिन्हे आणि लक्षणे इतर त्वचेच्या ॲलर्जी सारखेच असतात आणि यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
- प्रभावित जागेवर खाज येणे.
- सूज .
- श्वास घ्यायला त्रास होणे.
- गिळायला त्रास होणे.
- छोटे किंवा मोठ्या फोडांमुळे लाल चट्टे/उंचवटे होणे.
- लालसरपणा.
- पित्ताच्या गाठी.
याचे मूख्य कारणे काय आहेत?
ही ॲलर्जी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कातून येऊन होऊ शकते. प्रत्यक्ष संपर्कामध्ये झाडाचा किंवा कोणत्याही भागाचा त्वचेशी संपर्क होणे समाविष्ट आहे. अप्रत्यक्ष संपर्कामध्ये त्या गोष्टीला स्पर्श करणे ज्यांचा आधीपासून त्या झाडाशी संपर्क आला आहे, जसे, कॅम्पिंग मटेरियल, बागकामाची हत्यारे, आणि प्राण्यांचे केस.
झाड किंवा त्याचे भाग जाळतांना उरूशीऑल चे श्वसन केल्यास नाकाच्या पॅसेज वर, फुफुसावर, आणि गळ्यावर परिणाम होऊ शकतो .
याचे निदान आणि उपचार काय आहे ?
त्वचारोगतज्ञ ॲलर्जीक रिॲक्शन चे निदान करण्यासाठी त्वचेची आणि प्रभावित जागेची शारीरिक तपासणी करून उपचारांची सुरवात करेल. अँटिबायोटिक्स आणि प्रेडनिसोन सारखी औषधे लिहून दिली जाते. प्रभावित जागेवर लावण्यसाठी स्टेरॉईड असलेले मलम लिहून देतात.ॲलर्जीक रॅश मूळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी अँटिबायोटिक्स दिले जातात.
ॲलर्जीचा खालील मार्गाने प्रतिबंध करू शकतो:
- सगळे शरीर झाकणारे कपडे घालणे जसे पूर्ण बाह्यांचे शर्ट आणि लॉन्ग पँटस.
- जर हे झाड तुमच्या बागेत उगवले असेल तर त्यांना कापणे .
- या झाडांशी किंवा त्यांच्या भागाला संपर्क झाला असेल तर त्वचेला आणि कपड्याना व्यवस्थित धुऊन काढणे.
- रॅश होण्याचा धोका कमी करण्यासाठी त्वचेवर मलम आणि लोशन लावणे.