पोलियोमायलिटीस - Polio (Poliomyelitis) in Marathi

Dr. Ajay Mohan (AIIMS)MBBS

May 09, 2019

March 06, 2020

पोलियोमायलिटीस
पोलियोमायलिटीस

पोलियोमायलिटीस काय आहे?

पोलियोमायलिटीस ला साधारणपणे पोलियो असे म्हणतात, हा मज्जास्नायूंची झीज होण्याचा विकार असून हा पिकॉर्नव्हिरीडी कुटुंबातील विषाणू मूळे हा होतो. पाठीच्या आणि मेंदूच्या कण्याच्या आतील हॉर्न मोटर न्यूरॉन वर हा विषाणू हल्ला करतो; हे मोटर न्यूरॉन दुरुस्त होत नाही, आणि संबंधित हाडाच्या स्नायूंच्या रचनेत बदल होतात.

हा खूप वेगाने संसर्ग करणारा विषाणू आहे; तरीही, बऱ्याच लोकांमध्ये, लक्षणे राहत नाहीत. काही मोजक्या केसेस मध्ये, विषाणू सेंट्रल मज्जासंस्थे पर्यंत पोहोचतो. रुग्णाला डोकेदूखी होऊ शकते, कडक मान, अस्वस्थता, इत्यादी. ह्या रोगात पूढे जाऊन लकवा सुद्धा मारू शकते.

याचे मूख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

रुग्णामध्ये सौम्य आजार, गळ्याचा संसर्ग, ताप, किंवा गॅस्ट्रोएन्टेरीटीस ची हिस्टरी असू शकते.

  • सौम्य आजार स्नायूंचे आकुंचन आणि गंभीर दुखण्यात बदलू शकते.
  • हातापायात अशक्तपणा येतो, इतरांपेक्षा एका लिम्बस वर परिणाम होतो, हातपेक्षा जास्त पायावर परिणाम होतो.
  • स्नायू शिथिल होतात, आणि रिफ्लेक्ससेस पूर्णपणे निदर्शनात येत पर्यंत हळूहळू मंद होत जातात.
  • लकवा आठवडाभर राहू शकतो.

रुग्ण बऱ्याच वर्षानंतर हळूहळू बरा होतो.

काही मोजक्या केसेस मध्ये लोकं जे लहानपणी लक्षणे नसलेल्या पोलियो पासून बरे झाले आहेत त्यांना, काही वर्षानंतर बरे झाल्यानंतर लक्षणे दिसू शकतात. या परिस्थितीला पोस्ट-पोलीओ सिंड्रोम म्हणतात आणि हे वाढत जाते आणि संसर्गजन्य नाही. हे बरे होऊ शकत नाही.

याचे मुख्य कारणे काय आहेत?

रोगजंतू हा पोलीओ विषाणू आहे जो पिकॉर्नव्हिरीडी कुटुंबाशी संबंधित आहे. हा तोंडावाटे किंवा ओरोफॅरिंगल मार्गे संक्रमित होतो. कमी इम्युनिटी असलेल्या  रुग्णामध्ये आणि जे अस्वच्छ जागेत राहतात त्यांना हा रोग होण्याचा धोका जास्त असतो. दूषित पाणी आणि अन्न हे हा रोगजंतू चे शरीरात प्रवेश करण्याचे मुख्य मार्ग आहे.

याचे निदान आणि उपचार काय आहेत?

वैद्यकीय चिन्हे आणि लक्षणावरून पोलीओ ओळखला जाऊ शकतो. पोलीओ च्यानिदानाची खात्री करण्याची प्रमाणित पद्धत ही पॉलीमरेज चेन रिॲक्शन चाचणी आहे ज्यात पोलीओ विषाणू शोधला जातो.स्टूल्स, गळ्यातील द्रव, रक्त आणि सेरेब्रोस्पायनल फ्लुइड (सीएसएफ) हे सॅम्पल सोर्स आहे. पॅरालिक्टीक पोलिओमायलिटीस बरा होणे शक्य नाही. उपचारामध्ये प्रभावित लिम्बस च्या पुनर्वसनाचे लक्ष्य ठेवले जाते, ज्यामध्ये फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, आणि रिक्रिएशनल थेरपी येते. वेदना कमी करण्यासाठी वेदनानाशक दिल्या जाते.
पोलीओ होऊ न देण्यासाठी सगळ्यात प्रभावी योजना म्हणजे लसीकरण आहे. पोलिओ च्या प्रतिबंधासाठी लोकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे.



संदर्भ

  1. Mehndiratta MM, Mehndiratta P, Pande R. Poliomyelitis. historical facts, epidemiology, and current challenges in eradication. Neurohospitalist. 2014 Oct;4(4):223-9. PMID: 25360208
  2. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; What Is Polio?.
  3. National Health Portal [Internet] India; Poliomyelitis.
  4. John TJ,Vashishtha VM. Eradicating poliomyelitis: India's journey from hyperendemic to polio-free status. Indian J Med Res. 2013 May;137(5):881-94. PMID: 23760372
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Polio.