शय्याव्रण काय आहे ?
शय्याव्रण किंवा दाबव्रण त्वचेवर आणि ऊतींवर उद्भवतात जे लांब काळासाठी सतत दाबात असल्याने हाडांच्या भागावर दिसतात. प्राथमिकता हे, कमी झालेल्या रक्त परिसंचरनाणे होते जे सतत एका ठिकाणी बसल्याने किंवा झोपल्याने होत असते. बहुतेक शय्याव्रणाचे प्रकरण हे वयस्कर लोकांमध्ये 70 वर्षाच्या वरील लोकांमध्ये नोंदविले जाते.
भारतीय अभ्यासातून असे दिसून आले आहे की रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये शय्याव्रणाचा प्रभाव 4.94% आहे. त्वचेला गंभीर नुकसाणीपासून वाचवण्यासाठी लवकर उपचार करणे आवश्यक आहे.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत ?
सुरुवातीच्या अवस्थेत, आपण हे नोंदवू शकता की सतत दबावाखाली असलेल्या त्वचेवर चमकदार, लाल रंगाचे डाग दिसतील उदा. अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांमध्ये नितंब आणि खांद्यावर ब्लेड सारखे व्रण दिसतात. यामुळे हळूहळू त्वचेच्या वरच्या थराचे (एपिडर्मिस) नुकसान होऊ शकते आणि अल्सर विकसित होतो.
हाडांच्या खाली असलेल्या ऊतकांवर दाब असतांना त्वचेवर सूज आणि कमी होणारे संवेदना अनुभवल्या जातात. शेवटी, त्या क्षेत्रात संसर्ग आणि तिशूचें नुकसान होते.
याची मुख्य कारणं काय आहेत ?
शय्याव्रण तेव्हा होतात जेव्हा एखाद्या बिंदूवर जसे की खांद्याच्या मागे, माकडहाड, नितंब आणि टाचेवर जास्त आणि दीर्घकालीन दाब (सुमारे 1-2 तास) लागू केला जातो.
लागू झालेल्या दबावाने रक्तवाहिन्यांना दाबतात ज्यामुळे त्वचेला ऑक्सिजन आणि पोषणाचा पुरवठा कमी होते. जास्त काळासाठी पोषक आणि ऑक्सिजनची कमतरता असल्याने अल्सर होऊ शकतो.
शय्याव्रणाच्या इतर कारणांमध्ये समावेश होतो:
- तीक्ष्ण शक्ती, जेथे त्वचेची हालचाल आणि अंतर्निहित ऊतक उलट दिशेने आहे.
- घर्षण दुखापत.
- मेरुदंडाला दुखापत.
- ओलावा जे जीवाणूंच्या वाढीला आणि अल्सरच्या निर्मितीला प्रोत्साहन देते.
- निर्जलीकरण, पोषणाचा अभाव, मधुमेह, हृदय रोग आणि लठ्ठपणा (मुलांमध्ये) या सारखी स्थिती.
- हालचालीचा अभाव (उदा. पक्षघात, शास्त्रक्रिये नंतर).
- फ्रॅक्चरमध्ये वापरला जाणारा साचा.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?
जर तुम्हाला किंवा तुमच्या सांभाळ करण्याराला तुमच्या शरीरावर शय्याव्रण मिळत असेल तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांना कळवा. आरंभिक व्यवस्थापनामध्ये शय्याव्रणाच्या क्षेत्रात दाब कमी करण्यासाठी रुग्णाची स्थिती बदलताना त्याला संपूर्णपणे स्वच्छ करणे आणि जखमेच्या ड्रेसिंगचा समावेश असतो. संसर्गाच्या प्रकरणात टॉपिकल अँटीबायोटिक्सचा सल्ला देण्यात येतो. व्रण किती गंभीर आहेत यावर अवलंबून उपचार कालावधी 2 ते 4 आठवडे टिकतो.
आपण दाबव्रण मिळविण्यापासून स्वतःचे संरक्षण करू शकता:
- व्हीलचेयरमध्ये नियमितपणे आपले वजन बदलत राहणे.
- बेडवर असतांना आपल्या झोपण्याची स्थिती बदला.
- सततची घर्षण दुखापत टाळा जसे की त्वचेला बेडशीट सोबत सतत घासणे.
- आपल्या त्वचेची नियमित तपासणी.
- स्वच्छ करणाऱ्या एजंटसह त्वचा स्वच्छ करणे.
- त्वचेला कोरड्या अवस्थेत ठेवणे.
- पुरेसे पाणी पिणे आणि निरोगी अन्न खाणे.