प्रोलॅक्टिनोमा म्हणजे काय?
प्रोलॅक्टिनोमा हा पिट्यूटरी ग्रंथीच्या सौम्य (गैर-कर्करोग) ट्यूमर चा एक प्रकार आहे. ट्यूमर प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन सिक्रिट करतो. हा हार्मोन स्त्रियांमध्ये स्तनातून दूध डिस्चार्ज करतो. अतिरिक्त हार्मोन उत्पादनामुळे हे खराब होण्याचे कारण बनते. प्रोलॅक्टिनोमा अत्यंत सामान्य आहे आणि बहुतेक स्त्रियांमध्ये लहान ट्यूमर आढळतात, तर पुरुषांमध्ये मोठे ट्यूमर सामान्य आहे.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
ट्यूमर पिट्यूटरीच्या जवळच्या ऊतींवर प्रभाव करतो ज्यामुळे न्यूरोलॉजिकल आणि हार्मोनल असंतुलन-संबंधित लक्षणे आढळतात. इतर लक्षणे ट्यूमरद्वारे सिक्रिट होणाऱ्या संप्रेरकांमुळे होतात.
- महिला मासिक पाळीत अनियमितता आणि वांझपणा ची तक्रार करू शकतात.
- मासिक पाळी अनुपस्थित किंवा मेनेर्चे विलंबित होऊ शकतो.
- गर्भधारणेशिवाय महिलांच्या स्तनामध्ये दूध बनू शकतो. हे अत्यंत सामान्य आहे.
- ॲस्ट्रोजेनची पातळी कमी असू शकते, ज्यामुळे योनीचा कोरडेपणा, डिस्पॅरेनिया/वेदनादायक संभोगआणि ऑस्टियोपेरोसिस होऊ शकते.
- पुरुषांमध्ये कामेच्छाची कमतरता,नपुंसकता किंवा वांझपण या तक्रारी दिसून येतात.
- इतर लक्षणे डोकेदुखी, कमी झालेली परिधिय दृष्टी इत्यादि आहेत.
जेव्हा ट्यूमर जवळच्या पिट्यूटरी ऊतकावर होतो ,तेव्हा पिट्यूटरी ग्रंथीच्या त्या भागांच्या कार्यात बिघाड होतो. हे थायरॉईड उत्तेजक संप्रेरक सारख्या एक किंवा अधिक संप्रेरकांची कमतरता म्हणून दिसून येते.
याची मुख्य कारणं काय आहेत?
हा ट्यूमर सौम्य (नॉन- कँन्सरस) स्वरूपाचा असतो. प्रोलॅक्टिन हार्मोनची पातळी वाढल्याने यारोगाची चिन्हे आणि लक्षणे दिसून येतात.
हा हायपोथायरॉयडिज्म, मूत्रपिंडावरील ग्रंथी निकामी होणे, मानसिक विकारांकरिता निर्धारित औषधे, जीईआरडी किंवा हायपरटेन्शनमुळेही होऊ शकतो. ओपियेट्समुळे देखील प्रोलॅक्टिनोमा होऊ शकतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
लक्षणांवरून प्रोलॅक्टिनोमाचा संशय असल्यास, विभिन्न हार्मोन पातळींसाठी प्रयोगशाळेत चाचण्या केल्या जातात. त्यानंतर एमआरआय किंवा सीटी स्कॅन केला जातो. सुस्पष्ट द्रव्यमानाच्या बाबतीत, सीटी स्कॅन आवश्यक आहे.
निदान झाल्यानंतर, जर हार्मोनल असंतुलन महत्वपूर्ण लक्षण असेल तर उपचार केले जातात. उपचार न केल्यास बहुतेक प्रोलॅक्टिनोमास आकारात वाढत नाही. विशिष्ट हार्मोन्सच्या प्रभावाचा विरोध करणारी आणि अडवणारी औषधे सुचवली जातात.
ट्यूमरचा आकार कमी करण्यासाठी रेडिओथेरपीचा वापर केला जाऊ शकतो. पण, बऱ्याच दुष्परिणामांमुळे हे सहसा टाळले जाते. फक्त थोड्या प्रकरणात शस्त्रक्रियेची गरज असते जेथे अचानक लक्षणात बिगाड झाल्याचे दिसून येते. रोगनिदान सामान्यतः चांगले असते.