पल्मनरी हायपरटेन्शन म्हणजे काय?
पल्मनरी हायपरटेन्शन ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये घट्ट व अरुंद झालेल्या रक्त पेशींमुळे फुफ्फुसातील आर्टरिज मधील रक्तदाब वाढतो. त्यामुळे हृदयाला फुफ्फुसात व इतर शरीरात आवश्यक रक्त पुरवठा करण्यामध्ये अडचण निर्माण होते. जेव्हा हृदयाला वारंवार पंप कारणे अवघड जाते, तेव्हा ते कमकुवत होते व शेवटी बंद होते.
याची प्रमुख चिन्हे व लक्षणे काय आहेत?
पल्मनरी हायपरटेन्शन असणाऱ्या रुग्णाला सतत थकवा येतो व नियमित कामे व व्यायाम करण्यात त्रास होतो. इतर कारणे व लक्षणे ज्याकडे लगेच लक्ष देणे आवश्यक असते ती खालीलप्रमाणे आहेत:
- सतत कमी रक्तदाब.
- छातीच्या भागात ताण जाणवणे.
- क्रॉनिक कफ.
- श्वसनाची कमतरता व कमी जास्त होणारे हृदयाचे ठोके.
- पाय, घोटे, पाऊल व पोटावर सूज येणे.
याची प्रमुख कारणं काय आहेत?
पल्मनरी हायपरटेन्शन होण्याचे प्रमुख कारण म्हणजे पल्मनरी आर्टरिज चे कडक होणे, ज्यामुळे जागा अरुंद होते व पल्मनरी आर्टरिज मध्ये रक्त प्रवाहित होणे कठीण होते. पल्मनरी हायपरटेन्शन च्या इतर स्थिती पुढीलप्रमाणे आहेत:-
- हृदयाच्या डावीकडे होणारे विकार जसे व्हॉल्व डीफेक्ट्स, एऑर्टिक स्टनॉसिस आणि इतर.
- फुफ्फुसाचे विकार जसे क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव पल्मनारी आजार व व्हेन्स अडवणारा किंवा अडथळा निर्माण करणारा पल्मनरी आजार.
- एचआयव्ही संसर्ग.
- ड्रगचे सेवन.
- थायरॉईड ग्रंथीचे विकार.
- स्केरोडर्मा (ऑटो इम्युन त्वचा विकाराचा प्रकार).
- फुफ्फुसाच्या अर्टरिज बंद करणारे ब्लड क्लॉट किंवा ट्युमर.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
शरीराच्या विशेष करून फुफ्फुस व हृदयाच्या शारीरिक तपासण्या डॉक्टरांकडून केल्या जातात. वैद्यकीय इतिहास, ज्यामध्ये कौटुंबिक इतिहास व औषधे विचारात घेतली जातात.
पल्मनरी हायपरटेन्शन चा संशय आल्यास डॉक्टर जास्त सखोल चाचण्या करण्याचा सल्ला देतात जसे:-
- छातीचा एक्स रे.
- 2 डी इकोकार्डियोग्राम.
- पल्मनरी अर्टरिज मधील रक्तदाब मोजण्यासाठी उजव्या हृदयाचे कॅथटरायझेशन.
- हृदयातील लय व काम पाहण्यासाठी इलेक्ट्रोकर्डियोग्राम.
- जे ही स्थिती बिघडवू शकतील असे इतर आजार शोधण्यासाठी रक्त तपासण्या.
जर सुरुवातीच्या काळात निदान झाल्यास, क्लॉट काढून टाकण्यासाठी किंवा पल्मनरी अर्टरिज वर उपचार करण्यासाठी औषधे उपलब्ध आहेत. सुरुवातीच्या काळात वापरली जाणारी औषधे पुढीलप्रमाणे आहेत:-
- क्लॉट निर्मिती थांबवणे व रक्त पातळ करणे यासाठी वॉर्फरिन दिले जाते.
- जास्तीचे द्रव शरीरातून काढण्यासाठी डाययुरेटीक्स दिले जातात.
- कॅल्शियमच्या प्रवाहातील अडथळे रक्तदाब नियंत्रित करतात.
- डायगॉक्सीन हृदयाचे कार्य सुकर करते.
पल्मनरी हायपरटेन्शन उच्च प्रमाणात असल्यास स्टेम सेल थेरपी किंवा फुफ्फुस प्रत्यारोपणा चा सल्ला दिला जातो.