क्यू फिव्हर - Q Fever in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 08, 2019

March 06, 2020

क्यू फिव्हर
क्यू फिव्हर

क्यू फिव्हर काय आहे ?

क्यू फिव्हर किंवा क्वेरी फिव्हर, कॉक्सिएला बर्नेटी जीवाणूमुळे होणारा एक रोग आहे. हा जीवाणू सामान्यत: गायी, शेळी आणि मेंढ्या यासारख्या शेतातील प्राण्यांमध्ये आढळतो. या जीवाणूमुळे प्रभावित झालेले लोक सामान्यतः पशुवैद्यक, शेतकरी आणि लॅबमध्ये या जिवाणूंच्या आसपास कार्य करणारे असतात. या स्थितीने ग्रस्त असतांना हे अगदी सामान्य आहे की यात कुठलीही लक्षणं दिसणार नाही किंवा ते अगदी सौम्य असू शकतात. काही गंभीर प्रकार देखील विकसित होऊ शकतात, पण औषधोपचाराने स्थिती बरी होऊ शकते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

क्यू फिव्हरची लक्षणे ताबडतोब दिसत नाहीत. या लक्षणांची कुठलीही चिन्हे दिसण्या अगोदर हा जिवाणू शरीरात काही आठवडे राहतो. ठराविक लक्षणांमध्ये खालीलचा समावेश होतो:

याची मुख्य कारणं काय आहेत ?

जिवाणू ज्यामुळे क्यू ताप होतो, सामान्यतः गुरेढोरे, बकऱ्या आणि शेंळ्यांमध्ये आढळतो. हा जिवाणू सहसा मूत्र, मल आणि दुधामध्ये आढळतो आणि मुख्यतः नलिकांमधून प्रसारित होतो.  जे या प्राण्यांच्या संपर्कात राहतात त्या व्यक्तीच्या शरीरात हा श्वासोच्छ्वासाद्वारे प्रवेश करतो. क्यू रोगाचा प्रसार एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीमध्ये होणे अशक्य आहे.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?

लक्षणे मोठ्या प्रमाणावर सामान्यीकृत असल्यामुळे क्यू रोगाचे निदान करणे कठीण होऊ शकते. मात्र, क्यू रोगाच्या सकारात्मक सामान्य लक्षणांसाठी शारीरिक तपासणी आणि रुग्णांचा पशूंच्या आसपास कामकाजाचा इतिहास डॉक्टरांना या परिस्थितीचे योग्य आकलन देऊ शकते. क्यू तापाचे निदान करण्यासाठी अँटीबॉडी चाचणी हा सर्वोत्तम मार्ग आहे, पण संसर्ग झाल्यापासून 10 दिवसांच्या आत केल्यास त्याचे निदान सामान्यतः नकारात्मक असू शकते.

जर क्यू ताप सौम्य असेल तर कुठल्याही औषधांशिवाय काही दिवसात बरा होतो. अधिक गंभीर स्वरूपासाठी, 2 ते 3 आठवड्यात, कधीकधी प्रयोगशाळेच्या परिणामांशिवाय देखील अँटीबायोटिक्स निर्धारित केले जाऊ शकतात. दीर्घकालीन स्थितीच्या प्रकरणांमध्ये अँटीबायोटिक्स 18 महिन्यांपर्यंत देखील दिली जातात.



संदर्भ

  1. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Q Fever.
  2. National Health Service [Internet]. UK; Q fever.
  3. Maurin M, Raoult D. Q Fever. Clin Microbiol Rev. 1999 Oct;12(4):518-53. PMID: 10515901
  4. Angelakis E,Raoult D. Q Fever. Vet Microbiol. 2010 Jan 27;140(3-4):297-309. PMID: 19875249
  5. SA Health [Internet]. Government of South Africa; Q fever - including symptoms, treatment and prevention.