संधिवाताचा ताप - Rheumatic Fever in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 04, 2019

March 06, 2020

संधिवाताचा ताप
संधिवाताचा ताप

संधिवाताचा ताप म्हणजे काय?

संधिवाताचा ताप हे एक कॉम्प्लिकेशन आहे जे घश्याच्या स्ट्रेप्टोक्कोल संसर्गाचे अपर्याप्त उपचार किंवा उपचार न केल्याने होतो. यामुळे त्वचा, हृदय, सांधे आणि मेंदूचा गंभीर आजार होऊ शकतो. हा संसर्ग मुख्यतः 5 ते 15 वयोगटातील मुलांना प्रभावित करतो. स्ट्रेप्टोकोकल घश्याच्या संसर्ग झाल्यानंतर 14 ते 28 दिवसांनी संधिवाताचा ताप येतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

संधिवाताच्या तापाची चिन्हे आणि लक्षणे खालील प्रमाणे आहेत:

सामान्य:

सांधे संबंधित बदल:

त्वचेशी संबंधित बदल:

 • त्वचेवर वर लम्पस किंवा नोड्यूल्स येणे.
 • पुरळ, विशेषत: धड आणि हाताच्या वरच्या भागावर किंवा पायांवर जे साप किंवा अंगठी सारखे दिसतात.
 • सिडेनहॅम कोरिया एक न्यूरोलॉजिकल विकार आहे ज्यात जलद, झटपट हालचाली होतात आणि हात, पाय आणि चेहऱ्यावर परिणाम होतो.

याचे मुख्य कारणं काय आहेत?

संधिवाताच्या तापाचे मुख्य कारण गट ए स्ट्रेप्टोकोचा संसर्ग आहे (स्ट्रेप्टोकोकस पायोजीन्स). संसर्गसाठी आनुवांशिकदृष्ट्या संवेदनशील अशा यजमानामध्ये संसर्ग असामान्य ऑटोमिम्यून प्रतिसाद (स्ट्रेप्टोकोकस घश्याचा संसर्ग किंवा लोहतांग ज्वर) बनवतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

लक्षणांचा इतिहास घेतल्यानंतर, डॉक्टर त्वचा आणि सांधे यांची पूर्णपणे तपासणी करतात आणि हृदयाच्या आवाजाची तपासणी करतात, त्यानंतर खालील चाचण्या करण्याचा सल्ला देतील:

 • पूर्ण रक्त गणना (सीबीसी).
 • एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट (ईएसआर - सूज तपासण्यासाठी).
 • वारंवार होणारा संसर्ग तपासण्यासाठी अँटी-स्ट्रेप्टोलायसिन ओ (एएसओ) रक्त तपासणी.
 • इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी).
 • निश्चित प्रमुख आणि किरकोळ निकषांचे मूल्यांकन (जोन्स क्रायटेरिया).

संधिवाताच्या तापाचे व्यवस्थापनामध्ये खालील समाविष्ट आहे:

 • संसर्गासाठी, अँटीबायोटिक्स निर्धारित केले जातात, आजाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ते दीर्घ कालावधीसाठी घेण्याचा सल्ला दिला जातो (लहान मुलांसाठी, वय 21 वर्षे, कधीकधी आयुष्यभर देखील घेण्याचा सल्ला दिला जातो).
 • ॲस्पिरिन किंवा कॉर्टिकोस्टिरॉईड्स सारखी औषधे सूज आणि जळजळ यासारख्या लक्षणांपासून आराम मिळण्यासाठी दिले जातात.
 • एखादी व्यक्ती असामान्य हालचाली किंवा वर्तन दर्शवते तेव्हा दौऱ्यांसाठी औषधे निर्धारित केली जातात.संदर्भ

 1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Rheumatic fever.
 2. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Rheumatic fever.
 3. RHDAustralia,Menzies School of Health Research [Internet]: Australian Government Department of Health; What is Rheumatic Heart Disease?
 4. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Rheumatic Fever: All You Need to Know.
 5. National Center for Advancing Translational Studies [Internet]: US Department of Health and Human Services; Rheumatic Fever.

संधिवाताचा ताप साठी औषधे

Medicines listed below are available for संधिवाताचा ताप. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.