सरकॉइडोसिस काय आहे?
सरकॉइडोसिस ही एक असा विकार आहे ज्यात अतिरिक्त वाढीमुळे शरीराच्या टिश्यूमध्ये जास्त करून फुफ्फुसात आणि लिम्फ नोड्समध्ये लाल आणि सूजलेले नोड्यूल (ग्रॅन्युलोमा) आढळतात. सरकॉइडोसिस कोणत्याही वयात होऊ शकतो; परंतु, 20-40 वयोगटातील लोक यासाठी सर्वात जास्त संवेदनशील असतात. काही प्रकरणांमध्ये, यामुळे फुफ्फुसांचा फायब्रॉसिस देखील होऊ शकतो.
असामान्य वाढ (ग्रॅन्युलॉमस) असूनही, सरकॉइडोसिस हा कॅन्सर नाही आणि रुग्णांना 1 ते 3 वर्षात त्यातून बरे वाटू शकते. औषधे विकारांची चिन्हे कमी करण्यास मदत करतात किंवा प्रतिकार प्रणालीला दडपण्यात मदत करतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
याचे प्रारंभिक लक्षण म्हणजे श्वासोच्छ्वासाला धाप लागणे आणि त्यानंतर अचानक रॅशेसचा आघात होऊ शकतो. चेहऱ्यावर आणि हातांवर लाल टेंगुळ, डोळे दुखणे, वजन कमी होणे, रात्रीचे घाम येणे आणि थकवा ही सरकॉइडोसिससाठी इतर लक्षणे आहेत.
या विकाराची इतर लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
- छाती दुखणे.
- धाप लागणे.
- थकवा.
- चेहऱ्यावर सूज.
- संधिवात.
- पायात वेदनादायक गाठी.
- बगलेत, मानेवर आणि जांघेमध्ये अल्वारपणा आणि सूजलेल्या ग्रंथी.
- एरिथिमिया.
- मूतखडे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
हा विकार म्हणजे शरीरातील रोगप्रतिकार आणि संसर्गाविरुद्ध लढणाऱ्या रोगप्रतिकारक प्रणालीचा परिणाम आहे. परिणामी, टिश्यूंना सूज आणि लाली दिसून येते. सरकॉइडोसिसमध्ये, निरोगी टिश्यू आणि अवयवांवर परिणाम दिसतो आणि ग्रॅन्युलोमा उद्भवतात तेव्हा स्थिती जास्त खराब होते आणि अशा प्रकारे ऑटोम्युमिन रोगाची विशिष्ट वैशिष्ट्ये दर्शविते.
पर्यावरण आणि अनुवांशिक घटक ही विकाराचे प्रमुख कारणं असल्याचे मानले जाते. म्हणून, हा विकार संक्रामक नाही आहे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
विकाराचे निदान वैद्यकीय इतिहास, शारीरिक तपासणी आणि छातीचा एक्स-रेवर आधारित केले जाते . क्षयरोग, बुरशीजन्य संसर्ग, संधिवाताचा ताप आणि लिम्फ कॅन्सर यासारख्या विकारांची शक्यता फेटाळण्यासाठी हे उपयोगी ठरते.
फुफ्फुसाच्या सरकॉइडोसिसच्या तपासणीसाठी, फुफ्फुसाचा सीटी स्कॅन करण्याचे सुचवले जाते.
प्रोड्निसोन सारख्या कॉर्टिकोस्टिरॉईड्स हे दाह आणि ग्रॅन्युलोमाचा उपचार करण्यासाठी प्रभावी असतात. आणखी एक पर्याय म्हणजे प्रभावित शरीराच्या अवयवांचे कार्य सुरु ठेवावे आणि विकारांची लक्षणे हाताळावेत. हा विकार स्वतःच कमी होऊ शकतो. म्हणून, डॉक्टर उपचार सुरू करण्याची अचूक वेळ सांगू शकत नाहीत.
वरील सर्व असूनही, सरकॉइडोसिसच्या विकाराचे परीक्षण करण्यासाठी आणि उपचार पुन्हा समायोजित करण्यासाठी डॉक्टरांनी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कॉर्टिकोस्टेरॉईड्सच्या इतर साइड इफेक्ट्समध्ये मूड स्विंग्स, फ्लुइड रिटेन्शन, हाय ब्लड शुगर होऊ शकते. त्यांच्या दीर्घकालीन वापरामुळे हाडांची ताकद कमी होऊ शकते आणि अल्सर होऊ शकतात. म्हणूनच, औषधाचे सर्वोत्तम फायदे मिळविण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेला डोज घ्यावा.