सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर म्हणजे काय?
सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डरला सॅड असेही म्हटले जाते, नावामध्ये सुचवल्याप्रमाणेच हा एक निराशाजनक विकार असून तो वातावरणातील बदलांमुळे होतो. बहुतेकदा हा विकार हिवाळ्याच्या आसपास उद्भवतो त्यामुळे यास विंटर डिप्रेशन किंवा विंटर ब्लुज असेही म्हणतात. हा विकार सहसा शरद ऋतुत उशीरा सुरु होतो आणि हिवाळ्याच्या सुरवातीस संपतो. उन्हाळ्यामध्ये या घटना कमी होतात. हा विकार महिला, किशोरवयीन मुले आणि विषुवृत्तापासून दूर राहणाऱ्या लोकांना अधिक प्रमाणात होतो. पुनर्दशी अभ्यासात याचा प्रसार 0%-6.9% या श्रेणीत दिसून आला आहे.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
लक्षणे ही नॉन सीझनर नैराश्याशी मिळतीजुळतीच असतात, सॅडच्या महत्वाच्या लक्षणांमध्ये पुढील लक्षणांचा समावेश होतो:
- गंभीर नैराश्य.
- नेहमी दुखी राहणे.
- नकारात्मक विचार.
- ऊर्जेची कमतरता.
- अधिक प्रमाणात कार्बोहायड्रेट असलेले अन्न खाण्याची इच्छा होणे.
- अनिद्रा.
- एकाग्रतेत अडथळा येणे.
हिवाळ्यादरम्यान परिणाम होणाऱ्या सॅड मध्ये पुढील लक्षणे दिसून येतात:
- ऊर्जेची कमतरता.
- दिवसा अतिप्रमाणात झोपणे.
- भूकेत वाढ.
- लोकांपासून दूर राहणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
सॅडचे कारण अजून स्पष्ट नाही आहे. आनुवंशिक असामान्यता सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डरसाठी कारणीभूत असू शकतात.
जोखीमकारक घटकांमध्ये पुढील समावेश होतो:
- पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा विकार होण्याचा धोका चौपट आहे.
- उत्तर किंवा दक्षिण ध्रुवाजवळ राहणाऱ्या लोकांना हा विकार होण्याची शक्यता जास्त असते.
- ज्यांना सॅडचा कौटुंबिक इतिहास आहे ते या परिस्थितीस प्रवृत्त होतात.
- प्रौढांपेक्षा तरुणांवर या परिस्थितीचा परिणाम जास्त प्रमाणात होतो.
- व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचेही निराशाजनक घटनांमध्ये परिवर्तन होऊ शकते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
सॅड चे निदान हे निराशाजनक लक्षणांचे निरीक्षण केल्यावर आणि निराशाजनक विकृतीचे सर्व मापदंड तपासून पाहिल्यावर केले जाते. रुग्णाच्या मानसिक आरोग्याचे विश्लेषण करण्यासाठी प्रश्नावलीचा वापर केला जाऊ शकतो.
सॅडच्या उपचारासाठी सर्वाधिक प्रचलित पद्धत लाईट थेरपी आहे. परिणामकारक निकालासाठी ही थेरपी रोज करण्याचे सुचवतात आणि ती मानसिक आजारांच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच केली पाहिजे. पुढील पद्धत ही अँटी डिप्रेससिव्ह औषधांचा वापर करून लक्षणांची काळजी घेणे आणि दीर्घ काळासाठी लाभ देणे ही आहे. संज्ञानात्मक वर्तनात्मक थेरपी (सीबीटी) ही थेरपी विचार प्रक्रियांचे निरीक्षण करण्यासाठी आणि सकारात्मक विचार प्रदान करण्यासाठी वापरली जाऊ शकते. व्हिटॅमिन डी चा पुरवठा करणारे सप्लिमेंट्स दिले जाऊ शकतात.
सॅड हा निराशाजनक विकार हवामानातील बदलामुळे लवकर लक्षात येत असल्याने त्याची काळजी घेणे सोपे असते. त्वरित विकार ओळखणे हे रोगमुक्तीसाठी मदत करू शकते.