त्वचेतील रंगबदल काय आहे?
त्वचेतील रंगबदल म्हणजे त्वचेच्या रंगात अनियमित डाग. त्वचेचा रंगबदल होणे ही साधारणपणे सामान्य समस्या असून दुखापत, दाहकता किंवा काही गंभीर आजारांसारख्या विविध कारणांमुळे ही समस्या उद्भवू शकते. त्वचेमध्ये मेलेनिनच्या पातळीमुळे त्वचेचा रंग बदलू शकतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
कारणावर अवलंबून, पॅचेसमध्ये त्वचेचा रंगबदल होतो, प्रत्येकाची लक्षणं भिन्न असू शकतात, ज्यात खालील लक्षणं समाविष्ट आहेत:
- त्वचेवर गडद किंवा सौम्य रंगाचे किंवा दोन्ही प्रकारचे पॅच.
- खाज.
- लालसरपणा.
- पॅचवर संवेदना कमी किंवा नाहीशी होणे.
- हायपरएथेशिया (वाढलेली संवेदनशीलता).
याची मुख्य कारणं काय आहेत?
त्वचेचा रंग बऱ्याच कारणांमुळे बदलू शकतो, जे साध्या ॲलर्जीपासून गंभीर स्वरुपाच्या ऑटोम्यून्यून रोगांपर्यंत असतात. काही सामान्य कारणांमध्ये खालील समाविष्ट आहेत:
- ॲलर्जी.
- कॉन्टॅक्ट डर्मटायटिस.
- एक्झिमा.
- संसर्ग.
- बॅक्टेरियल संसर्ग.
- फंगल/ बुरशीजन्य संसर्ग (रिंगवर्म, टिनिया व्हिक्सीलोर, कॅन्डिडा).
- भाजणे.
- ऑटोमिम्यून रोग.
- सिस्टेमिक ल्यूपस एरिथेमाटोसस.
- ग्रेव्हचा विकार.
- जन्मखुणा.
- तीळ.
- स्ट्रॉबेरी नेव्हस.
- पोर्ट वाइन डाग.
- मंगोलियन निळे डाग.
- हार्मोनल समस्या.
- मेलासिम.
- चोलस्मा.
- त्वचेचा कॅन्सर.
- बेसल सेल कार्सिनोमा.
- स्क्वॅमस सेल कार्सिनोमा.
- मेलानोमा.
- दुखापत.
- रॉसकिआ.
- रेडिएशन थेरेपी.
- व्हिटिलिगो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
वैद्यकीय इतिहासासह त्वचेचा रंगबदल होण्याची योग्य चिकित्सा तपासणी सहसा निदान सूचित करते, पण निदानाची पुष्टी करण्यासाठी आणि योग्य उपचार देण्यासाठी काही तपासणी आवश्यक असतात. या तपासणीत हे समाविष्ट आहे:
- रक्त तपासणी - ॲलर्जी आणि ऑटोमिम्यून रोगांची तपासणी करण्यासाठी काही तपासणी. या तपासांमध्ये संपूर्ण रक्त पेशीगणना (सीबीसी), सी-रीएक्टिव्ह प्रोटीन (सीआरपी), अँटी-न्यूक्लियर अँटीबॉडीज (एएनए) समाविष्ट आहे.
- वूड्स लॅम्प एक्झामिनेशन - ही चाचणी बॅक्टेरियल आणि फंगल संसर्ग ओळखण्यात मदत करते.
- त्वचेची बायोप्सी - यात मायक्रोस्कोपखाली पेशींचे परीक्षण केले जाते.
उपचाराचे मापदंड पूर्णपणे रोगाच्या कारणांवर अवलंबून असतात. एकदा कारण सापडले की निराकरण करणे सोपे होते. उपचाराचा मूळ उद्देश रोगाचा नायनाट करणे आहे, जे आपोआपच त्वचेचा रंगबदल दूर करेल. परंतु, बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत हे शक्य होत नाही. अशी काही औषधे आहेत जी या रंगबदल दूर करण्यात मदत करतात, ज्यात खालील समाविष्ट असतात:
- स्थानिक अनुप्रयोग - व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई किंवा हायड्रोक्वीनोनचे टॉपिकल अप्लिकेशन गडद पॅच साफ करण्यात मदत करतात.
- रासायनिकरित्या सोलणे- ग्लायकोलिक ॲसिड किंवा सॅलिसिक ॲसिडसारखे काही रसायने त्वचेचा बाह्य स्तर (जिथे सामान्यतः रंगबदल झालेला असतो) काढण्यात मदत करतात.
- लेझर थेरपी - लेझर थेरेपीमुळे गडद पॅच लाइट करण्यास मदत होते.