झोपेचा अभाव म्हणजे काय?
झोपेचा अभाव म्हणजे पुरेशी झोप न होणे, हे बऱ्याच कारणांमुळे होते. हा रोग नाही तर एक लक्षण आहे, हे वेगवेगळ्या रोगांमुळे किंवा जीवनशैलीमुळे होते, यामुळे आपल्या झोपेच्या पॅटर्नमध्ये अडथळा येतो. झोपेच्या अभावामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात आणि म्हणून त्याचे लवकर उपचार केले गेले पाहिजेत.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
झोपच्या अभावात दिसणारी मुख्य चिन्हे आणि लक्षणे अशी आहेत:
- झोपण्यात अडचण.
- चिडचिडा स्वभाव.
- लक्ष नसणे.
- लवकर उठणे.
- दिवसा वारंवार झोपणे.
- उठल्यावर ताजेतवाने न वाटणे.
- निर्णय आणि विचार करताना त्रुटी.
- घोरणे.
पाच सामान्य झोपेच्या विकारांमध्ये खालील समाविष्ट आहे:
- झोप येण्यात अडथळा किंवा इन्सोमेनिया.
- श्वास घेण्यात अडथळा किंवा स्लीप अॅप्निया.
- दिवसा जास्त झोपणे किंवा नार्कोलेप्सी.
- रेस्टलेस लेग सिंड्रोममुळे पायाची अनियंत्रित हालचाल.
- रॅपिड आय मुव्हमेंट झोपेचा विकार.
याची मुख्य कारणं काय आहेत?
झोपेमध्ये अडथळे येण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी खालील याची मुख्य कारणे आहेत:
- कामाच्या ठिकाणी अनियमितता किंवा रात्रपाळ्या.
- जास्त कामाचे तास.
- दमा.
- निराशा किंवा चिंता.
- मद्यपान.
- तणाव.
- काही औषधे.
- अनुवांशिक इतिहास.
- वृध्दापकाळ.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
तपासणी पूर्वी डॉक्टर रात्रीच्या झोपण्याच्या इतिहासाविषयी काही प्रश्न विचारतात आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना, रात्रीच्या वेळी तुमच्या झोपण्याबद्दल विचारतात.
झोपेचा नमुना तपासण्यासाठी आणि दिलेल्या माहितीनुसार स्थितीचे निदान करण्यासाठी माहिती डायरीत लिहून ठेवण्यास सांगितले जाऊ शकते. झोपेच्या अभावासाठी शांतता देणारी औषधे दिली जाऊ शकतात, पण जर ही औषधे कमी प्रभावकारक असतील तर, औषधां व्यतिरिक्त इतर पद्धती वापरल्या जाऊ शकतात, या पद्धती खालीलप्रमाणे आहेत:
स्वत:च्या काळजीच्या टिप्स:
- स्वत:ला विश्रांती देऊन झोपण्याच्या व्यवस्था करा.
- सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट बंद करा आणि आपल्या बिछान्यापासून दूर ठेवा.
- झोपेत सुधारणा करण्यासाठी विश्रांती तंत्राचा वापर करा.
- झोपण्याची आणि उठण्याची विशिष्ट वेळ ठरवून झोपेचे शेड्यूल बनवा.
- हलका नाश्ता करा किंवा दूध प्या, जे झोपण्यास मदत करेल.
- अंथरूणावर जाण्याआधी जास्त खाऊ नका आणि जास्त द्रव्यपदार्थ पिऊ नका.
- आपल्या अंथरूणावर मोबाइल फोन किंवा लॅपटॉप वापरणे टाळा कारण ते आपल्या झोपमध्ये व्यत्यय आणू शकतात.
- संध्याकाळी धूम्रपान, दारू पिणे, चहा, कॉफी किंवा इतर उत्तेजक पदार्थ टाळा.
- झोपेच्या गोळ्यांवरील अवलंबन कमी करा.
- झोपण्या व्यतिरिक्त बेडरुममध्ये, विशेषतः अंथरुणावर काहीही करू नका.