सॉफ्ट-टिश्यू सारकोमा काय आहे?
सॉफ्ट-टिश्यू सारकोमा हा एक व्यापक शब्द आहे जो शरीराच्या संयोजी पेशींना प्रभावित करणाऱ्या दुर्मिळ कॅन्सरच्या गटासाठी वापरला जातो. प्रभावित सॉफ्ट टिश्यूचे स्थान आणि प्रकारावर अवलंबून अनेक प्रकारचे सॉफ्ट टिश्यू सारकोमा आहेत.
शरीराच्या संयोजी टिश्यूमध्ये रक्तवाहिन्या, स्नायू, चरबी, स्नायूबंध, अस्थिबंध, खोल त्वचा, आणि नसा यांचा समावेश असतो.
हा सारकोमा (कॅन्सरचा ट्यूमर) हात, पाय, धड आणि डोके व मान यापैकी कोणत्याही भागात होऊ शकतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
- लक्षणांची सुरुवात हळूहळू होण्याची शक्यता असते, म्हणून रोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेत कदाचित रुग्णाच्या हे लक्षात येत नाही.
- ट्यूमरचा आकार वाढत असल्याने, मूलभूत संरचनेवर आक्रमण होते, ज्यामुळे मुळे वेदना होऊ शकतात.
- जर सारकोमा फुफ्फुसांच्या जवळ छातीच्या भागात असेल तर रुग्णाला श्वास घेण्यात अडचण होऊ शकते.
- ओटीपोटातील सॉफ्ट टिश्यू सारकोमा मुळे पोटाच्या वेदना किंवा पेटाक्यांसह जाणवू शकतो.
- उलटीत रक्त पडणे, भूक न लागणे, अशक्तपणा आणि ताप येणे हे सॉफ्ट टिश्यू सारकोमाचे इतर सामान्य लक्षण आहेत.
याची मुख्य कारणं काय आहेत?
- सारकोमा आजार होण्याला एखादे विशिष्ट कारण नसते.
- काही रुग्णांच्या बाबतीत कारण कदाचित आनुवांशिक असू शकते किंवा सारकोमा कौटुंबिक इतिहासाशी तो जोडला जाऊ शकतो.
- एखाद्या व्यक्तीला इतर कॅन्सरच्या रेडिएशन थेरेपीचा उपचार दिला तर रेडिओ थेरेपीच्या प्रतिकूल प्रभावामुळे सारकोमा होऊ शकतो.
- आर्सेनिक आणि हर्बिसाइडसारख्या रसायनांच्या सान्निध्यात आल्याने सॉफ्ट-टिश्यू सारकोमाचा विकार होण्याची शक्यता वाढते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
- सारकोमा ओळखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सामान्य तपासण्यांमध्ये कॉम्प्युटेड टोमोग्राफी, एक्स-रे, मॅग्नेटिक रेसोनन्स इमेजिंग आणि अल्ट्रासाऊंड यांचा समावेश होतो.
- बायोप्सी, ज्यात ट्यूमरच्या टिश्यूचा नमुना तपासला जातो, तो ट्यूमरच्या घातक (कॅन्सरसारख्या) स्वरुपाची पुष्टी करण्यासाठी मदत करतो.
उपचार:
- घातक ट्यूमरचा उपचारात ट्यूमरची शल्यक्रिया करून तो काढून टाकणे समाविष्ट असते. शस्त्रक्रियेत, निरोगी टिश्यूच्या आसपासचा प्रभावित भाग काढला जाऊ शकतो.
- कधीकधी, जर सारकोमा एखाद्या अवयवावर असेल तर अंगच्छेदन होण्याच्या धोक्याला मात करण्यासाठी शस्त्रक्रिया टाळली जाते.
- शल्यक्रियेने ट्यूमर काढून टाकण्यापूर्वी त्याचा आकार लहान करण्यासाठी रेडिएशन थेरपी देखील वापरली जाते.
- सांधे दुखी, सूज यासारखे रेडिएशनचे साइड इफेक्ट्स आहेत.
- नसातून दिली जाणारी औषधे किंवा गोळ्याच्या स्वरूपात किमोथेरपी देखील सारकोमाच्या उपचारांसाठी वापरली जाऊ शकते.
- अंतिम उपचार योजना सारकोमा चा प्रकार, ट्यूमरचा आकार आणि रुग्णाची संपूर्ण स्थिती यावर अवलंबून असते.