सारांश
पोटदुखी म्हणजे उदरक्षेत्रामधील( छाती आणि मांडींच्या सांध्यामधील क्षेत्र) वेदना. पोटामध्ये जठराशिवाय इतरही अवयवे असतात उदा. यकृत,स्वादुपिंड, पित्ताशय, आतडी, जननेंद्रिये,मूत्राशय इत्यादी असतात. म्हणून, या अवयवांपैकी कोणत्याच्याही बिघाड, इजा, संक्रमण किंवा जळजळ (सूज) यामुळे पोटदुखी होऊ शकते.
प्रत्येकजण, कोणत्या न कोणत्या वेळी, पोटदुखीला सामोरे गेलेलाच असतो. ती खूप सामान्य, साधारणपणें थोडा वेळ टिकणारी असते आणि बहुधा गंभीरही नसते. पण, काही वेळा ती एखाद्या गंभीर अंतर्निहित वैद्यकीय परिस्थितीचे सूचक ठरू शकते.
उपचार विशिष्ट अंतर्निहित कारणावर अवलंबून, पोटदुखीवर केले जाते. त्यामध्ये औषधे, शरिरातील तरळ पदार्थांचे प्रत्यांतरण, स्वयंकाळजी उदा. विश्रांती आणि दुर्मिळरीत्या, शस्त्रक्रिया सामील असते.