टिटॅनस म्हणजे काय?
टिटॅनस किंवा लॉकजॉ ही एक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे ज्यात क्लॉस्ट्रिडियम टेटानी नावाच्या जीवाणूमुळे ताज्या किंवा उघड्या जखमे वर संसर्ग होतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
टिटॅनसचे मुख्य चिन्ह जबडयाच्या स्नायूंच्या कडकपणा आहे, म्हणूनच त्याला लॉकजॉ असेही म्हणतात. जखमेच्या आजूबाजूला आणि स्नायूंमध्ये दुखणे देखील दिसून येते. टिटॅनसचे इतर प्रमुख लक्षणे खालील प्रमाणे आहेत:
- अतिसार.
- शरीराचे उच्च तापमान.
- डोकेदुखी आणि घाम येणे.
- स्नायूंचे हिसकणे आणि जोरात खेचणे.
- गिळायला त्रास होणे.
- उच्च रक्तदाब.
- हृदयाचे ठोके वाढणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
टेटॅनस क्लॉस्ट्रिडियम टेटानी जिवाणू पासून विषारी पदार्थांच्या निर्मितीमुळे होतो. हे जिवाणू शरीराच्या बाहेर बराच वेळ जगू शकतात.ते जमिनीत किंवा प्राण्यांचा खतात राहतात. हे जिवाणू मानवी शरीरात कापलेल्या जागेमधून किंवा जखमेच्या माध्यमातून प्रवेश करतात आणि वेगाने वाढतात, सुमारे 3 ते 21 दिवसांनी. हे एक टॉक्सिन बनवतात ज्यामुळे नसा प्रभावित होतात आणि हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
एखाद्या व्यक्तीला वर उल्लेख केलेल्या लक्षणांचा अनुभवला होत असेल किंवा अलीकडील इजा झाल्याने किंवा भाजल्या ने अचानक स्नायूंच्या स्पॅझम होत असेल तर डॉक्टरांनुसार टिटॅनसची शक्यता असू शकते. डॉक्टर टिटॅनसची लस घेतली आहे का किंवा बूस्टर शॉट बाकी आहे का हे प्रश्न विचारतील. टेटॅनसच्या निदानची पुष्टी करणारी कोणतीही चाचणी किंवा परीक्षा नसल्याने उपचार लक्षणे आणि रोगप्रतिकारक इतिहासावर आधारित असतात. संसर्गा विरूद्ध प्रतिबंधक उपायांमध्ये जखमांची काळजी घेणे आणि टिटॅनस लसीकरण करणे समाविष्ट आहे. टिटॅनस एक वैद्यकीय इमरजन्सी असून ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल होणे आणि गहन वैद्यकीय उपचार करवणे आवश्यक असते. एखाद्या व्यक्तीला जिवाणूंचा संसर्ग झाल्यास, टिटॅनस इम्युनोग्लोबुलिन (बॅक्टेरियाचा नाश करण्यासाठी अँटीबॉडीज) आणि पेनिसिलिनसारखे अँटीबायोटिक्स आणि स्नायू शिथिलताचे औषधे दिली जातात. गंभीर संसर्गाच्या बाबतीत, श्वास घेण्यास मदत करण्यासाठी व्हेंटिलेटरची आवश्यकता भासू शकते.