घशाचा कॅन्सर - Throat Cancer in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

December 20, 2018

September 09, 2020

घशाचा कॅन्सर
घशाचा कॅन्सर

सारांश

घशाचा कर्करोग हेड एंड नेक कॅंसरचा एक प्रकार असतो, ज्यामध्ये घशाच्या विभिन्न भागांमध्ये कोशिकांची अनियंत्रित वाढ होते. प्रभावित घशाच्या भागावरून घशाच्या कर्करोगाची वेगवेगळी नावे असू शकतात. त्याची प्राथमिक लक्षणे म्हणजे खाणें किंवा गिळणें कठिन जाणें, बोलण्यास कठिनता येणें आणि सतत खोकला येणें. वय, लिंग आणि हे काय, तर जनुकीय समस्यासुद्धा एका व्यक्तीला घशाचे कर्करोग होण्यातील धोक्याचे घटक असू शकतात. घशाच्या कर्करोगाशी तंबाखूचे वापर आणि अत्यधिक मद्य पानाचाही संबंध आहे. निवारण सुद्धा महत्त्वाचे आहे; कोणत्या प्रकारचे घशाचे कर्करोग टाळण्याच्या प्रमुख पद्धती म्हणजे अल्कोहल व तंबाखू यांसारखी धोक्याची घटके टाळणें. घशाच्या कर्करोगाचे निदान शारीरिक चाचणी, रक्त तपासणी, इमेजिंग चाचणी आणि बायोप्सीने केले जाऊ शकते. यावरील उपचाराच्या पर्यायांमध्ये कीमोथॅरपी, विकिरण पद्धत, परिलक्षित पद्धत आणि शस्त्रक्रिया सामील आहेत. व्यापक कर्करोग उपचारामध्ये अनेक सहप्रभावही असतात. हे सहप्रभाव डॉक्टर, सल्लागार आणि कुटुंबीयांच्या मदतीने हाताळण्यास अधिक सोपे असतात. कर्करोगाचे निदान रुग्णामध्ये सुरवातीच्या टप्प्यालाच झाले, तर त्याची वाचण्याची शक्यता अधिक असते.

घशाचा कॅन्सर (घसा कॅन्सर) ची लक्षणे - Symptoms of Throat Cancer in Marathi

घशाच्या कर्करोगाची लक्षणे कर्करोगाचे स्थान आणि चरण यावर अवलंबून असतात. घशाच्या कर्करोगांमधील काही सुरवातीची लक्षणे म्हणजे:

  • आवाजात बदल होणें (घोगरेपणा किंवा बोलण्यास अवघड जाणें ).
  • प्रलंबित खोकला असणें.
  • घसा दुखणें
  • घशात दुखणें.
  • गिळण्यास अडचण येणें
  • घशात डिखळ  होणें
  • अचानक शरिराचे वजन घटणें
  • डोळे, जबडा आणि घशात सूज होणें
  • थुंकीत रक्त येणें
  • कान मध्ये वेदना
  • कानात वेदना होणें
  • घशामध्ये निष्कारण काहीतरी अडकल्यासारखे वाटणे.

अधिकतर लक्षणांसोबत सामान्य घशातील संक्रमणांची गल्लत होऊ शकते. तरीही, घशातील कर्करोगाची प्रलंबित लक्षणे असतात, जी शरिरातील कर्करोगाच्या प्रगतीसोबतच तीव्र होतात.

घशाचा कॅन्सर (घसा कॅन्सर) चा उपचार - Treatment of Throat Cancer in Marathi

घशाच्या कर्करोगाच्या उपचाराचे क्रम कर्करोगाचे स्थान, प्रकार आणि आकारावर अवलंबून असते. घशाच्या कर्करोगावरील उपचाराच्या पर्यायांमध्ये सामील असतात:

  • विकिरण पद्धत
    घशाच्या कर्करोगासाठीच्या विकिरण पद्धतीमध्ये गामा किरणांसारख्या किरणांच्या नियंत्रित मात्रांचे वापर करून विशिष्ट भागांमध्ये घशाच्या कर्करोगाच्या कोशिकांना लक्ष करून नष्ट केले जाते.
  • कीमोथेरपी
    कीमोथेरपीमध्ये काही विशिष्ट औषधांचे वापर केले जाते, जे घशाच्या कर्करोगाच्या कोशिका नष्ट करण्यात सहायक असतात. कीमोथेरपी घशाच्या कर्करोगाच्या उपचारासाठी प्रकाश विकिरणासह सहकारी पद्धत म्हणून वापरले जाते.
  • शस्त्रक्रिया
    शस्त्रक्रियेद्वारे, घशाच्या कर्करोगाची गाठ काढली जाऊ शकते. गाठापासून मुक्तता मिळण्यासाठी, थायरॉयडसारखे इतर तंतू अथवा भाग काढण्याची गरज पडू शकते. हे विकसित होणार्र्या गाठीच्या आकारावर अवलंबून असते. घशाच्या कर्करोगाचा पसार पुढे टाळण्यासाठी शेजारील लिंफ ग्रंथीसुद्धा काढाव्या लागू शकतात.
  • मल्टीमॉडलिटी उपचार
    यामध्ये शस्त्रक्रियेनंतर प्रकाश विकिरण किंवा केमोथेरपी याचे वापर केले जाते. हे साधारणपणे मोठ्या गाठींसाठी केले जाते.
  • पुनवर्सन उपचार
    पुनर्वसन उपचार कर्करोगाच्या वैद्यकीय उपचारासोबतच चालू राहते. यामध्ये आहार, वाचा आणि मानसिक आरोग्यासंबंधी मदत सामील असते. सल्लागार, सामाजिक कार्यकर्ते आणि मानसशास्त्रज्ञ व्यापक कर्करोग उपचारातील मानसिक तणावापासून पुनर्लाभ होण्यात व्यक्तीला मदत करू शकते. 

उपचार पद्धतींचे सहप्रभाव याप्रमाणे आहेत:

  • मळमळ आणि उलटी
     मळमळ व उलटी केमोथेरपीतील औषधे आणि प्रकाश विकिरण उपचारामुळे होतात.
  • बोलण्यात कठीणता
    घशावरील शस्त्रक्रियेचे वाचेवर प्रभाव पडू शकते. आवाजेतील आकस्मिक बदल यांसारखे सहप्रभाव होऊ शकतात, जे वेळेसोबत बरे होतात अथवा होत नाहीत.
  • वण उठणें
    उपचार म्हणून घशाच्या इतर भागांतील तंतू काढून टाकल्यास, वण उठणें किंवा काही प्रमाणात आकारात बदल होऊ शकते. 

जीवनशैली व्यवस्थापन

काही वेळेस, घशाचे कर्करोग प्रगत असू शकेल आणि निश्चित उपचार संभव नसतो. अशा वेळेस,वेदना व लक्षणे शमवण्यासाठी दुःखशामक काळजीची गरज पडते. दुःखशामक काळजीचे काही पैलू म्हणजे:

  • वेदना व्यवस्थापन 
    वेदना व्यवस्थापनाचे नियोजन व्यक्तीच्या आवश्यकता  व उपचाराची गहनता लक्षात घेऊन केले जाते. कर्करोगाच्या वेदनेत आराम मिळण्यासाठी औषधे वापरली जाऊ शकतात.
  • रुग्णाच्या कुटुंबीयांकडून समर्थन  
    याची महत्त्वाची भूमिका असते, कारण कुटुंबीय आणि मित्रांकडून मिळणारे समर्थन उपचारातून जाण्यासाठी मोलाचे असतात.
  • समुपदेशन
    कर्करोगाच्या रुग्णांशी व्यवहार करण्यात प्राविण्य असलेल्या व्यावसायिक मानसशास्त्रज्ञाकडून समुपदेशन मिळणें मानसिक आजारात खूप महत्वाचे असू शकते. आराम मिळण्यासाठी मानसशास्त्रीय एवढेच नाही तर आध्यात्मिक समुपदेशनाचीही मदत मिळू शकते.

घशाच्या कर्करोगावरील उपचाराच्या क्रमामध्ये खालील सहप्रभाव होऊ शकतात, ज्यांमध्ये काळजीची गरज असते:

  • कर्करोग उपचारात येणार्र्या थकव्यावर उपाय म्हणून, अधिक श्रम नसणारे सौम्य व्यायाम उदा. थोडा वेळ बाहेर पायी चालणें किंवा इतर गतिविधी केल्या जाऊ शकतात.
  • कर्करोग उपचाराचे रुग्णाच्या स्मरणशक्तीवरही प्रभाव पडते. कर्करोग असलेले लोक त्यांना करायच्या गोष्टी व काम लिहून ठेवू शकतात. खरेदी किंवा वाहन चालवण्यासारखी कामे करण्याकरिता मित्र व कुटुंबीयांची मदत घेतली जाऊ शकते.
  • घशाच्या कर्करोगावरील उपचारानंतर नियमित तपासणी करून घ्यावी. तुमच्या डॉक्टरांना भेटायचे दर काही महिन्यांनी ठरवले जाऊ शकते, जेणेकरून इतर काही चालू कर्करोगाच्या लक्षणांच्या प्रगतीची चाचणी व प्रबंधन केले जाऊ शकेल.
myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Energy & Power Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This Ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for problems like physical and sexual weakness and fatigue, with good results.
Power Capsule For Men
₹799  ₹799  0% OFF
BUY NOW

घशाचा कर्करोग (घसा कॅन्सर) काय आहे - What is Throat Cancer in Marathi

घशाचे कर्करोग म्हणजे घशातील कर्करोग कोशिका किंवा असमान्य कोशिकांमधील वाढ, ज्याच्या परिणामी बोलणें आणि खाणें अवघड होण्यासह अनेक समस्या होतात. हे आजार लहान आकाराने सुरू होऊन, वेळेसह मोठे आकार धरू शकते. घशाचे कर्करोग  लॅरिंक्स, फॅरिंक्स किंवा घशाच्या इतर भागांवर प्रभाव टाकू शकतो.



संदर्भ

  1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Throat Cancer
  2. National Cancer Institute [Internet]. Bethesda (MD): U.S. Department of Health and Human Services; Head and Neck Cancers
  3. Sloan Kettering cancer institute. [Internet]. Gerstner Sloan Kettering Graduate School of Biomedical Sciences. Throat Cancer Stages Share.
  4. Healthdirect Australia. Throat Cancer. Australian government: Department of Health
  5. American Cancer Society [internet]. Atlanta (GA), USA; Can Laryngeal and Hypopharyngeal Cancers Be Prevented?
  6. American Cancer Society [internet]. Atlanta (GA), USA; Living as a Laryngeal or Hypopharyngeal Cancer Survivor
  7. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Throat or larynx cancer