थायरॉईडचा कॅन्सर म्हणजे काय?
थायरॉईडचा कॅन्सर हा थायरॉईड ग्रंथीचा कॅन्सर आहे.ही ग्रंथी गळ्याच्या पुढच्या भागामध्ये लॅरेन्क्स खाली असते. थायरॉईड ग्रंथी शरीरातील विविध चयापचय क्रियांच्या नियमनासाठी जबाबदार असते.या ग्रंथीच्या पेशींची अनियंत्रित वाढ झाल्याने परिणामी गाठ किंवा ट्यूमर तयार होतो ज्यामुळे थायरॉईडचा कॅन्सर होतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
थायरॉईड कॅन्सरच्या सर्व प्रकरणांमध्ये सुरुवातीपासून लक्षणे दिसून येत नाहीत; पण, थायरॉईड कॅन्सरची सर्वात कॉमन चिन्हे आणि लक्षणे खालील प्रमाणे आहेत :
- मानेला समोर गाठ (बऱ्याच जणांच्या बाबतीत दिसत नाही).
- श्वास घ्यायला किंवा गिळायला त्रास होणे.
- आवाजात घोगरेपणा.
- घसा किंवा माने मध्ये वेदना आणि खोकला.
- केस गळणे.
- वजन आणि भूक कमी होणे.
- घश्याच्या भागाला सूज.
- घाम येणे.
- उष्ण हवामान न सहन होणे.
- मासिक पाळीत अनियमितता.
याची मुख्य कारणं काय आहेत?
थायरॉईड कॅन्सरसाठी काही अनुवांशिक घटक किंवा जीन्स कारणीभूत घटक मानले जातात; मात्र, थायरॉईड कॅन्सरचे मुख्य कारण अज्ञात आहे. थायरॉईड कॅन्सरच्या सर्व प्रकरणांमध्ये बऱ्याच सामान्य घटकांची नोंद केली जाते ज्यामुळे थायरॉईड कॅन्सर होतो.
त्यात ऑन्कोजीन आणि ट्यूमर दडपणाऱ्या जीन्समधील असंतुलन हे एक महत्त्वाचे घटक आहे. मानवी शरीरात कॅन्सरच्या पेशींच्या वाढीसाठी ऑन्कोजीन जबाबदार असतात. तर ट्यूमर दडपणाऱ्या जीन्स यांची वाढ मंदावतात किंवा त्यांना नष्ट करतात. परिणामी ट्युमरची वाढ नियंत्रित केली जाते.
थायरॉईड कॅन्सरच्या वाढीला कारणीभूत इतर घटक खालीलप्रमाणे आहेत:
- लठ्ठपणा.
- थायरॉईड कॅन्सरचा अनुवांशिक इतिहास.
- रेडिएशनशी संपर्क.
- एकाच कुटुंबातील अनेकांना एडेनोमॅटस पॉलीपॉसिस हा अनुवांशिकतेने झालेला विकार.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
एखाद्या व्यक्तीत थायरॉईड कॅन्सरचे चिन्हे किंवा लक्षणे दिसल्यास, त्वरित डॉक्टरकडे जाणे महत्त्वाचे आहे. ठराविक कारण शोधण्यासाठी आणि संभाव्य थायरॉईड कॅन्सरची तपासणी करण्यासाठी काही चाचण्या आहेत. या चाचण्यांमध्ये खालील प्रमाणे आहेत:
- रक्त तपासणी - रक्तवाहिन्यामध्ये थायरॉईड संप्रेरकांची असामान्य पातळी तपासण्यासाठी थायरॉईड फंक्शन टेस्ट म्हणून ओळखले जाणारे रक्त परीक्षण. वाढलेली पातळी थायरॉईड कॅन्सरच्या संभाव्य स्थितीचा इशारा करते.
- बायोप्सी.
- एमआरआय स्कॅन.
- सीटी स्कॅन.
एखाद्या व्यक्तीला थायरॉईड कॅन्सर झाला आहे हे निश्चित झाले की, डॉक्टर त्याची स्टेज निश्चित करतात (कॅन्सरची तीव्रता आणि प्रमाण निर्धारित करतात) आणि त्यानुसार उपचार केले जातात. थायरॉईड कॅन्सरच्या बाबतीत काही मूलभूत आणि सर्वात सामान्य उपचार प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
- रेडिओॲक्टिव आयोडीन उपचार.
- थायरॉयडेक्टॉमी - थायरॉईड किंवा त्यातील काही भाग काढून टाकण्यासाठी सर्जरी.
- रेडिओथेरेपी.
- किमोथेरपी.