कान वाजणे काय आहे?
कान वाजण्याची लक्षणे दिसणे याला वैद्यकीय भाषेत टिनीटस असे म्हटले जाते. यामध्ये कोणत्याही बाह्य कारणाशिवाय, एका किंवा दोन्ही कानांमध्ये असामान्य किंवा नेहमीपेक्षा वेगळा घंट्यांचा किंवा गुणगुणण्याचा आवाज येत राहतो. हा आवाज गर्जनेसारखा, क्लिकसारखा किंवा फुसफुसण्यासारखा वाटू शकतो. हा सौम्य किंवा मोठा असू शकतो. टिनीटस हा एक रोग नाही आणि बरेच व्यक्ती हे अनुभवतात.
याची प्रमुख चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
टिनिटस हे स्वतःच एक लक्षण आहे जे ऐकण्याच्या प्रक्रियेत असामान्यता दर्शवते. टिनिटससमध्ये सामान्यत: एका किंवा दोन्ही कानांमध्ये एक आवाज ऐकू येण्याचे अनुभवले जाते. एखादी व्यक्ती त्या आवाजाचे वर्णन खालीलप्रमाणे करते:
- गर्जना.
- फुसफुसणे.
- शिट्टीचा आवाज.
- अस्पष्ट गोंधळ.
काही व्यक्ती घंटीचे आवाज फार मोठा येत असल्याचे सांगतात तर काही व्यक्ती खूप अस्पष्ट असल्याचे सांगतात. पण, टिनिटसमध्ये, आवाज निश्चितपणे बाहेरील स्त्रोतांमधून येत नाही. हे कदाचित काही मिनिटे किंवा जास्त कालावधीसाठी अनुभवले जाऊ शकते.
याची मुख्य कारणं काय आहेत?
वृद्ध व्यक्तींमध्ये टिनिटस सामान्य अनुभव असल्याचे दिसून येते आणि ते पुरुष व महिला दोघांवरही परिणाम करू शकते. टिनिटसची अनेक कारणे असू शकतात जसे की:
- कानाचा संसर्ग.
- सायनसचा संसर्ग.
- हार्मोनल बदल.
- थायरॉईड मधील असामान्यता.
- कानाला इजा होणे.
- थकवा.
- मेणासारखा पदार्थ जमा झाल्यामुळे कर्ण नलिकेत अवरोध निर्माण झाल्यामुळे.
- काही औषधे घेण्यामुळे.
वृद्ध व्यक्तींमध्ये,ऐकण्याच्या नुकसानीचे टिनिटस पहिले चिन्ह असू शकते.
गोंगाटाच्या वातावरणात काम करणारे व्यक्तिंमध्ये,जसे की कारखाने आणि संगीत कार्यक्रम, थोड्या काळासाठी टिनिटस किंवा आवाजाने-प्रेरित निरंतर ऐकण्यातील नुकसान होऊ शकतो.
टिनिटस उदासीनता आणि इतर मानसिक आजारांच्या लक्षणांसारखे देखील दिसू शकते.
अगदी सामान्य असल्याने, कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय देखील होऊ शकते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
टिनिटसचे कारण आणि निदान निश्चित करण्यासाठी, डॉक्टर ऐकण्याची चाचणी करू शकतात आणि कोणत्या प्रकारचे आवाज ऐकू येतात याबद्दल अधिक चौकशी करतात. सीटी आणि एमआरआयसारखे स्कॅनिंग आणि इमेजिंग चाचण्या, कोणतीही इजा झाल्याची चिन्हे शोधण्यासाठी केल्या जाऊ शकतात. कोणताही परदेशी घटक कानामध्ये नाही ना, हे तपासण्यासाठी, कानाच्या आत पाहण्याकरिता उपकरण वापरुन ओटोस्कोपी केली जाऊ शकते.
सहसा, कानामधील आवाज स्वतःहून जातो आणि त्याला विशेष उपचाराची आवश्यकता नसते. पण, विशिष्ट कारण असल्यास, त्यानुसार उपचार करावे लागू शकतात.
रक्तवाहिन्यावरील जखमांवर उपचार करण्यासाठी किंवा तणाव-संबंधित टिनिटस कमी करण्यासाठी औषधे दिली जाऊ शकतात. ऐकण्याच्या नुकसानासाठी, कानाचे यंत्र दिले जाऊ शकतात.