जीभेवरील फोड काय आहे?
जीभेवरील फोड हे जीभेच्या पृष्ठभागावर किंवा त्याखाली असलेले उघडे फोड आहेत. जरी ही फारशी गंभीर किंवा घातक स्थिती नसली तरी, त्यामुळे व्यक्तीला खूपच अस्वस्थ वाटू शकते. तोंडाच्या इतर भागात येणारे फोड आणि जीभेवरील फोड यांची कारणं समान असू शकतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
जीभेवरील फोडाचे दिसणे हेच स्वाभाविक लक्षणं असते. हे फोड आकाराने मोठे किंवा लहान असू शकतात. जीभेच्या मागे किंवा जीभेवर फोड आढळू शकतात.
हे फोड वेदनादायक आणि लाल रंगाचे असू शकतात. काही प्रकरणांमध्ये, फोडाचा रंग पांढरा किंवा पिवळा दिसू शकतो. फोडांमुळे होणारी वेदना आणि जळजळ होण्याची शक्यता असते, सहसा ती गरम किंवा मसालेदार पदार्थ खाल्यानंतर तीव्र होते.
याची मुख्य कारणं काय आहेत?
जीभेवर फोड येण्याची सर्वसामान्य कारणं खालीलप्रमाणे आहेत:
- संसर्ग - तोंडात व्हायरल किंवा बॅक्टेरियल संसर्गा मुळे फोड होऊ शकतात. हे अप्रत्यक्षरित्या मुखातल्या/तोंडातल्या अस्वच्छतेशी जोडले गेले आहे.
- पौष्टिक कमतरता - आयर्न, झिंक किंवा व्हिटॅमिन एची कमतरता यामुळे जीभ व तोंडात फोड येऊ शकतात.
- दुखापती - जीभ चावली गेल्यामुळे झालेली जखम किंवा दातांच्या कवळीचा वापर किंवा ब्रेसेसचा वापर केल्यामुळे झालेल्या दुखापतीमुळे ब्लिस्टर किंवा फोड होऊ शकतात.
- कँकर फोड - कँकर फोड पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे फोड असतात जे तोंडात तसेच जीभेवर येतात. हार्मोनल बदल आणि अयोग्य आहार यासारख्या अनेक घटकांमुळे तोंडात तसेच जीभेवर फोड येऊ शकतात.
- खाद्याची संवेदनशीलता - मसालेदार आणि आम्लयुक्त पदार्थांसारख्या काही खाद्य पदार्थांमुळे जळजळ होऊ शकते आणि शेवटी जीभेवर फोड होऊ शकतात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
जिभेवर फोडचे निदान शारीरिक तपासणीद्वारे केले जाते.
ते सहसा थोडेशी काळजी घेऊन स्वत:च बरे केले जाऊ शकतात. जर फोडांचे कारण काही विशिष्ट पोषक तत्वांची कमतरता असेल तर डॉक्टर हे पोषक तत्व घेण्याचा सल्ला देतील.
असे काही घरगुती उपचार आहेत जे जीभेवरील फोड बरे करण्यासाठी फार प्रभावी आहेत.
मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने जीभेवरील फोड कोरडे होण्यास आणि हानिकारक बॅक्टेरियाचा नाश करण्यास मदत मिळते. वैकल्पिकरित्या, मीठ आणि पाण्याने तयार केलेली पेस्ट लावणे अतिशय उपयोगी असू शकते.
वेदना कमी करण्यासाठी बर्फाचा खडा त्या जागेवर ठेवावा.
जेव्हा एखाद्याला जीभेवरच्या फोडांचा त्रास असतो, ज्यामुळे वेदना होऊ शकतात त्याने गरम किंवा मसालेदार पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो.
काही प्रकरणांमध्ये, जीभेवरच्या फोडांचा त्रास वेगाने बरा करण्यासाठी डॉक्टर अँटी इंफ्लेमेटरी औषधे देऊ शकतात.