टुरेट सिंड्रोम काय आहे?
टुरेट सिंड्रोम हा मज्जासंस्थेचा विकार आहे ज्यामुळे व्यक्ती अचानक आणि अनैच्छिक हालचाली किंवा आवाज करते. या अचानक आवाज किंवा हालचालींना टीक्स म्हणतात आणि सिंड्रोम सौम्य ते गंभीर असू शकतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
टुरेट सिंड्रोमचे दोन प्रमुख लक्षणं म्हणजे मोटर टीक्स आणि मौखिक/व्हर्बल टीक्स.
मोटर टीक्स अनैच्छिक आणि अचानक हालचालींशी संबंधित असतात. मोटर टीक्समध्ये खालील बाबी समाविष्ट असतात:
- डोळे मिचकावणे.
- चेहरा वेडावाकडा करणे.
- अचानक जबड्यांच्या हालचाली.
- डोक्याला हिसका.
- उड्या मारणे.
- खांदे उडवणे.
- तोंड अचानक उघडणे.
- हातांना झटका.
मौखिक/व्हर्बल टीक्स व्यक्तीने केलेल्या अनैच्छिक आवाजांशी संदर्भित आहे. या अनावश्यक आवाजांचा काही अर्थ असतोच असे नाही आणि बहुतांश वेळा याला काहीही संदर्भ देखीलन सतो. मौखिक/व्हर्बल टीक्स मध्ये खालील बाबींचा समावेश असतो :
- सूं सूं करत जोराने श्वास आत घेणे.
- घुबडासारखा आवाज करणे.
- ओरडणे.
- डुकरासारखा आवाज करणे.
काही प्रकरणांमध्ये, मौखिक/व्हर्बल टीक्समध्ये शिवीगाळ किंवा इतर काही सामाजिकरित्या अस्वीकार्य शब्द बोलणे समाविष्ट असू शकते. पण, हे दुर्मिळ आहे.
हे लक्षात घेणे देखील महत्त्वाचे आहे की टुरेटे सिंड्रोम या समस्यांसह होऊ शकतो जसे की:
याची मुख्य कारणं काय आहेत?
टुरेट सिंड्रोमचे अचूक कारण ज्ञात नाही, जरी बहुतेक वैद्यकीय संशोधने या सिंड्रोमला मेंदू आणि अनुवांशिक क्षेत्रातील संरचनात्मक फरकाशी जोडतात. सकारात्मक कौटुंबिक इतिहास असलेल्या व्यक्तींना या सिंड्रोमचा धोका असतो.
हा विकार पुरुषांना जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते, आणि म्हणून लिंग हा एक धोक्याचा घटक मानला जाऊ शकतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
टुरेट सिंड्रोमचे निदान करण्यासाठी खालील स्थिती असली पाहिजे:
- व्यक्तीत कमीतकमी दोन मोटर टीक्स आणि एक मौखिक/व्हर्बल टीक्स आढळले पाहिजेत.
- कमीतकमी एका वर्षभर व्यक्तीला या टीक्सचा अनुभव येत असला पाहिजे.
- 18 वर्षे वयाच्या आधी टीक्सची सुरुवात झालेली असावी.
- औषधे किंवा ड्रग्स यासारख्या बाह्य घटकांमुळे ही लक्षणे दिसू नयेत.
टुरेट सिंड्रोमचे उपचार मर्यादित आहे.
टुरेट सिंड्रोमची लक्षणं आढळले तरीही बऱ्याच प्रकरणांमध्ये या विकाराने ग्रस्त व्यक्तीच्यि दैनंदिन काम करण्याची क्षमतेत कोणतीही कमतरता येत नाही. त्यामुळे, योग्य समर्थन आणि मार्गदर्शनाने या विकाराने ग्रस्त लोक चांगले व्यवस्थापन करण्यास सक्षम होतात.
काही प्रकरणांमध्ये, इतर संबंधित विकारांची लक्षणे नियंत्रित करण्यासाठी औषधे निर्धारित केली जाऊ शकतात. थेरेपी आणि मानसशास्त्रीय मार्गदर्शन तसेच विकाराने ग्रस्त व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना टुरेट सिंड्रोम बद्दल शिक्षित करून मदत होऊ शकते.