टॉक्सिक एपिडर्मल नेक्रोलिसिस - Toxic Epidermal Necrolysis in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 02, 2019

March 06, 2020

टॉक्सिक एपिडर्मल नेक्रोलिसिस
टॉक्सिक एपिडर्मल नेक्रोलिसिस

टॉक्सिक एपिडर्मल नेक्रोलिसिस म्हणजे काय?

टॉक्सिक एपिडर्मल नेक्रोलिसिस (टीइन) हा एक दुर्मिळ आणि घातक इम्यूनोलॉजिकल विकार आहे, जो विशिष्ट औषधांच्या सेवनाने होतो किंवा संसर्गा मुळे ज्यामध्ये त्वचेचे सालं निघतात. हा सर्व वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करतो पण प्रौढ आणि दुर्बल प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना जास्त जोखीम असते. तसेच हा आजार पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.

याची चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

टीइनचे लक्षणे याप्रकारे वर्गीकृत केले जाऊ शकतात:

प्रारंभिक लक्षणे

नंतरचे लक्षणे

  • चेहरा आणि शरीरावर जांभळे किंवा लाल पुरळ.
  • जीभ आणि चेहरा सुजणे.
  • तोंड, डोळे आणि योनि क्षेत्रात फोड होणे.
  • त्वचाचे सालं निघाल्यामुळे भाजल्यासारखे वाटणे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

टीइनसाठी सर्वाधिक जबाबदार असलेली ही औषधे आहेत:

  • सल्फोनमाइड्स.
  • ऑलोपरिनोल.
  • नॉन स्टेरॉइडल अँटी-इंफ्लॅमेटरी ड्रग्स.  
  • फेंटॉइन, लॅमोट्रायजिन आणि कार्बामाझेपाइनसारखे अँटी-एपिलेप्टिक औषधे.

इतर रोग, जसे की ह्यूमन इम्यूनोडेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही) आणि हर्पिस सिम्पलेक्स, यामुळे देखील टीइन होऊ शकतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

व्यक्तीचे शारीरिक तपासणी ही टीइनच्या निदानाची पहिली पायरी आहे. स्टीव्हन्स-जॉन्सन सिंड्रोम (एसजेएस) ची शक्यता टाळण्यासाठी, त्वचेचे पृथक्करण दर्शवणार्या शरीराच्या भागाची टक्केवारी तपासली जाते. शरीराच्या पृष्ठभागाच्या 30% पेक्षा जास्त असल्यास, एसजेएस नाकारला जातो. त्वचेची बायोप्सी आणि हिस्टोपॅथोलॉजिकल अभ्यास वैद्यकीय ​​निदानाची पुष्टी करण्यासाठी केले जातात.

या स्थितीच्या व्यवस्थापनातील तात्काळ चरणांमध्ये अलीकडे निर्धारित केलेल्या औषधांचे विघटन करणे समाविष्ट आहे. इतर उपायांमध्ये खालील समावेश आहे

  • तज्ञांकडून सहाय्यक काळजी.
  • प्रभावित भागात न चिपकणारे बर्न ड्रेसिंग.
  • वेदना मुक्त करणारे औषध.
  • संसर्ग थांबविण्यासाठी इंट्राव्हेन्सस अँटीबायोटिक्स.
  • सायटोटॉक्सिक प्रक्रिया थांबविण्यासाठी इंट्राव्हेन्सस इम्यूनोग्लोब्युलिन.
  • टॉपिकल एमोलिएंट क्रीम.  



संदर्भ

  1. American Academy of Allergy, Asthma & Immunology. STEVENS-JOHNSON SYNDROME (TOXIC EPIDERMAL NECROLYSIS) DEFINITION. Milwaukee, WI [Internet]
  2. Wolfram Hoetzenecker et al. Toxic epidermal necrolysis. Version 1. F1000Res. 2016; 5: F1000 Faculty Rev-951. PMID: 27239294
  3. Alfonso Estrella-Alonso et al. Toxic epidermal necrolysis: a paradigm of critical illness. Rev Bras Ter Intensiva. 2017 Oct-Dec; 29(4): 499–508. PMID: 29340540
  4. National Institutes of Health; [Internet]. U.S. Department of Health & Human Services; Stevens-Johnson syndrome/toxic epidermal necrolysis.
  5. National Organization for Rare Disorders [Internet], Stevens-Johnson syndrome/toxic epidermal necrolysis