विषमज्वर - Typhoid Fever in Marathi

Dr. Ajay Mohan (AIIMS)MBBS

April 24, 2017

September 10, 2020

विषमज्वर
विषमज्वर

सारांश

टायफॉयड साल्मोनेला टाइफी जिवाणूंमुळे होणारे एक संक्रामक आजार आहे, जो जिवाणूंमुळे होतो. या आजाराची लागण झालेल्या व्यक्तींमध्ये ताप, पोटदुखी, डोकेदुखी, भूक न लागणें किंवाकमी होणें, गुलाबी डाग इत्यादी लक्षणे दिसून येतात. हे आजार सामान्यतः मानसून हंगामामध्ये, मानसूनच्या थोडे पूर्वी व मानसूनच्या थोडे नंतर पसरते. पसरण विष्ठा किंवा तोंडाच्या माध्यमातून होते. या कारणासाठीच टायफॉयड जिवाणू याचे संक्रमण असल्याची पुष्टी करण्यासाठी मळ चाचणी करण्याची गरज असते. टायफॉयडमध्ये जंतूनाशकांद्वारे पूर्ण उपचाराची निकड भासू शकते. उपचार न झाल्यास, आन्तरिक रक्तस्राव, सेप्सिस म्हणजेच रक्तसंक्रमण किंवा अगदीच दुर्मिळ म्हणजे मृत्यूही होऊ शकते.

विषमज्वर (टायफॉईड) ची लक्षणे - Symptoms of Typhoid Fever in Marathi

तुम्ही संक्रमित खाद्य पदार्थ घेतल्यानंतर, जिवाणू तुमच्या पचनतंत्रात प्रवेश करून वाढायला लागतात. याने पुढील लक्षणांच्या विकासाला चालना मिळतेः

या टप्प्यावर उपचार न झाल्यास, लक्षणे अधिक तीव्र होऊन खालीलप्रमाणें समस्या होऊ शकतात:

  • थकवा
  • संभ्रम
  • हॅल्युसिनेशन (अस्तित्वाची नसलेली गोष्ट दिसणें किंवा ऐकू येणे)
  • नाकातून रक्त गळणें
  • लक्ष उणावणें (लक्ष देण्यास किंवा केंद्रित करण्यास अडचण)
  • छाती आणि पोट (बरगड्या आणि कटिप्रदेश यांच्यामधील क्षेत्र) यावर सपाट गुलाबी रंगाचे डाग किंवा ओरखडे.

अधिक शक्तिशाली आणि विकसनशील प्रतिरोधक्षमतेमुळे, मुलांमध्ये प्रौढांपेक्षा टायफॉयड संक्रमणाची कमी सौम्य लक्षणे आढळतात.

myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for sex problems with good results.
Long Time Capsule
₹712  ₹799  10% OFF
BUY NOW

विषमज्वर (टायफॉईड) चा उपचार - Treatment of Typhoid Fever in Marathi

लक्षणे बिघडण्यापूर्वी त्वरीत वैद्यकीय मदत मिळणें महत्त्वाचे असते.उपचाराचे साधारण क्रम खालीलप्रमाणे असू शकते:

  • मौखिक जंतूनाशक
    वैद्यकीय मदत मिळवण्याचे प्रयत्न करून वेळीच निदान झाल्यास, 7-14 दिवसांच्या मौखिक जंतूनाशकांचे क्रम घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. औषधोपचार घ्यायच्या 2-3 दिवसांच्या आत लक्षणे शमू शकतात, पण म्हणून जंतूनाशके थांबवणे हितावह नसेल, कारण जंतूनाशके तुमच्या शरिरातून जिवाणू पूर्णपणें बाहेर काढतात. 
     
  • तरळ पदार्थांचे प्रत्यांतरण
    निर्जलीकरणात( शरिरातील तरळ पदार्थ घटणें) फायदा होण्यासाठी तुम्ही भरपूर तरळ पदार्थ घ्यावेत. वेळीच निदान झाल्यास रुग्णालयात भरती होण्याची गरज पडत नाही आणि रुग्ण घरी जाऊन जंतूनाशकांचा क्रम सुरू ठेवू शकतो.
     
  • रुग्णालयात भरती होणें
    तुमच्यावरील उपचार काही कारणास्तव उशिरा सुरू होतो किंवा जंतूनाशकांचा क्रम पूर्ण करूनही लक्षणे जात नाहीत किंवा अधिक बिघडतात, तेव्हा चिकित्सक तुमच्या परिस्थितीच्या पर्यवेक्षणासाठी रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला देतो. परिस्थिती गंभीर असल्यास, जंतूनाशक इंजेक्शन दिले जातील. यामुळे जंतूनाशक लवकर काम करतील व तुमच्या लक्षणांची गहनता कमी करण्यास मदत करतील. रक्तनलिकेतून ड्रिप पद्धतीने तरळ पदार्थ आणि इलेक्ट्रोलाइटचे प्रत्यांतरण सुद्धा केले जाते.
     
  • दुय्यम विष्ठा चाचणी
    संपूर्ण उपचार झाल्यानंतर, तुमच्या मळातून जिवाणू दूर होत नसल्याची पुष्टी करण्यासाठी दुय्यम विष्ठा चाचणी केली जाते. चाचणी सकारात्मक असली तर, तुम्हाला टायफॉयड जिवाणूचे प्रसारक समजले जाते. तेव्हा, तुम्हाला मौखिक जंतूनाशकांचा अजून एक 28 दिवसांचा क्रम देऊन, अंतिम विष्ठा चाचणी केली जाते.
     
  • पुनरावृत्ती
    काही प्रकरणांमध्ये लक्षणांची पुनरावृत्ती होते. हे साधारणपणें औषधोपचार पूर्ण झाल्याच्या एका आठवड्यात होते. लक्षणे सौम्य व लघुकालिक असली तर, डॉक्टर जंतूनाशकाचा क्रम लिहून देऊ शकतात. तरीही, काही वेळा, डॉक्टर रुग्णांच्या कुटुंबीयांना रुग्णावर करडी नजर ठेवण्याची विशेष ताकीद देतात, कारण टायफॉयडच्या लक्षणांच्या पुनरावृत्तीमुळे शरीर अशक्त होतो.

टायफॉयड उपचारातील हल्लीचे बदल

वैद्यकीय अन्वेषकांना कमी संवेदनशीलता आणि फ्लूरोकिनोलोन(उदा. साइप्रोफ्लॅक्सिन) सारख्या जंतूनाशकांना वाढीव प्रतिरोध असलेल्या काही टायफॉयड जिवाणूंच्या काही जाती आढळून आल्या आहेत. अनेक औषधांना प्रतिरोध असलेले जिवाणूसुद्धा हल्ली विकसित होतांना दिसत येते. तरीही, संक्रमण टाळण्याची जवाबदारी डॉक्टरांपेक्षा आपली अधिक आहे आणि ही जवाबदारी आपण स्वच्छता ठेवून पार पाडू शकतो.

स्व-काळजी

  • सर्वप्रथम डॉक्टर आरंभिक दिवसांसाठी संपूर्ण विश्रांतीचा सल्ला देतात.
  • शरीर अशक्त आणि विभिन्न संक्रमणांना संवेदनशील असल्यामुळे, नारळ पाणी, ज्युस, लस्सी, ग्लुकोझ पाणी इ. सारखे तरळ पदार्थ घेणें हितावह ठरेल.
  • दिवसातून तीनदा जड जेवण करण्याखेरीज, कमी अंतराळांवर पचनास हलके आहार उदा. भात, फळाचे कस्टर्ड इ. घ्या.
  • वसा प्रचुर असलेले आहार उदा. तूप, दूध इ. घेऊ नका. तसेच वैय्यक्तिक स्वच्छता ही चांगली ठेवा.
  • बहुतांश लोक बरे वाटू लागले तसे लगेच, शाळा किंवा कामाला जाणे सुरू करतात, तरीही, खाद्य पदार्थ हाताळणार्र्या व शाळकरी मुले  व वयस्कर व्यक्तींबरोबर काम करणार्र्या लोकांनी त्यांची विष्ठा चाचणी नकारात्मक येईपर्यंत काम किंवा शाळेत जाळे टाळावे.
myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Kesh Art Hair Oil by using 100% original and pure herbs of Ayurveda. This Ayurvedic medicine has been recommended by our doctors to more than 1 lakh people for multiple hair problems (hair fall, gray hair, and dandruff) with good results.
Bhringraj Hair Oil
₹546  ₹850  35% OFF
BUY NOW

विषमज्वर (टायफॉईड) काय आहे - What is Typhoid Fever in Marathi

टायफॉयड आणि पॅराटायफॉयड फिव्हर यांना एकत्रपणें एंटरिक फिव्हर असे म्हणतात. साल्मोनेला एंटेरिका (जिवाणूचे प्रकार) यचे विविध स्ट्रेंस टायफी, पॅराटायफी ए, बी, सी यांमुळे ते होते.सुरवातीला त्याचे प्रभाव तुमच्या पचनतन्त्रावर पडते, पण उपचार न झाल्यास, परिस्थिती गंभीर वळण घेते आणि जिवाणू शरिराच्या विभिन्न अंगांपर्यंत पसरू शकतात. उपचार वेळेत न झाल्यास, गंभीर गुंतागुंती होऊन रुग्णाच्या जिवावरही बेतू शकते.



संदर्भ

  1. National Health Service [internet]. UK; Typhoid fever: Overview
  2. Iowa Department of Public Health [internet]. TYPHOID FEVER, CARRIER. Acute Communicable Disease Control Manual (B-73), REVISION—JUNE 2018
  3. National Health Service [internet]. UK; Typhoid fever: Vaccination
  4. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Typhoid & Paratyphoid Fever. Infectious Diseases Related to Travel.
  5. National Health Portal [Internet] India; Typhoid / Enteric Fever
  6. World Health Organization [Internet]. Geneva (SUI): World Health Organization; Typhoid.

विषमज्वर साठी औषधे

Medicines listed below are available for विषमज्वर. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Lab Tests recommended for विषमज्वर

Number of tests are available for विषमज्वर. We have listed commonly prescribed tests below: