व्हॅस्क्युलायटिस म्हणजे काय?
व्हॅस्क्युलायटिस हा एक विकार आहे ज्यामध्ये रोगप्रतिकारक यंत्रणा रक्तवाहिन्यांवर हल्ला करते, ज्याच्यामुळे सूज येते आणि गंभीर त्रास होऊ शकतो. शरीराच्या कोणता भाग प्रभावित झाला आहे यावर आधारित जटिलता विकसित होते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
व्हॅस्क्युलायटिसचे चिन्हे आणि लक्षणे त्याचा प्रकार, तीव्रता आणि कोणता अवयव प्रभावित आहे यावर अवलंबून असतात. त्याचा प्रभाव आणि कालावधी देखील वेगळा असतो. पण, सर्वसाधारणपणे दिसून येणा-या लक्षणांमध्ये हे समाविष्ट असतात:
- ताप.
- वजन आणि भूक कमी होणे.
- थकवा.
- सामान्य वेदना होणे आणि दुखणे.
- त्वचेचे विकार.
- संधिवात किंवा सांधे दुखणे.
- खोकल्यातून रक्त येणे.
- धाप लागणे.
- मध्य कानाचा संसर्ग.
- ऐकू न येणे.
- लालसर, खाजवणारे आणि जळजळ करणारे डोळे.
- अंधुक दृष्टी.
- स्नायू अशक्त होणे.
- बधिर होणे आणि मुंग्या येणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
व्हॅस्क्युलायटिसच्या सामान्य कारणांमध्ये हे समाविष्ट आहेत:
- ऑटोइम्युन प्रतिक्रिया.
- अलीकडील किंवा क्रोनिक (चालू असलेले) संसर्ग.
- काही औषधे.
- रक्ताच्या कर्करोगाच्या काही प्रकारामुळे (जसे ल्यूकेमिया आणि लिम्फोमा).
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
डॉक्टर व्यक्तीचा इतिहास जाणून घेऊन शारीरिक तपासणी आणि रक्तदाब तपासणी करतात, शिवाय खालील चाचण्या केल्या जातात.
रक्त तपासणींमध्ये खालील समाविष्ट आहे:
- अँटिन्यूट्रोफिल सायटोप्लाज्मिक अळटीबॉडीज (एएनसीए).
- सी-रीॲक्टिव्ह प्रोटीन (सीआरपी).
- हेमोग्लोबिन आणि हेमॅटोक्रिट.
- एरिथ्रोसाइट सेडीमेंटेशन रेट (ईएसआर).
- लाघवची तपासणी.
- छातीचा एक्सरे.
- बायोप्सी.
- फुफ्फुसांच्या क्रियेची तपासणी.
- ईकेजी (इलेक्ट्रोकार्डियोग्राम).
- इकोकार्डियोग्राफी.
स्कॅन जसे :
- ओटीपोटाचे अल्ट्रासाऊंड.
- कॉम्प्युटेड टोमोग्राफी (सीटी) स्कॅन.
- मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग.
- डुप्लेक्स अल्ट्रासोनोग्राफी.
- 18 एफ-फ्लुरोडायॉक्सीग्लुक्लोज पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी (एफडीजी-पीईटी).
- अँजिओग्राफी.
व्हॅस्क्युलायटिसचे व्यवस्थापन त्याच्या प्रकार, तीव्रता आणि त्याद्वारे प्रभावित झालेल्या अवयवांवर अवलंबून असते आणि त्यात हे समाविष्ट असते:
- व्हॅस्क्युलायटिसमध्ये जळजळ कमी करण्याचा मुख्य हेतू असतो एकतर प्रतिकार/ इम्यूनची प्रतिक्रिया कमी करून किंवा ती थांबवुन.
- प्रोड्निसोन, प्रीडिनिओलोन आणि मिथाइलप्रॅडिनिसोलॉन सारख्या कॉर्टिकोस्टिरॉईड्स जळजळ कमी करण्यासाठी दिले जातात.
- सौम्य व्हॅस्क्युलायटिस असलेल्या व्यक्तींना नैप्रोक्सेन, एसिटामिनोफेन, आयबप्रोफेन किंवा एस्पिरिन सारख्या औषधे देतात.
- गंभीर व्हॅस्क्युलायटिस असल्यास कधीकधी कॉर्टिकोस्टेरॉईड्स उपयुक्त नसतात तेव्हा सायटोटोक्सिक औषधे (सायक्लोफॉस्फामाइड, ऍझिएथोप्रिन आणि मेथोट्रॅक्साईट) दिली जातात. दुर्मिळ प्रकरणात, शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते.
- कावासाकी रोगासारख्या व्हॅस्क्युलायटिसच्या प्रकारात, मानक उपचारांमध्ये ॲस्पिरिन आणि इम्यूनोग्लोबुलिनचे उच्च डोज समाविष्ट असतात.