व्हिटॅमिन बी 9 ची कमतरता म्हणजे काय?
व्हिटॅमिन बी 9 ला फॉलिक ॲसिड किंवा फोलेट असेही म्हणतात. हे पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन आहे, याचा अर्थ शरीरात ते साठवू शकत नाही आणि त्यामुळे आहारातून दररोज पुरवठा करणे आवश्यक आहे. लाल रक्त पेशी (आरबीसी) तयार करण्यासाठी व्हिटॅमिन बी 9 महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये हेमोग्लोबिन असते आणि डीएनए (डीऑक्सीरिबोन्यूक्लिक ॲसिड) तयार करते आणि दुरुस्त करते. व्हिटॅमिन बी 9 च्या कमतरतेमुळे मेगालोब्लॅस्टिक ॲनिमिया होतो आणि हे गर्भधारणेदरम्यान ते विशेषतः धोकादायक असते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
व्हिटॅमिन बी 9 च्या कमतरतेचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
- कमी हिमोग्लोबिनमुळे अशक्तपणा आणि थकवा.
- श्वास घ्यायला त्रास होणे.
- तोंड / जिभेला फोड.
- डोकेदुखी.
- चिडचिडेपणा.
- भूक न लागणे.
- लक्ष केंद्रित करण्यास त्रास होणे.
- गर्भधारणेदरम्यान, फॉलेटची कमतरता बाळाच्तील जन्मजात विकृतीस कारणीभूत ठरू शकते कारण बाळाच्या मज्जासंस्थेच्या विकासासाठी ते आवश्यक आहे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
अपूर्ण आणि अयोग्य आहाराच्या सेवनमुळे फॉलेटची कमतरता येते. सेलियाक रोगासारख्या मालॲब्झॉर्पशनचःया आजारामुळे आहारातून फॉलेट रक्तामध्ये शोषून घेण्यास प्रतिबंध होतो ज्यामुळे फॉलेटची कमतरता होते. तीव्र हृदयाचा झटका, किडनी निकामी झाल्याने दीर्घ काळापर्यंत डायलिसिस आणि लिव्हरची हानी यामुळे फॉलेटची कमतरता होऊ शकते. मेथोट्रॅक्झेट, सल्फासालझिनसारखी औषधे आणि झटक्यांच्या नियंत्रणासाठी लागणारी औषधे देखील व्हिटॅमिन बी 9च्या कमतरतेस कारणीभूत ठरतात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
डॉक्टर लक्षणांचा योग्य इतिहास घेतील आणि स्थितीचे निदान करण्यासाठी काही प्रयोगशाळेच्या तपासणीचा सल्ला देतील. जे रुग्ण अशक्त आहेत आणि ज्यांना ॲनिमियाचा धोका वाटतो त्यांना पूर्ण रक्तपेशीगणना/ब्लड काउंट करण्याचा सल्ला दिला जातो. व्हिटॅमिन बी 9च्या कमतरतेमुळे मेगाब्लॉस्टिक ॲनिमिया होतो, ज्यामध्ये आरबीसी(RBC)सामान्यपेक्षा मोठे आणि अपरिपक्व असतात. रक्तातील कमी व्हिटॅमिन बी 9 च्या पातळीमुळे व्हिटॅमिन बी 9 ची कमतरता दिसून येते. इतर काही औषधांमुळे व्हिटॅमिन बी 9 शोषले जात नसेल तर ती शक्यता नाकारण्यासाठी डॉक्टर औषधांचा इतिहास देखील विचारू शकतात.
उपचारांमध्ये सामान्यपणे व्हिटॅमिन बी 9 पूरकांचे सेवन समाविष्ट असते. काही काळासाठी व्हिटॅमिन बी 9 च्या गोळ्या देखील दिल्या जातात. अंडी, शेलफिश, बीट, दालचिनी, मटार आणि हिरव्या पालेभाज्या हे व्हिटॅमिन बी 9 समृद्ध अन्न संपूर्ण आरोग्यासाठी चांगले आहेत.