अशक्तपणा काय आहे?
शरीराच्या एक किंवा अधिक स्नायूंची ताकद कमी होणे म्हणजे अशक्तपणा. काही लोकांना फक्त अशक्त असल्यासारखे वाटते, परंतु शारीरिकदृष्ट्या ताकद कमी होत नाही, उदाहरणार्थ, वेदनां मुळे अशक्त वाटते. काही लोक केवळ शारीरिक तपासणी दरम्यान ताकद कमी झाल्याचे अनुभवतात; याला "व्यक्तिनिरपेक्ष अशक्तपणा (ऑब्जेक्टिव्ह विकनेस)" म्हणूनही ओळखले जाते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
अशक्तपणाशी संबंधित चिन्हे आणि लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
- बधीरपणा.
- गंभीर डोकेदुखी.
- गोंधळ.
- चालतांना त्रास होणे.
- थकवा.
- वेदनादायक किंवा दुखणारे स्नायू.
- पेंगणे.
- चक्कर येणे.
- भूक न लागणे.
- धाप लागणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
अशक्तपणाचे मूलभूत कारण विशिष्ट आरोग्य समस्यांमुळे असतात. जसे की:
- सोडियम आणि पोटॅशियमची खालावलेली पातळी.
- श्वसनमार्गात किंवा मूत्रमार्गात संसर्ग.
- थायरॉईड हार्मोनची कमी किंवा उच्च पातळी.
- गिलेन-बेर सिंड्रोम.
- मायास्थेनिया ग्रॅव्हिस (स्नायूंचा विकृती जी स्नायूंना कमकुवत करते).
- स्ट्रोक.
- आजारपणामुळे निष्क्रियता, विशेषत: वयस्क लोकांमध्ये.
- इंटेन्सिव्ह केअर युनिट (ICU) मायोपॅथी (आयसीयूमध्ये बराच काळ राहिल्याने स्नायूंची ताकद नष्ट होते).
- सामान्य मायोपॅथीज (स्नायूच्या टिश्यूचा रोग) जसे स्नायूंचे डिस्ट्रॉफी, हाइपोकॅलेमिया (कमी पोटॅशियमचा स्तर) आणि अल्कोहोल मायोपॅथी.
- पोलिओ.
- शारीरिक श्रम.
- झोपेची कमतरता.
- अनियमित व्यायाम.
- तापा सारखे आजार.
- अयोग्य आहार.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
अशक्तपणाचे निदान करण्यासाठी खालील पद्धती वापरल्या जातातः
- शारीरिक तपासणी: मोटर फंक्शन, प्रतिक्षिप्त क्रिया आणि क्रेनियल नर्व्ह फंक्शन्सची तपासणी केली जाते.
- सामर्थ्य चाचणी: प्रतिरोधकांविरुद्ध अशक्तपणा, स्नायूंची दृश्यमान संकुचितता, गुरुत्वाकर्षणाविरुद्ध अवयवांच्या हालचाली, प्रतिक्षिप्त क्रिया आणि संवेदना यासारख्या घटकांची तपासणी केली जाते.
- चालीचे निरीक्षण केले जाते.
- अशक्तपणाच्या कोणत्याही कारणासाठी वैद्यकीय इतिहास तपासला जातो.
अशक्तपणाच्या मूळ कारणांसाठी उपचार देऊन अशक्तपणाचा उपचार केला जातो. गंभीर अशक्त लोकांसाठी आवश्यक असल्यास हॉस्पिटलायझेशनचा सल्ला दिला जातो. स्नायूंच्या कार्याचे नुकसान कमी करण्यात मदत करण्यासाठी रुग्णांना व्यावसायिक उपचार आणि शारीरिक उपचारांची देखील शिफारस केली जाते.