डांग्या खोकला - Whooping Cough (Pertussis) in Marathi

Dr. Ajay Mohan (AIIMS)MBBS

May 02, 2019

July 31, 2020

डांग्या खोकला
डांग्या खोकला

डांग्या खोकला काय आहे?

डांग्या खोकला,परट्यूसिस म्हणूनही ओळखला जातो. हा एक संक्रामक बॅक्टेरियाचा संसर्ग आहे, जो बॉर्डेटेला पॅरट्यूसिसमुळे होतो. हा सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करु शकतो. पण अशक्त लोकात अधिक सामान्य आहे, उदाहरणार्थ अविकसित रोगप्रतिकारकशक्ती असलेले शिशु.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

डांग्या खोकल्याची लक्षणे सहा ते वीस दिवसांच्या दरम्यान दिसतात, ज्याला संसर्गाच्या उद्भवनाचा कालावधी म्हणतात आणि त्याच्या लक्षणांचे तीन चरण आहेत:

 • कॅटेरल अवस्था सुमारे एक आठवड्यापर्यंत टिकते आणि त्यात ही लक्षणे दिसतात -  नाक वाहणे, डोळ्यात पाणी येणे, डोळे येणे, घसा खवखवणे, शिंका येणे आणि किंचित वाढलेले तापमान.
 • पॅरोक्ससिमल टप्पा एक आठवडा टिकतो आणि याची लक्षणे तीव्र खोकला, खोकल्यासह कफ, उलट्या, गंभीर प्रकरणांमध्ये त्वचा निळसर होणे ही आहेत.
 • कॉनव्हलसन्ट टप्प्यामध्ये खोकला 3 महिने टिकतो आणि लक्षणांची तीव्रता आणि वारंवारता हळू हळू कमी होते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

डांग्या खोकला बॉर्डेटेला पॅरट्यूसिस या जिवाणूंमुळे होणारा संसर्ग आहे. हे जिवाणू फुफ्फुसामध्ये प्रवेश करतात आणि त्यामुळे वायुमार्गात, मुख्यत्वे विंडपाइप आणि ब्रॉन्काई मध्ये, सूज येते आणि जळजळ होते,ज्यामुळे श्वसनविषयक त्रास होतो. हा संसर्ग अत्यंत संक्रामक आहे आणि संसर्गग्रस्त व्यक्ती खोकलतो किंवा शिंकतो तेव्हा आणि व्यक्तीशी थेट संपर्क साधताना नाक, तोंड किंवा डोळ्यांतून व्यक्तीपासून व्यक्तीपर्यंत पसरतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डांग्या खोकल्याच्या निदान याप्रकारे केले जाते:

 • रुग्णाचा इतिहास घेणे.
 • वैद्यकीय तपासणी.
 • पोलिमरेझ चेन रिॲक्शन (पीसीआर) चाचणीसाठी नाकाचा स्वाब किंवा एस्पिरेट.
 • कल्चर टेस्ट.
 • पॅरट्यूसिस सीरोलॉजिकल चाचण्या.

डांग्या खोकल्याच्या उपचारात, डॉक्टरांच्या वैद्यकीय निर्णयावर आधारित अँटीबायोटिक्स लवकर घेणे आवश्यक असते.

निवारक उपायांमध्ये राष्ट्रीय प्रतिरक्षण योजनेनुसार नवजात आणि प्रौढांसाठी पॅरट्यूसिस लसीकरणाचा  समावेश आहे. संपूर्ण डोज डिप्थीरिया, टिटॅनस आणि पॅरट्यूसिस ची एकत्रित लस मुलांना दिली जाते. ज्या प्रौढांनी त्यांचे प्राथमिक टीकाकरण वेळापत्रक पूर्ण केले आहे त्यांना बूस्टर डोज दिले जातात.संदर्भ

 1. National Health Portal [Internet] India; Whooping Cough/Pertussis
 2. Colin S Brown, Emma Guthrie, Gayatri Amirthalingam. Whooping cough: public health management and guidance. The Pharmaceutical Journal, 22 MAY 2017
 3. Paul E. Kilgore et al. Pertussis: Microbiology, Disease, Treatment, and Prevention. Clin Microbiol Rev. 2016 Jul; 29(3): 449–486. PMID: 27029594
 4. Guidelines for vaccination in normal adults in India. Indian J Nephrol. 2016 Apr;26(Suppl 1):S7–S14. PubMed Central PMCID: PMC4928530.
 5. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Pertussis (Whooping Cough)
 6. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Whooping cough

डांग्या खोकला साठी औषधे

Medicines listed below are available for डांग्या खोकला. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.