गरोदरपणातील ॲसिडिटी म्हणजे काय?
गरोदरपणात ॲसिडिटी ही एक सामान्य तक्रार आहे. ती छातीतील जळजळ म्हणून देखील ओळखली जाते, ॲसिडिटीचे प्रमुख लक्षण म्हणजे छातीच्या मध्यभागी, पोटाच्या वरच्या भागात जळजळ होणे. गरोदरपणातील ॲसिडिटी निरुपद्रवी आणि कॉमन मानली जाते, पण ती खूपच अस्वस्थ करणारी असू शकते.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
ॲसिडिटी मुळे जळजळ होते, जी गळ्याच्या खालच्या भागापासून स्तनाच्या खालील हाडापर्यंत जाणवते. गरोदरपणात दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत ही सामान्य आहे.
ॲसिडिटी किंवा छातीतील जळजळ मुख्यतः पोटातील सामग्री अन्ननलिकेत परत आल्याने होते. आंबट ढेकर, मळमळ, आणि तोंडात आंबटपणा यांसारखी लक्षणे ॲसिडिटीमुळे अनुभवले जाऊ शकतात.
याची मुख्य कारणं काय आहेत?
गरोदरपणातील ॲसिडिटी मुख्यतः हार्मोनल बदलांमुळे होते. छातीत जळजळण्याचा त्रास वारंवार उद्भवतो त्याला कारण आहे प्रोजेस्टेरॉन नामक हार्मोन्स. हे पचन संस्थेच्या स्नायूंवर परिणाम करतात, जे अन्ननलिकेचा व्हॉल्व कमी करते त्यामुळे अन्न प्रत्यावर्तनास प्रतिबंध होतो आणि काही पदार्थ सहन होत नाही.
याव्यतिरिक्त, वाढणारे गर्भाशय उदरात पोकळ निर्माण करते आणि पोटाची सामग्री वरच्या बाजूला ढकलते, ज्यामुळे ॲसिडिटी आणि जळजळ होऊ शकते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
गरोदरपणातील ॲसिडिटीचे निदान सामान्यतः लक्षणांवर आधारित केले जाते. जर हा त्रास वारंवार होत असेल तर डॉक्टर अँन्टासिड लिहून देऊ शकतात.
गरोदरपणात ॲसिडिटी सामान्यपणे नोंदवली जाते आणि ती साधारणतः फार गंभीर नसल्यामुळे, सामान्य घरगुती उपचारांनी ही व्यवस्थापित केली जाऊ शकते. काही घरगुती उपाय पुढील प्रमाणे आहे:
अनेक प्रतिबंधात्मक पावले आहेत, ज्यामुळे ॲसिडिटीचा त्रास कमी करण्यात मदत होऊ शकते.ती खालीलप्रमाणे आहेत:
- संपूर्ण दिवस भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ प्या.
- मसालेदार आणि तेलकट पदार्थ, अल्कोहोल, सिट्रस फळे आणि कॉफी टाळा. यामुळे ॲसिडिटी होऊ शकते किंवा अधिक वाढू शकते.
- रेडी-टु-इट पदार्थ खाणे टाळावे आणि इतर प्रक्रिया केलेले खाद्य पदार्थ ज्यात जास्त प्रमाणात मीठ किंवा तेल असते ते टाळा.
- थोडे आणि वारंवार जेवण घ्या. गिळण्याआधी अन्न योग्यरीत्या चावा.
- खूप वेळ उपाशी राहणे टाळा.
- जेवण करताना खूप मोठ्या प्रमाणात द्रव पिणे टाळा. कार्बोनेटेड पाणी किंवा सोडा टाळा.
- जेवण झाल्यानंतर लगेच झोपणे टाळा.
- पोटातील ॲसिड अन्ननलिकेत जाण्यापासून वाचवण्यासाठी उश्या वापरुन आपल्या शरीराचा वरचा भाग एलिव्हेट करा.