अँजायना म्हणजे काय?
ऑक्सिजन-युक्त रक्त हृदयाच्या स्नायूंना कमी प्रमाणात पुरवल्या गेल्यामुळे छातीमध्ये होणाऱ्या अस्वस्थतेला अँजायना म्हणतात. हा रोग नसून हृदयरोगाचे एक लक्षण आहे. उदाहरणार्थ, कोरोनरी धमनी रोग, ज्यामध्ये धमन्यांच्या संक्रमणामुळे हृदयात ऑक्सिजनयुक्त रक्त कमी होते. ज्या धमन्या हृदयाला रक्तपुरवठा करतात त्यामध्ये प्लेक्स तयार होतात,यामुळे हृदयाच्या स्नायूंना रक्त प्रवाह आणि ऑक्सिजन पुरवठा कमी होतो.
अँजायनाचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
अँजायनाचे तीन प्रकार आहेत: स्थिर, अस्थिर आणि व्हेरियंट अँजायना. सामान्यतः अँजायना च्या प्रकारानुसार लक्षणे बदलतात. छातीत वेदना हे प्रमुख लक्षण आहे. छातीत जळजळ किंवा निचरा होणे; हात, जबडा, खांदा किंवा पाठ यांपर्यंत पसरलेली वेदना; मळमळ, थकवा, धाप लागणे; घाम येणे आणि चक्कर येणे इतर लक्षणे आहेत. ह्या वेदना आम्लता किंवा अपचन सारख्या असतात.
याची प्रमुख कारणं काय आहेत
अँजायना हे हृदयरोगाचे एक लक्षण आहे. प्लेक्स नावाचे फॅटी (चरबीयुक्त) डिपॉझिट्स धमन्यांमध्ये जमा होतात आणि त्यामुळे धमनी चा आकार लहान होतो. यामुळे हृदयात ऑक्सिजन-युक्त रक्त प्रवाह कमी होतो (इस्केमिया). रक्तपुरवठा सामान्यत: विश्रांती दरम्यान पुरेसा असतो, पण जेव्हा एखादी व्यक्ती व्यायाम करते, चालते किंवा जीना चढते तेव्हा हृदयाच्या स्नायूंना अधिक ऑक्सिजन-समृद्ध रक्तपुरवठ्याची गरज असते, जो पुरेसा होत नाही. त्यामुळे छातीचा त्रास होतो आणि हात, मान, खांदा, पाठ आणि शरीराच्या इतर भागात वेदना होतात. हे स्थिर अँनजायनामध्ये दिसून येते.
अस्थिर अँजायनामध्ये, प्लेक कधीकधी धमनीच्या भिंतीपासून विभक्त रक्तासोबत वाहतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक किंवा आंशिक अवरोध तयार होऊ शकतात. याची अचानक छातीत दुखणे आणि अशी इतर लक्षणे दिसून येतात. छातीत दुखणे विश्रांती घेताना सुद्धा जाणवते आणि शारीरिक श्रम वाढवल्यास त्याची तीव्रता वाढत जाते.
तसेच, भावनिक तणाव, धूम्रपान, थंड हवामान, खूप जेवणे किंवा शारीरिक क्रिया यामुळे कोरोनरी धमनी संकुचित होते आणि अँजायनाचे लक्षणे उद्भवतात; या प्रकाराला व्हेरियंट अँजायना म्हणतात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
छातीत वेदना असल्यास, डॉक्टर लक्षणांबद्दल विचारू शकतात. वेदना सुरू झाल्या तेव्हा तुम्ही काय करत होता आणि कुटुंबाच्या वैद्यकीय इतिहासाविषयी, आहाराच्या सवयी, धूम्रपानाची सवयी, जीवनशैली, व्यायाम पद्धती, शरीराचे वजन, उंची, कंबर , बॉडी मास इंडेक्स, इत्यादी बद्दल सुद्धा ते विचारू शकतात. त्यानंतर, इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी), रक्तदाब, रक्त तपासणी, रक्त लिपिड, छातीचा एक्स-रे, कोरोनरी अँजियोग्राफी, संगणकीकृत टोमोग्राफी स्कॅन आणि ईसीजी तणाव चाचणी यासारख्या चाचण्या सांगू शकतात. अस्थिर अँजायना मध्ये हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी ताबडतोब निदान आणि आपात्कालीन उपचार आवश्यक आहे
अँजायनाच्या यशस्वी उपचारासाठी तुमचा डॉक्टरांवर पूर्ण विश्वास असून, तुम्हघ ज्या समस्यांना तोंड देत आहात ते त्यांना स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे. निदानाची पुष्टी झाल्यानंतर, डॉक्टर सुरुवातीला अँजायनाच्या प्रकारावर अवलंबून औषधे सुरू करतात. औषधांसह आरंभिक बदलांमध्ये जीवनशैलीतील सुधारणा, चांगल्या, निरोगी आहाराच्या सवयी आणि काही इतर उपाय जसे की हृदय शस्त्रक्रिया आवश्यक आहे.
सुरुवातीच्या अँजायना अटॅकनंतर, दुसरा टाळण्यासाठी डॉक्टर त्वरित ग्लिसरील ट्रायनायट्रेट (जीटीएन) लिहून देतात. जीटीएन एक सब्लिंग्वल टॅब्लेट किंवा स्प्रे म्हणून उपलब्ध आहे. अँनजायनाचा त्रास जाणवताच लगेच काम करणे थांबवावे, विश्रांती घ्यावी, जीटीएन घ्यावे आणि पहिला डोज निकामी ठरल्यास तो डोज पुन्हा घ्यावा. जीटीएन, बीटा अवरोधक आणि कॅल्शियम चॅनेल अवरोधक यासारखी औषधे देखील अँजायना टाळण्यासाठी वापरली जाऊ शकतात. अँजायना हा एक हृदयविकाराचा धोक्यासाठी चेतावणीचा संकेत आहे; म्हणून, हृदयविकाराचा त्रास टाळण्यासाठी इतर औषधे देखील आवश्यक आहेत, ज्यामध्ये कमी डोस ॲस्पिरिन, स्टॅटिन्स आणि अँजियोटेंसीन-कन्व्हर्टिंग एंझाइम इनहिबिटर समाविष्ट आहेत
केवळ औषधांनी ही स्थिती नियंत्रित होत नसल्यास शस्त्रक्रिया देखील केली जाऊ शकते. यामध्ये शरीराच्या दुसऱ्या भागातून (आर्टि बायपास क्राफ्ट सर्जरी) किंवा स्टेंट्स (पर्क्युटेनियस कोरोनरी इंटरव्हेंशन) वापरून धमनी-विस्तृतीकरण यासारख्या पर्यायांचा वापर करून रक्त प्रवाह पुन्हा सुरू करणे समाविष्ट आहे. अस्थिर अँजायनासाठी, रक्ताचा क्लॉट तयार होण्यापासून हृदयविकाराचा धोका कमी करण्यापर्यंत ची औषधे निर्धारित केली जातात. रुग्णास ताबडतोब कमी-डोज ॲस्पिरिन, क्लॉपिडोग्रेल आणि रक्त-पातळ करणारी इंजेक्शन दिली जातात. स्थिती गंभीर झाल्यास किंवा अन्य संबंधित आजार होण्याचा धोका जास्त असल्यास शस्त्रक्रिया केली जाते.