जंत (अस्कॅरियासिस) - Ascariasis in Marathi

Dr. Ajay Mohan (AIIMS)MBBS

November 27, 2018

March 06, 2020

जंत
जंत

जंत (अस्कॅरियासिस) म्हणजे काय?

अस्कॅरियासिस हा परजीवी संसर्ग आहे, हे गोलकृमिमुळे होते. परजीवीचे 40 सें.मी. लांबी आणि 6 मि.मी. व्यासाचे असते आणि हा भारतात आढळणारा सर्वात मोठा कीटक संसर्ग आहे. जगभरात अंदाजे एक अब्ज लोक या विकाराने संसर्गग्रस्त होतात. हा त्रास सर्व वयोगटात होतो, पण प्रौढांच्या तुलनेत मुलांवर जास्त परिणाम होते. उष्ण कटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय भागात जंताची बाधा खूप प्रचलित आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (विश्व स्वास्थ्य संस्था) अनुसार, 870 दशलक्ष मुले कीड संक्रमण-प्रवण क्षेत्रात राहतात.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

बहुतेक लोकांमध्ये फार थोडे किंवा कोणतेच लक्षण दिसत नाही.

पण, सामान्य लक्षणे खालील प्रमाणे आहेत:

सौम्य ते मध्यम प्रकरणात

गंभीर प्रकरणात

  • तीव्र पोटदुखी.
  • थकवा.
  • उलट्या.
  • वजन कमी होणे.
  • उलट्या किंवा मलमध्ये जंतू असणे.

संसर्ग जास्त झाल्यास पौष्टिक तत्वांची कमतरता, आतड्यांमध्ये अडथळा आणि मुलांमध्ये व्यथित वाढ होऊ शकते. काहीजणांना फुफ्फुसाशी संबंधित त्रास जसे की घरघरणे किंवा खोकला सारख्या समस्या होऊ शकतात.

खाली उल्लेखित कॉम्प्लिकेशन होऊ शकतात:

  • गुदामातून रक्तस्त्राव.
  • आंत्रात अडथळा.
  • आन्त्रपुच्छाचा रोग.
  • यकृत आणि पित्ताशयाचा रोग.
  • अग्नाशयात स्यूडोसिस्ट.

जंताचे मुख्य कारण काय आहे?

जंत हे आस्करिस लुब्रिकॉयडिस  या परजीवामुळे होते. हे प्रत्यक्ष व्यक्ती-व्यक्तीच्या संपर्काने पसरत नाही पण अस्कॅरिस अंडी असणा-या संक्रमित व्यक्तीच्या पुस्यांमधून पसरते. ही अंडी नैसर्गिक खताच्या माध्यमातून शेतीतल्या मातीमध्ये प्रसारित होतात.

संसर्गाचे कारणं पुढीलप्रमाणे आहेः

  • अस्कॅरिस अंडीनी दूषित असलेले अन्न किंवा द्रवपदार्थ खाणे.
  • दूषित जमिनीत खेळणे आणि धुळीमध्ये श्वास घेणे.
  • उघड्यावर खराब आरोग्याला कारणीभूत परिस्थितित आणि अयोग्य अस्वच्छ ठिकाणी शौच करणे.
  • डुकरांसारख्या प्राण्यांच्या संपर्कात येणे.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

या जंतूंचे जीवन चक्र साधारणतः 4-8 आठवडे असते.

खालीलप्रमाणे निदान केले जाऊ शकते:

  • मायक्रोस्कोपी: शौचेची थेट तपासणी.
  • इओसिनोफिलीया: वाढलेला इओसिनोफील काउन्ट (पांढऱ्या रक्त पेशींचे एक प्रकार [डब्ल्यूबीसी]) तपासणे.
  • इमेजिंग: जंतू आणि त्याच्यामुळे होणाऱ्या अडथळ्यांचा शोध घेणे.
  • सेरोलॉजी (दुर्मिळ): परजीवी विरूद्ध प्रतिपिंडांच्या उपस्थितीचे निर्धारण करणे.

उपचारांमध्ये एन्थेलमिंथिक औषधे दिले जातात, जी जंतूंना निष्कासित करते किंवा मारते. गर्भधारणेदरम्यान ही औषधे टाळावी कारण गर्भाला हानी पोचण्याची शक्यता असते.

  • पोस्ट ऑपरेशनल केअर आणि पुनर्वसन मध्ये खालील समाविष्ट आहे:
  • लहान मुलांसाठी व्हिटॅमिन ए सप्लिमेंट्स.
  • प्रभावित भागांवर 3-6 महिन्यात पुनरुत्थान.
  • जास्तीत जास्त फायदा मिळविण्यासाठी औषधोपचाराचे अनुपालन.

     स्वत:च्या काळजीचे टिप्स

  • चांगली स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता राखणे हे संक्रमण टाळण्यासाठी आवश्यक आहे.
  • खते म्हणून मानवी मलाचा वापर टाळणे.
  • खाण्याआधी अन्न योग्यरित्या झाकलेले असल्याचे सुनिश्चित करणे.
  • जेवणाआधी आणि नंतर हात धुणे शिकवणे आणि अमलात आणणे.
  • शक्यतोवर मुलांचे मातीत खेळणे टाळणे.
  • बॉटलबंद पाणी वापरणे, शिजवलेले आणि गरम अन्न खाणे, आणि कच्चे फळ आणि भाज्या धुऊन आणि सोलून खाणे.

अशा उपद्रव्यांविरूद्ध प्रतिबंध हा सर्वोत्तम उपाय आहे. वरील दिलेल्या उपचार पद्धती पाळल्यामुळे मोठी समस्या टाळू शकते.



संदर्भ

  1. Nasir Salam. Prevalence and distribution of soil-transmitted helminth infections in India. BMC Public Health. 2017; 17: 201. PMID: 28209148
  2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Ascariasis
  3. U.S. Department of Health & Human Services. Parasites - Ascariasis. Centre for Disease Control and Prevention. [internet]
  4. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Ascariasis (roundworm infection)
  5. de Lima Corvino DF, Horrall S. Ascariasis. Ascariasis. StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-.

जंत (अस्कॅरियासिस) साठी औषधे

Medicines listed below are available for जंत (अस्कॅरियासिस). Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.