दम्यावर - Asthma in Marathi

Dr. Nabi Darya Vali (AIIMS)MBBS

January 26, 2019

March 06, 2020

दम्यावर
दम्यावर

सारांश

दमा एक श्वसनात्मक आजार आहे, ज्यामुळे फुफ्फुसांतील हवेच्या आवागमानाच्या वाटा (ब्रॉंकाइ) अरुंद होतात. ही एक दीर्घकालिक आरोग्य अवस्था असून जनुकीयरीत्या हस्तांतरित होऊ शकते. या आजारामध्ये,हवेच्या वाटा विविध संप्रेरक उदा. पराग,खतमाती, झुरळाचे मळ,धूळ, मांजर किंवा कुत्र्याचे केस, संक्रमण आणि चिडचिडजनक बाबी( प्रदूषण, विभिन्न रसायने,तीव्र गंध असलेले सुगंधी द्रव्य किंवा रंग, तंबाकू, हवामान बदल, व्यायाम, एस्पिरिन असलेली औषधे, कृत्रिम संवर्धक) यांना खूप संवेदनशील होतात. हवेच्या वाटांतील व भोवतीचे स्नायू, अलर्जीच्या संप्रेरकांशी संपर्क आल्याने संकुचन पावतात, ज्यामुळे श्वसनहीनता, खोकला, छातीमध्ये घट्टपणा जाणवणें आणि श्वास घेतांना सिट्टीचा आवाज ऐकू येण्यासारखी लक्षणे दिसतात.

घरातील अलर्जी संप्रेरकांची (अंथरूण, कालीन, पराग, पाळीव प्राणी यांमधील धूळ)अलर्जी असलेल्या मुलांमध्ये दमा सामान्य असतो, ज्यामुळे आजाराचे वारंवार प्रसंग व शाळेत गैरहजरी होते. दम्यावर कोणतेही उपचार नसल्यामुळे, उपचाराचे लक्ष तीव्र झटक्यांदरम्यान तात्काळ आराम व तीव्र झटक्यांची वारंवारता कमी करणें हे असते. श्वासाद्वारे आत घेतले जाणारे स्टॅरॉयड, ब्रॉंकोडिलेटर( स्नायूंना आराम देऊन हवेच्या वाटा उघडणारी औषधे), आणि दाहशामक औषधांचा दम्यामध्ये सामान्यपणें सल्ला दिला जातो. तसेच, संप्रेरकाची माहिती घेऊन त्यांना टाळणें, औषधांसाठी कार्ययोजना तयार करून ठेवनें आणि श्वसनात्मक व्यायामांद्वारे दम्याला सामोरे जाण्यात भरपूर मदत मिळते.

दम्यावर ची लक्षणे - Symptoms of Asthma in Marathi

दम्याची लक्षणे मुख्यत्त्वे फुफ्फुसांतील हवेच्या वाटा अरुंद झाल्यामुळे होतात, उदा.;

  • श्वसनहीनता किंवा श्वास छोटे पडणें.
    दमा असलेल्या लोकांना सामान्यपणें श्वसनहीनता, श्वास गमावल्यासारखे किंवा कोंडल्यासारखे जाणवणें अनुभवायला मिळते, जे विशेषकरून दमा उभारीला आल्यावर होते.
  • शिटीचा आवाज येणें
    अरुंद हवेच्या वाटांनी हवेच्या प्रवाहाला प्रतिरोध झाल्यामुले एक उंच पट्टीचा आवाज निर्माण होतो. सौम्य प्रकारच्या दम्यामध्ये, व्यक्तीने श्वास सोडल्यास शिटीचा आवाज येतो. तीव्र प्रकारच्या दम्यामध्ये, व्यक्तीने श्वास घेतल्यासही शिटीचा आवाज येतो. अतीतीव्र व गहन प्रसंगी, हवेच्या वाटांमध्ये एवढा अडथळा व अरुंदपणा असतो, की शिटीचा आवाज अजिबात येत नाही.
    शिटी वाजण्याचा आवाज इतर आरोग्य समस्या उदा. सायस्टिक फायब्रोसिस, हृदय निकमी पडणें व स्वरतंत्र निकामी पडण्यात ही येतो. म्हणून विभिन्न अन्वेषणांद्वारे दम्याचे ठोस निदान करायला हवे.
  • खोकला
    दम्याचे, विशेषकरून व्यायाममूलक आणि रात्रिकालीन दम्याचे, सर्वांत प्रमुख लक्षण म्हणजे खोकला. ते कोरडे असून त्यातून काही गळती होत नसते.
  • छातीचा घट्टपणा
    दम्यात, विशेषकरून व्यायाममूलक आणि रात्रिकालीन दम्यात, छातीमध्ये घट्टपण्याची जाणीव किंवा वेदना काही वेळा दम्याचे एकमात्र दृश्य लक्षण असते.
Tulsi Drops
₹286  ₹320  10% OFF
BUY NOW

दम्यावर चा उपचार - Treatment of Asthma in Marathi

उपचाराचे लक्ष तीव्र झटक्यांदरम्यान तात्काळ आराम व तीव्र झटक्यांची वारंवारता कमी करण्यासाठी दीर्घकालिक व्यवस्थापन करणें हे असते..

तात्काळ आराम (आरामदायक औषधे)

यांना बचावात्मक औषधेही म्हणतात आणि त्यांना दम्याच्या त्रासदायक लक्षणांमध्ये तात्काळ आराम मिळण्यासाठी वापरले जाते. डॉक्टर सामान्यपणें ही औषधे व्यायामापूर्वी घेण्याचा सल्ला देतात, कारण लक्षणांची तीव्र उभारी व्यायामानंतर घडते( व्यायाममूलक दमा) उदा. पळणें किंवा थंड हवामानातील कृती( स्की चालवणें, आइस स्केटिंग, आइस हॉकी). तात्काळ आराम देणारी औषधे, हवेच्या वाट्यांतील व आजूबाजूच्या मऊ स्नायूंना आराम देऊन संकुचन पावलेल्या त्या वाटांना पटकन उघडून,त्रासापासून वाचवतात.

लवकर काम करणारी बीटा एगॉनिस्ट तीव्र दम्याच्या झटक्याच्या गैरसोयात्मक लक्षणांपासून त्वरीत आराम मिळण्याकरिता बचावात्मक औषधांतील पहिली निवड असतात. या श्वासाद्वारे आत घेतली जायची औषधे असून, हवेच्या वाटा त्वरीत उघडतात. डॉक्टर अल्ब्युटरॉल, लेव्हलब्युट्रॉल आणि पायर्ब्युट्रोलचा सल्ला देतात. आराम देणारी औषधे घेत असतांना दीर्घकालिक दमा व्यवस्थापनातील औषधे थांबवता कामा नये. आठवड्यातून दोनवेळापेक्षा अधिक वेळ, त्वरीत आराम मिळवून देणार्र्या औषधांची गरज असल्यास, डॉक्टरांना सूचना देणें आवश्यक आहे.

दीर्घकालिक नियंत्रण (नियंत्रक औषधे)

  • श्वासातून आत घेता येणारे कॉर्टिकोस्टेरॉयड
    दम्याच्या दीर्घकालिक उपचारामध्ये हे पहिली निवड असतात. ते हवेच्या वाटांतील दाह कमी करतात, परिणामी हवेच्या वाटा कमी करणारी सूजही कमी होते(उदा., फ्ल्युटिकासोन, ब्युडसॉनाइड, मॉमेटासोन, बेक्लोमेथासॉन आणि प्रेड्निसोलॉन).
  • श्वासातून आत घेता येणारे कॉर्टिकोस्टेरॉयड आणि खूप वेळ काम करणारे बीटा एगॉनिस्ट
    खूप वेळ काम करणारे बीटा एगॉनिस्ट(एलएबीए) मऊ स्नायूंना आराम देऊन, हवेच्य वाटा उघड पाडतात. काही वेळा, व्यायाममूलक आणि रात्रिकालीन दम्यावरील उपचारात त्यांचे वापर होते. तथापी, डॉक्टर दम्याच्या दीर्घकालिक उपचारासाठी श्वासातून आत घेता येणार्र्या स्टेरॉयडसोबत एलएबीएचा सल्ला देतात. लवकर काम करणारे बीटा एगॉनिस्ट आणि श्वासातून आत घेता येणारे स्टेरॉयड तीव्र झटक्याच्या लक्षणांमध्ये आराम देण्यात अपयशी ठरल्यासही समायोजनाचे वापर होते. समायोजनाची काही उदाहरणे म्हणजे फ्लूटिकासॉन आणि साल्मेटेरॉल, फ्ल्युटिकासॉन आणि व्हिलॅंटरॉल ,ब्यूडेसॉनाइड आणि फॉर्मोटेरॉल.
  • खूप वेळ काम करणारे एंटीकॉलिनेर्जिक
    ही औषधे श्वासाद्वारे आत घ्यायची असतात आणि हवेच्या वाटांमधील मऊ स्नायू सुस्थितीत ठेवण्यासाठी साजसांभाळ औषधे म्हणून वापरली जातात. यांपैकी टिओट्रॉपिअम आणि आयप्रेट्रोपिअमही असतात. डॉक्टर कधीकधी औषधांची प्रभाविता वाढवण्यासाठी दोन एंटीकॉलिर्जनिक औषधांच्या समायोजनाचा सल्ला देतात.
  • मेथाइलझॅंथिन
    थिओफिलिनसारखी मेथाइलझॅंथिन औषधे, रात्रिकालीन दम्याचे प्रसंग टाळण्यासाठी वापरल्या जातात.
  • ल्युकोट्रीन प्राप्तिकर्ता किंवा ल्युकोट्रीन परिवर्तक
    या मौखिक औषधे असून हवेच्या वाटांतील कोंडा, दाह व सूजमध्ये आराम देतात. यांमध्ये मॉंटेल्युकास्ट आणि झाफिर्ल्युकास्ट सामील आहेत.
  • मास्टसेल स्टॅबिलाइझर
    या दाह कमी करण्यास मदत करून थंड हवेचा संसर्ग किंवा व्यायाम यांमुळे झालेल्या तीव्र दम्याच्या प्रसंगांवर नियंत्रण आणतात (उदा., क्रोमोलिन सोडिअम).
  • प्रतिरोध उपचार किंवा इम्युनोमॉड्युलेटर
    ही इंजेक्शनद्वारे द्यायची औषधे असून, पराग, खतमाती, धूळ आणि प्राण्यांच्या झडतीशी झालेल्या संसर्गामुळे होणारा दमा टाळतात. ओमॅलिझ्युमॅबमध्ये एंटी- आयजीई मोनोक्लोनल प्रतिजंतुके असतात, ज्या अलर्जी संप्रेरकाला होणार्र्या शरिराच्या अलर्जी प्रतिक्रियेला नियंत्रित करतात. इतर उदाहरणे म्हणजे रेस्लिझ्युमॅब आणि बेन्रालिझ्युमॅब.
  • ब्रॉंकिअल थर्मोप्लास्टी
    ही एफडीए(अन्न व औषध प्राधिकरण)कडून संमत असलेली हल्लीची पद्धत आहे, ज्यामध्ये वैद्यकीय उपचारापासून लाभ न झालेल्या प्रौढांना तीव्र स्वरूपाच्या दम्यावरील उपचार दिले जातात. हवेच्या वाटांतून नियंत्रित रेडिओ तरंग सोडून ताप ऊर्जा निर्माण केली जाते आणि हवेच्या वाटांतील मऊ स्नायूंना नष्ट केले जाते. हवेच्या वाटांतील मऊ स्नायूंना नाश केल्यामुळे प्रतिरोध प्रणालीत बदल होऊन, हवेच्या वाटांचे संकुचन कमी होते.

जीवनशैली व्यवस्थापन

दमा आजतोगायत एक असाध्य आजार आहे आणि रुणांमध्ये अस्वस्थतेचे प्रमुख कारण आहे, कारण त्यांना अनियमितपणें श्वासहीनतेचे झटके येतात आणि छातीमधे घट्टपणा आणि श्वासाच्या कोंडीची त्रासदायक लक्षणे अनुभवावी लागतात. म्हणून, रुग्णांचे सामान्य दिनक्रम विस्कळीत होऊन कामाच्या फलनिष्पत्तीमध्ये घट आणि लक्षणीय आर्थिक तोटा होतो. उपचाराचे उद्देश, म्हणूनच, तीव्र प्रसंगांची गहनता व वारंवारता कमी करणें आणि फुफ्फुसांची क्षती, संक्रमण किंवा मृत्यूसारखे पुढील विपरीत परिणाम टाळणें असे असते.

  • दम्याच्या व्यवस्थापनातील प्रमुख घटक म्हणजे स्वतःची काळजी. आजार व संप्रेरकांची संपूर्ण माहिती असल्यास, तीव्र झटकांना टाळता येईल. तीव्र झटक्यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्याबद्दल माहितीही( उदा. औषधांच्या फ्लोचार्टचे वापर) आपत्स्थितीला सामोरे जाण्यात रुग्णांना साहाय्य करते. तसेच मुलाला दमा असल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्याद्वारे कार्य योजना तयार ठेवावी, जी तीव्र झटक्यांच्या प्रसंगांमध्ये अंमलात आणली जाऊ शकते व खूप मदतशीर असते.
  • दम्याचे निदान झालेल्या लोकांमध्ये चिंता एक व्यवहारात्मक बदल म्हणून सारखे आढळते. दम्याच्या तीव्र प्रसंगांच्या उद्दीपकांमध्ये ते एक महत्त्वपूर्ण घटक असते. प्राणायाम,ध्यानधारणा, योगासने आणि इतर मनःशांतीकारक व्यायामांमुळे दम्याशी निगडीत भीती आणि चिंतेला सामारे जाण्यात दीर्घकालिक यश मिळते. विविध श्वसनपद्धतींचे प्रशिक्षण उदा. श्वास रोखून धरण्याच्या पद्धती, दम्याच्या अवर्तनीय तीव्र प्रसंगांतील मानसिक ताणावर मात करण्यास आणि श्वसनाचे घडण सामान्य करण्यास मदत करतात.
  • चालण्यासारखे नियमित सौम्य व्यायाम, धूम्रपान पूर्णपणें बंद करणें आणि निरोगी पोषक आहार घेणें, या आणि अशा इतर जीवनशैली बदलांद्वारे दम्याच्या व्यवस्थापनाला बळ मिळते.


संदर्भ

  1. American Thoracic Society. What Is Asthma?. Am J Respir Crit Care Med Vol 188, P7-P8, 2013. ATS Patient Education Series [Internet]
  2. Asthma and Allergy Foundation of America. [Internet]. Maryland, United States; Asthma
  3. Lötvall J, Akdis CA, Bacharier LB, et al. Asthma endotypes: a new approach to classification of disease entities within the asthma syndrome. J Allergy Clin Immunol. 2011; 127:355-360. PMID: 21281866
  4. National Heart, Lung, and Blood Institute [Internet]: U.S. Department of Health and Human Services; Asthma
  5. Lange P. Prognosis of adult asthma.. Monaldi Arch Chest Dis. 1999 Aug;54(4):350-2. PMID: 10546480

दम्यावर साठी औषधे

Medicines listed below are available for दम्यावर. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.