ॲथरोस्क्लेरोसिस म्हणजे काय?
ॲथरॉसक्लेरोसिस हा शरीराच्या धमन्यांना प्रभावित करणारा एक आजार आहे. यात धमनीच्या भिंतीमध्ये प्लेक एकत्रित केल्यामुळे धमन्या कठोर बनतात आणि संकुचित होतात.
धमनीची भिंत जाड होते आणि परिणामी धमनी संकुचित होते, त्यामुळे शरीराच्या विशिष्ट भागामध्ये रक्तपुरवठा कमी होतो.
ॲथरोस्क्लेरोसिसचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
- प्रारंभिक ॲथरोस्क्लेरोसिस काहीच मुख्य लक्षण दर्शवत नाही. हा एक हळूहळू पसरणारा रोग असून सुरुवातीला याची लक्षणे जाणवत नाही.
- ॲथरोस्क्लेरोसिसची लक्षणे प्रभावित धमन्यांच्या स्थानावर अवलंबून असतात.
- जर हृदयाकडे जाणा-या धमन्यांमध्ये अडथळे निर्माण झाले तर छातीत वेदना होतात ज्या नंतर डावा हात, खांदा आणि जबड्यापर्यंत (अँजिना)पसरतात.
- ॲथरोस्क्लेरोसिस हाता किंवा पायाच्या धमनीमध्ये असल्यास तिथे वेदना होतात आणि ते बधिर होतात.
- जर ॲथेरोस्क्लेरोसिस मस्तिष्कच्या धमन्यांमध्ये असेल तर गोंधळ, डोकेदुखी, अवयवात अशक्तपणा, दृष्टीदोष आणि चक्कर येणे दिसून येते.
याची मुख्य कारणं काय आहेत?
ॲथरॉसक्लेरोसिस जीवनशैली, आहार आणि काही वैद्यकीय स्थितीशी संबंधित कारणांमुळे होतो.
- उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि मधुमेह यांसारख्या वैद्यकीय परिस्थितीमुळे व्यक्तीला ॲथरॉसक्लेरोसिस होण्याची जास्त शक्यता असते
- धूम्रपान करणे,मद्यपान करणे, लठ्ठपणा आणि आसक्त जीवनशैली ही धोका निर्माण करणारी कारणे आहेत.
- अति-चरबीयुक्त आहार, किंवा जास्त प्रमाणात साखर आणि मीठ असलेले आहार देखील कारक घटक बनू शकतात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
रोगनिदान, वैद्यकीय इतिहास आणि शारीरिक तपासणी व पिडिताच्या तक्रारींवर केले जाते. शारीरिक तपासणी दरम्यान, कार्डियोलॉजिस्ट पल्स आणि हृदयविकाराची तीव्रता तपासतात, आणि कोणताही असामान्य हृदयाच्या आवाजाची नोंद करतात
ॲथरॉसक्लेरोसिसच्या तपासणीसाठी खालील चाचण्यख समाविष्ट आहे:
- कोलेस्टेरॉल, शुगर, सोडियम आणि प्रथिनांचे स्तर तपासण्यासाठी रक्त तपासणी केली जाते.
- अवरोधित धमन्या तपासण्यासाठी सीटी स्कॅन केले जाते.
- अँजियोग्राम अडथळ्यांना तपासण्यासाठी डाई चा वापर करतो.
- ब्लॉक झालेल्या धमनीचा शोध घेण्यासाठी डॉपलर अल्ट्रासाऊंड देखील वापरला जाऊ शकतो.
- इतर तपासाणींमध्ये तणाव चाचणी आणि ईसीजी यांचा समावेश आहे.
ॲथरोसक्लेरोसिसच्या उपचारांमध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहे,
- धूम्रपान बंद करणे, नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे हे जीवनशैलीत बदल घडवून आणल्याने परिस्थिती सुधारते.
- औषधींमध्ये अँटीकोआग्युलंट्स, डायरेक्टिक्स जे रक्तदाब कमी करतात आणि कोलेस्टेरॉल-नियंत्रक औषधे समाविष्ट आहेत.
- जर अडथळा गंभीर असेल तर बायपास किंवा अँजियोप्लास्टी सारख्या शस्त्रक्रिया कार्डियाक सर्जनद्वारे केली जाते.
ॲथरोस्क्लेरोसिससाठी घरगुती काळजी
- जास्त सोडियम आणि चरबीयुक्त खाद्यपदार्थ टाळा. प्रोटीन ने समृध्द असलेले अन्न समाविष्ट करा.
- दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा
- आपल्या तणावाची पातळी तपासा आणि कार्यक्षमता अचानक कमी झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.