गळू म्हणजे काय?
गळू म्हणजे त्वचेच्या पृष्ठभागावर सुखम छिद्रांमध्ये द्रव्याचा संग्रह. हात आणि पाय ह्या दोन्हीवर सहसा गळू येतात. गळू मध्ये सामान्यतः क्लिअर द्रव (सिरम), रक्त किंवा पस असतो. जी त्वचा उघडी असते त्यावर वारंवार होणारी जळजळ किंवा घर्षण यामुळे इजा होते आणि द्रव जमा होते. हे द्रव त्वचेच्या खालच्या टिश्यूंना नुकसानापासून वाचवते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
गळू होण्याचे चे कारण काय आहे, यावर त्याची विविध चिन्हे आणि लक्षणे अवलंबून असतात.
- दुखणे आणि त्वचा लाल होणे ही गळू ची सामान्य लक्षणं आहेत (उदा. व्यवस्थित न बसणारे बूट, भाजणे, इजा होणे इ.).
- गळू लाल होणे आणि त्वचेचा थर निघणे हे जळल्यामुळे, ऑटोइम्यून रोगामुळे होते (एपीडर्मोलिसिस ब्युलोसा).
- व्हायरल इन्फेकशन (फिवर गळू) असेल तर ओठाजवळ गळू होऊन ताप येतो.
- एक्झिमा, त्वचेचा संसर्ग (इम्पेटिगो) मध्ये गळूला खाज सुटते.
- फ्रॉस्टबाईट गळू मध्ये त्वचा पांढरी आणि चमकदार होऊन बधिर होते.
- सनबर्न मुळे गळू झाला असेल तर त्वचा काळपट होऊन सुरकुत्या येतात.
- खूप जळजळ होऊन गळु वर खपली येणे हे शिंगल्स (हर्पिस झोस्टर), चिकन पॉक्स (कांजण्या) इ. मध्ये होतं.
याची मुख्य कारणं काय आहेत?
त्वचेवर गळू होण्यामागे विविध कारणं असू शकतात.
- खूप वेळ त्वचेवर घर्षण होणे किंवा त्वचा घासल्या जाणे.
- उष्णता,रसायने,अल्ट्रा व्हायलेट किरणं, गोठवणारे तापमान इत्यादी मुळे होणारी इजा.
- चिकनपॉक्स, हर्पिस, झोस्टर आणि त्वचेचा संसर्ग यासारखे रोग.
- रोग प्रतिकार प्रणाली चे विकार जसे पेम्फिगस, एपीडर्मोलिसिस ब्युलोसा इ.
- काही विशिष्ट झाड (पॉयझन आयव्ही, ओक इ.), रसायने इ. मुळे होणारी ॲलर्जीक प्रतिक्रिया.
गळूचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
शारीरिक तपासणी,लक्षणांविषयी माहिती, आणि विविध चाचण्यांच्या मदतीने डॉक्टर्स गळूचे निदान करतात.
- तपासणी आणि इतिहास
- बाहय रूप- नितळ द्रव्य, रक्त किंवा पस असलेला गळू.
- जागा- गळू शरीराच्या एकाच बाजूस किंवा विशिष्ट जागेवर किंवा संपूर्ण शरीरावर पसरणे.
- लक्षणांचा इतिहास- दुखणे, खाजवणे, ताप यांसह गळू होणे.
- चाचण्या
- संपूर्ण ब्लड काउन्ट.
- ॲलर्जी शोधण्यासाठी आयजीईचे स्तर, आयजीजी, आयजीएम आणि ऑटोइम्यून रोगांसाठी इतर आधुनिक चाचण्या.
- गळूतुन घेतलेल्या द्रवाच्या नमुन्यातून कुठला जीवाणू संसर्गास जबाबदार आहे हे बघितले जाते आणि उपचारांसाठी अँटीबायोटिक ठरविले जाते.
- जीवाणू किंवा विषाणूमुळे गळू झाला आहे का हे निश्चित करण्यासाठी पोलिमिरेस चेन रिॲक्शन किंवा पीसीआर.
- रक्ताच्या ॲलर्जी ची टेस्ट आणि त्वचेच्या ॲलर्जीची टेस्ट करून ॲलर्जन शोधण्यात येतात.
- स्किन बायोप्सी- त्वचेचा एक नमुना मायक्रोस्कोप खाली तपासून गळू चे कारणं शोधले जाते आणि इतर कारणे वगळली जातात.
- गळू होण्यास कारणीभूत असलेले अँटिजेन्स आणि अँटीबॉडीज ओळखण्यासाठी काही विशिष्ट चाचण्या केल्या जातात.
- वंशानुगत समस्या शोधण्यासाठी आनुवंशिक चाचण्या केल्या जातात.
गळू हा शक्यतोवर औषधांशिवाय बरा होतो. पण खालील परिस्थितीत औषधे दिली जातात:
- अँटिबायोटिक्स चा वापर
- जर गळूमध्ये पस असेल तर संसर्गचा उपचार करण्यासाठी.
- जर गळू परत परत होत असेल तर.
- ॲलर्जी, प्रकाश संवेदनशीलता किंवा जळल्यामुळे खूप गंभीर गळू झाला असेल तर.
- जर तोंडात किंवा इतर असामान्य ठिकाणी गळू झाला असेल तर.
- अँटीव्हायरल औषधे
- चिकनपॉक्स, हर्पिस झोस्टर किंवा तापामुळे गळू झाला असेल तर.
- ऑटोइम्यून विकारांमुळे गळू झाला असेल तर कॉर्टिकोस्टिरॉईड्स आणि रोगप्रतिकार शक्ती सुधारित करणारी औषधे वापरली जातात.
- वेदना कमी करण्यासाठी अँटी-इंफ्लेमेटरी औषधे वापरली जातात.
- अँटी-ॲलर्जी औषधे खाज कमी करण्यासाठी वापरली जातात.
- सनस्क्रीन लोशनचा वापर करून सनबर्न पासून संरक्षण केले जाते.
- गळू जर गंभीर स्वरुपाचा असेल आणि ऑटोइम्यून रोगांमुळे विकृती निर्माण झाली असेल तर शस्त्रक्रिया आणि त्वचेची ग्राफ्टिंग करणे आवश्यक आहे.
स्वतःची काळजी अशी घ्यावी:
- गळू वरची त्वचा फोडणे आणि काढणे टाळावे.
- द्रव काढून गळू ला मऊ पट्टीने झाकावे.
- व्यवस्थित न बसणारे शूज वापरणे टाळावे कारण यामुळे गळू होतो.
- गळू फुटणे टाळण्यासाठी, विशेषत: पायावरील, योग्य इनसोल पॅडिंग वापरावी.