ब्रेन हॅमरेज म्हणजे काय?
ब्रेन हॅमरेज या रोगात मेंदूच्या रक्तवाहिन्या फुटल्यामुळे मेंदूच्या आसपास रक्तस्त्राव होतो. त्याला ब्रेन ब्लिड देखील म्हणतात.
ब्रेन हॅमरेजमुळे मेंदूतील दाब वाढू शकतो, ऑक्सिजन पातळी कमी होते ज्यामुळे मेंदूच्या पेशी नष्ट होतात. ब्रेन हॅमरेज ची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत.
रक्तस्त्राव कुठे झाला आहे, यावर अवलंबून ब्रेन हॅमरेजचे 4 प्रकार आहेत:
- एपिड्युरल हॅमरेज.
- सबड्युरल हॅमरेज.
- सबराक्नॉइड हॅमरेज.
- इन्ट्रासेरेब्रल हॅमरेज.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
जेव्हा मेंदूमध्ये रक्तस्त्राव होतो तेव्हा डोकेदुखी होत नाही कारण मेंदूच्या पेशींना त्याची जाणीव होत नाही. पण, जेव्हा रक्तस्त्राव मेनिंग्जमध्ये (मेंदूच्या आवरणांमध्ये) होतो तेव्हा असह्य डोकेदुखी हे सर्वात सामान्य लक्षण आहे.
इतर लक्षणे अशी आहेत
- अशक्तपणा किंवा गुदगुल्या होणे किंवा बधिर वाटणे (एका बाजूला).
- बोलण्यात अडथळा येणे.
- तोल जाणे.
- बघण्यात त्रास होणे.
- शुद्ध हरपणे.
- दौरे पडणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
ब्रेन हॅमरेज अनेक कारणांमुळे होऊ शकते:
- मेंदूला दुखापत किंवा जखम.
- सेरेब्रल आर्टरी कमकुवत होणे किंवा फुटणे.
- रक्तस्त्रावाचे विकार जसे की प्लेटलेट ची कमतरता.
- सिर्हॉसीस सारखे यकृताचे विकार.
- उच्च रक्तदाब.
- ब्रेन ट्युमर.
उच्च रक्तदाब हे ब्रेन हॅमरेजचे सर्वसामान्य कारण आहे. हे सेरेब्रल वाहिन्यांना नुकसान देते त्यामुळे रक्त जमा होऊन स्ट्रोक येतो. 13% स्ट्रोक्स यामुळेच येतात.
इजा झाल्यामुळे वाहणारे रक्त टिश्यूंना डिवचल्यामुळे सूज. याला सेरेब्रल एडीमा म्हणतात. साचलेल्या रक्तामुळे हेमाटोमा होतो ज्यामुळे मेंदूच्या टिश्यूंवरील दबाव वाढतो आणि मेंदू पेशींना होणारा ऑक्सिजन चा पुरवठा कमी होतो. यामुळे, मेंदूच्या पेशींचा नाश होतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
लक्षणे काय आहते ते बघून, डॉक्टर्स एमआरआय किंवा सीटी स्कॅन करायला सांगतात ज्यामध्ये हॅमरेज नेमके कुठे झाले आहे ते स्पष्ट होते. इतर टेस्ट्स याप्रमाणे आहेत:
- अँजियोग्राम- मेंदूच्या आर्टरी मध्ये डाय घालून गळती कुठे आहे ते बघितले जाते.
- कॉम्पुटेड टोमोग्राफी अँजियोग्राफी.
- सेरेब्रोस्पायनल द्रव चाचणी.
- लंबर पंक्चर.
सुरुवातीच्या काही तासांपासून स्थिती पूर्णपणे स्थिर होईपर्यंत रुग्णाचे योग्य निगा घेणे महत्त्वाचे आहे. रक्तदाब आणि श्वसनक्रिया काबूत ठेवणे हे पहिले महत्वाचे पाउल आहे, त्यांनतर आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला जातो.
ब्रेनपाथ शस्त्रक्रिया ही नवीन पद्धत असून जुन्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत कमी वेदनादायक आणि लवकर बरी करणारी आहे.
यात मेंदूच्या आसपासचे रक्त दबाव कमी करण्यासाठी बाहेर काढले जाते.
रक्तदाब, दौरे येणे आणि डोकेदुखी या गोष्टी काबूत ठेवण्यासाठी औषधे दिली जातात. रोगावर उपचार करत असताना रोगाच्या कारणावर उपचार करणे सुद्धा आवश्यक असते.
हॅमरेज कुठे आणि किती प्रमाणात झाले आहे यावर रुग्ण उपचारांना कसा प्रतिसाद देतो हे अवलंबून असते.
कधीकधी, त्वरित वैद्यकीय उपचार देऊन ही रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
एकूणच, रोगनिदान स्पष्ट नाही. बरेच रुग्ण बरे होतात, तर काही मेंदूच्या विशिष्ट भागात रक्तस्त्राव झाल्यास किंवा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यास जगू शकत नाही. तर काही व्यक्ती सतत किंवा दीर्घकाळ अशक्तपणा, संवेदनांची समस्या, दौरे, डोकेदुखी किंवा स्मरणशक्तीच्या समस्यांसह जगतात.