हृदयातील छिद्र (जन्मजात हृदय रोग) म्हणजे काय?
जन्मजात हृदयातील छिद्र किंवा हृदय रोग हृदय किंवा त्याच्या रक्तवाहिन्यांच्या विकासाशी संबंधित सामान्य संरचनात्मक दोषांपैकी एक आहे. हृदय कक्षांमध्ये एक भोक (सेप्टल व्हॉल मधील दोष), हृदयातील मुख्य रक्तवाहिनी संकुचित होणे (महाधमनी) आणि पल्मनरी व्हेन स्टेनोसिस (फुप्फुसाची वाहिनी संकुचित होणे ) हे सर्व सामान्य जन्मजात हृदय रोग आहेत.
याचे मुख्य चिन्ह आणि लक्षणे काय आहेत?
प्रौढांमध्ये, उपचार न केल्यास आजार राहिल्यास पुढील लक्षणे दिसू शकतात,
बऱ्याच बाबतीत रुग्ण फार कमी किंवा कोणतेही चिन्हे आणि लक्षणे दर्शवित नाही.
गंभीर प्रकरणांमध्ये दिसणारे चिन्हे आणि लक्षणे अशी आहेत:
- वेगाने श्वास घेणे.
- प्रचंड घाम येणे.
- छाती दुखणे.
- सायनोसिस - त्वचा, ओठ आणि नख निळे पडणे.
- थकवा.
- असामान्य रक्त परिसंचरण.
- मोठे होतांना वाढीसंबंधित अडचणी.
- डिस्पनोआमुळे बाळांमध्ये कमी भूक.
याची मुख्य कारणे काय आहेत?
गर्भाच्या सुरुवातीच्या काळात आंतरिक वातावरणातील अडथळे सर्वात सामान्य कारणे आहेत. ती पुढील कारणे असू शकतात:
- संसर्ग.
- गर्भवती आईचे हानिकारक औषधे घेणे.
- गर्भवती आईने मद्यपान किंवा ध्रुमपान करणे.
- सामाजिक-जनसांख्यिकीय आणि पर्यावरणीय घटक.
इतर कारणे ही आहेत
- दोषपूर्ण जीन्स आणि क्रोमोझोम.
- जन्मजात हृदय दोषांचा कौटुंबिक इतिहास.
- पालकांच्या आजारामुळे मुलाला जन्मजात हृदयविकाराचा धोका होतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
-
गरोदर असताना:
- अल्ट्रासाऊंड स्कॅनने गर्भामधील जन्मजात हृदय दोष शोधण्यात मदत होते. काही प्रकरणांमध्ये, हे 20 आठवड्यांच्या आतच ओळखले जाऊ शकते. (अधिक वाचा : गर्भावस्था अल्ट्रासाऊंड चाचण्या)
- गर्भाशयात जन्मजात हृदय विकृती ओळखण्यासाठी प्रसूतिपूर्व (भ्रूण) इकोकार्डियोग्राफी उपयुक्त असते.
- बालपणा दरम्यान:
योग्य निदानानसाठी खालील तपासण्यांसह संपूर्ण वैद्यकीय इतिहास आणि रुग्णाची शारीरिक तपासणी आवश्यक आहे:
- इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी)
- छातीचा एक्स रे
- इकोकार्डियोग्राम
- स्क्रीनिंगसाठी पल्स ऑक्सिमेट्री
- प्रौढपणात:
शारीरिक तपासणीसह अनेक निदानात्मक चाचण्या प्रौढांमधील जन्मजात हृदयरोगाचा शोध घेण्यासाठी डॉक्टरांना मदत करतात. त्या या आहेत:
- इकोकार्डियोग्राम.
- ट्रान्स-इसोफेगल इकोकार्डियोग्राम.
- इंट्राव्हास्क्युलर अल्ट्रासाऊंड (आयवियुएस).
- कार्डियाक कॅथेटराइझेशन.
- छातीचा एक्स रे.
- ईसीजी.
- मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (एमआरआय).
- पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पीईटी) स्कॅन.
जन्मजात हृदयविकार असलेल्या रुग्णांचे उपचार दोषाची तीव्रता ठरवितात आणि त्यात हे समाविष्ट असते:
- काहीच उपचार न करणे.
- कार्डियाक तज्ञाद्वारे कालांतराने तपासणी करणे.
- औषधे ज्यामध्ये एन्डोकार्डायटिससाठी प्रोफेलेक्सिस देखील समाविष्ट असतात.
- दोष घालवणे किंवा दुरुस्तीसाठी इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रिया.