सायनाईड पॉइझनिंग काय आहे?
एखाद्या व्यक्तीचा सायनाईड या जलद परिणामकारी विषारी रसायनाशी संपर्क येतो तेव्हा सायनाईड पॉइझनिंग होतो. सायनाइडचे वायुरूप हायड्रोजन सायनाइड, तर त्याचे मीठ पोटॅशियम सायनाइड म्हणून ओळखले जाते. सायनाईडच्या काही नैसर्गिक स्रोतांमध्ये लिमाच्या बिया, बदाम, कसाव्हा वनस्पती आणि कीटकनाशकांसारखे औद्योगिक स्रोत, फोटोग्राफीसाठी वापरले जाणारे द्राव आणि दागदागिनेसाठी साफ करण्यासाठी वापरले जाणारे द्राव यांचा समावेश आहे. भारतात सायनाईड पॉइझनिंगची आकडेवारी अज्ञात आहे.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
जेव्हा या रसायनाचे सेवन केले जाते किंवा श्वसन केले जाते आणि रक्तातील त्याचे प्रमाण सुमारे 40 mol /L एवढे पोहचते तेव्हा सायनाईड पॉइझनिंगचे चिन्हे आणि लक्षणे दिसतात. लक्षणांचा प्रारंभ सामान्यतः वेगवान असतो आणि सायनाइड वायुमार्गामध्ये श्वसन केला गेल्यास काही सेकंदात किंवा सायनाइड त्याच्या मीठ स्वरूपात सेवन केले गेल्यास काही मिनिटात मृत्यू होऊ शकतो. सायनाइड मुख्यतः केंद्रीय मज्जासंस्था आणि कार्डियोव्हस्कुलर प्रणालीला लक्ष्य करतो. श्वसनाद्वारे,त्वचेद्वारे शोषण करून किंवा सायनाइडयुक्त अन्न घेण्याद्वारे त्याचा शरीरात प्रवेश होतो. सायनाईड पॉइझनिंग सुरुवातीला यापैकी कोणतीही लक्षणे दर्शवू शकतो:
- ठसठसणारी डोकेदुखी.
- चक्कर येणे.
- मळमळ.
- उलट्या.
- जलद हृदय गति आणि श्वास.
जेव्हा कोणत्याही मार्गाने सायनाईड मोठ्या प्रमाणात शोषली जातात तेव्हा खालील लक्षणे दिसतात:
- झटके (सर्वात सामान्य).
- बेशुद्धावस्था.
- हायपोटेन्शन/ लो ब्लडप्रेशर.
- पल्मोनरी/ फुप्पुसांना दुखापत.
- हृदयाची मंद गती.
जे लोक सायनाईड पॉइझनिंगमधून वाचले आहेत त्यांच्यात न्यूरोसायकियाट्रिक आणि ऑप्टिक एट्रोफीची लक्षणं दिसू शकतात.
याची मुख्य कारणं काय आहेत?
सायनाईड पॉइझनिंगमुळे शरीरातील पेशी ऑक्सिजन वापरण्यास असमर्थ होतात, ज्यामुळे जीवघेणा परिणाम होतो. थोड्या प्रमाणात, सायनाईड हा थियोसाइनेट स्वरूपात रूपांतरित होतो. मोठ्या डोसमध्ये, त्याच्या क्रिया अधिक स्पष्ट होतात ज्यामुळे सेल मरण पावतात. यामुळे महत्त्वपूर्ण अवयव निष्क्रिय होऊन मृत्यूस होतो. विषारी डोस 100-200 मिलीग्रामच्या श्रेणीत आहे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
निदान पूर्णपणे क्लिनीकल तपासणी असते, पण काही प्रयोगशाळेतील चाचण्या देखील मदत करू शकतात. प्रयोगशाळेतील टेस्ट्सद्वारे सायनाईड पॉइझनिंगच्या खालील जैविक विकृती ओळखल्या जाऊ शकतात:
- मेटाबॉलिक ॲसिडोसिस.
- लॅक्टिक ॲसिडचे वाढलेले स्तर.
- 90 टक्क्यांहून अधिक रक्तवाहिन्यांमधून ऑक्सिजनची परिपूर्ती.
आवश्यक टेस्ट्समध्ये खालील टेस्ट्सचा समावेश असतो:
- पूर्ण रक्ताची तपासणी.
- रक्ततील ग्लूकोजचे मापन.
- बायोकेमिकल टेस्ट्स.
- ईसीजीचे निरीक्षण.
कार्बन मोनोऑक्साईड पॉइझनिंगमध्ये नंतरच्या काळात झटके कमी होऊ शकतात त्यामुळे यांच्यात फरक केला जाऊ शकतो.
उपचार पद्धतींत खालील गोष्टी समाविष्ट असतात:
- डिसकोन्टामिनेशन:
- अँटिडोट किट: यात सायनाईड चयापचय करणाऱ्या तीन घटकांचे मिश्रण असते.
- हायड्रोक्कोकोबोलिन: ते सायनाइडला एकत्र बांधते आणि मूत्रमार्गे फेकले जाते.
स्वत:च्या काळजी बद्दल टिप्स:
- आपण सायनाईड असलेल्या कोणत्याही वायूच्या संपर्कात आल्यास तिथून त्वरित दूर जा.
- सायनाईड पडलेले कपडे त्वरित काढून टाका.
- आपल्या डोळ्यांत उडाल्यास डोळे भरपूर पाणी आणि साबणाने स्वच्छ धुवा आणि पाण्याचे खूप सपके मारा.
- जर त्याचे सेवन केले गेले तर सक्रिय कोळशामुळे त्याचे शोषण रोखले जाऊ शकते.
- सायनाईड काढून टाकण्यासाठी ब्लीचचा वापर टाळा.
- त्वरित वैद्यकीय मदत घ्या.
रक्षात्मक टिप्स:
- कोणत्याही अप्रिय घटना टाळण्यासाठी सायनाईड विविध प्रकारच्या स्वरूपात वापरणाऱ्या उद्योगातील कामगारांना सायनाईड पॉइझनिंगबद्दल शिक्षण दिले पाहिजे.
- व्यावसायिक धोके सामान्य असतात, आणि सायनाईड-युक्त उत्पादनांच्या हाताळणीमध्ये कामगारांना आधीच माहिती आणि प्रशिक्षित करणे आवश्यक आहे.
- सायनाईड पॉइझनिंगचा धोका टाळण्यासाठी रुग्णांना फॉलोअप आणि काळजी विषयी माहिती देणे आवश्यक आहे.
इतर विषबाधेपेक्षा, सायनाईड पॉइझनिंग अधिक धोकादायक असू शकते आणि त्वरित योग्य कारवाई न केल्यास लगेच मृत्यु ओढवू शकतो. नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी पूर्वीच परिणामांची जाणीव करून घेणे चांगले आहे.