सिस्टायसिस काय आहे?
सिस्टायसिस हा एक सामान्य संसर्ग आहे ज्यामुळे मूत्राशयात जळजळ होते. हा मूत्रमार्गाच्या खालच्या भागात आढळणारा संसर्ग आहे आणि पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये तो अधिक सामान्यपणे दिसून येतो. हे हॉस्पिटलायझेशनचे प्रमुख कारण आहे, जे 25 वर्ष व त्यावरील वयोगटातील लोकांना प्रभावित करते. जगभरात 20 दशलक्षपेक्षा अधिक लोकांना सिस्टायसिस चा त्रास होत आहे.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
याची सामान्य चिन्हे आणि लक्षणे पुढील प्रमाणे असू शकतातः
- लघवी करण्याची सतत आणि सशक्त इच्छा. (अधिक वाचा: वारंवार लघवीचे कारणं)
- लघवी करताना मूत्रमार्गात जळजळीची संवेदना होणे.
- गडद आणि दुर्गंधीयुक्त लघवी.
- ओटीपोटात अस्वस्थता.
- सौम्य ताप.
- लघवीत रक्त.
याची मुख्य कारणं काय आहेत?
बहुदा हा बॅक्टरीयाच्या संसर्गामुळे होतो. वेळीच योग्य उपचार केले नाहीत तर, हा संसर्ग शरीरात वरच्या दिशेने पसरू शकतो आणि याचा परिणाम किडनीवर होऊन पायलोनेफ्रायटिस होऊ शकतो. मूत्रमार्गाच्या लहान आकारामुळे स्रियांना पुरुषांपेक्षा जास्त वारंवार याचे संक्रमण होऊ शकते.
इतर कारणांमध्ये अशी आहेत:
- मूत्राशयाच्या यंत्रणेत दोष.
- मूत्राशयाला त्रासदायक ठरणारा कोणताही बाहेरचा पदार्थ.
- मूत्राशयाच्या नर्व्हचे सदोष कार्य.
- प्रतिकार शक्तीच्या सदोष कार्यामुळे सिस्टायसिस होऊ शकतो.
- मूत्राशयातील स्टोन.
दुर्मिळपणे, हा औषधं, रेडिएशन थेरेपी किंवा महिलांचे काही स्वच्छतेचे स्प्रे किंवा शुक्राणुनाशकांच्या वापरा मुळे होऊ शकतो. कॅथीटर-संबंधित मूत्रमार्गात संसर्ग देखील सामान्य आहे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
सुरवातीला, लक्षणांचा कालावधी आणि दैनंदिन नित्यक्रमात होणाऱ्या बदलांचे मूल्यांकन इतर रोगांची संभावना तपासण्यासाठी केले जाऊ शकते. निदानासाठी खालील चाचण्या केल्या जाऊ शकतात:
- शारीरिक आणि न्यूरोलॉजिकल तपासण्या.
- वेदनांचे मूल्यांकन आणि मूत्र व्होईडिंग तपासण्या.
- मूत्राचे विश्लेषण.
- युरीन कल्चर.
- सिस्टोस्कोपी - कॅमेरा-फिट केलेली ट्यूब वापरून मुत्राशयाच्या आत बघणे.
- अल्ट्रासोनोग्राफी आणि ओटीपोटाचा एक्स-रे सारखे इमेजिंग तपासण्या.
सिस्टायसिसच्या उपचारांमध्ये ऑरगॅनिझम नष्ट करण्यासाठी अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. सौम्य संसर्गासाठी, अँटीबायोटिक्सचा कोर्स स्त्रियांसाठी 3 दिवसांपेक्षा जास्त आणि पुरुषांसाठी 7-14 दिवसांपेक्षा जास्त असू शकत नाही. लक्षणं कमी होऊ लागल्यानंतरही अँटीबायोटिकचा कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे. मेडिकल स्टोअर्स मध्ये सहज मिळणारी औषधं आणि ॲस्कॉर्बिक ॲसिडसारख्या काही विशिष्ट ॲसिडिक प्रॉडक्टसमुळे प्रभाव होऊ शकतो जे संसर्गाच्या एजंट्सला नष्ट करतात.
जीवनशैलीतील बदलांमध्ये यांचा समाविष्ट आहे:
- भरपूर पाणी घ्या.
- संसर्ग टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता राखा, जवळचा पूर्ण परिसर स्वच्छ ठेवा.
- त्रासदायक वाटणाऱ्या वस्तूंची यादी बनवा आणि त्या टाळा.
- मसालेदार अन्न, चॉकलेट आणि कॅफिनसारख्या विशिष्ट पदार्थांचे सेवन करू नका.
- लघवी लागल्यानंतर थोडा वेळ ती थांबवून मूत्राशयाची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करा.
- मूत्रमार्गात झालेल्या संसर्गाची गुद्द्वारपर्यंत होणारी वाढ टाळण्यासाठी लघवी केल्यानंतर विशेषतः स्रियांनी तो भाग पुसून कोरडा करावा.
- बाथटबऐवजी शॉवरचा वापर हा संसर्ग कमी करू शकतो.
लक्ष न दिल्यास सिस्टायसिस कदाचित त्रासदायक होऊ शकतो, पण सहसा योग्य उपचारांनी तो सहज आणि प्रभावीपणे हाताळला जाऊ शकतो.