सायटोमेगॅलव्हायरस (सीएमव्ही) संक्रमण काय आहे?
सायटोमेगॅलव्हायरस (सीएमव्ही) चा संसर्ग हर्पिस ग्रुपशी संबंधित व्हायरसमुळे होतो. हे त्याच प्रकारचे व्हायरस असतात ज्यामुळे थंडे फोड, संसर्गजन्य मोनोन्यूक्लिऑसिस आणि चिकेनपॉक्स/शिंगल्स होतात. 80%-90% भारतीय लोकांमध्ये सीएमव्ही अँटीबॉडीजची उपस्थिती असल्याचे आढळते. हे सर्वसाधारणपणे विकसित आणि विकसनशील देशांमध्ये आढळतात. आणि हे खालीलप्रमाणे विभाजित केले जाऊ शकतेः
- संसर्गित सीएमव्ही.
- जन्मजात सीएमव्हीचा संसर्ग.
- पोस्टपरफ्युजन सिंड्रोम.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
बऱ्याच रुग्णांमध्ये लक्षणं विकसित होत नाहीत. जरी लक्षणं अस्तित्वात असली तरीही त्यांचे प्रकार आणि तीव्रता यात भिन्नता असते. गंभीर प्रकरणात नवजात बाळांचे जन्मवजन कमी असते, ताप, काविळसह हेपिटायटीस,आणि इतर रक्तस्त्रावाचे प्रकार आढळतात. लक्षात घेण्यासारखे विविध लक्षणे खालील प्रमाणे आहेत:
- बाळांमध्ये:
- वेळेपूर्वी जन्म.
- डोळा आणि त्वचा पिवळी होणे.
- यकृताचे प्रसरण.
- जांभळ्या रंगाचे पुरळ किंवा डाग.
- असामान्य लहान डोके.
- प्लीहावृद्धी (स्प्लिनोमेगली).
- न्यूमोनिया.
- कन्व्हलजन्स.
- प्रतिकार शक्ती कमकुवत असल्यास:
- डोळे, फुफ्फुस, यकृत, अन्न नलिका, पोट, आतडे आणि मेंदू सारख्या सर्व भागांवर परिणाम होतो.
- प्रौढांमध्ये:
- थकवा.
- ताप.
- घसा दुखणे.
- स्नायूंमध्ये वेदना.
याची मुख्य कारणं काय आहेत?
हे प्रामुख्याने मानवी सायटोमेगॅलोव्हायरसमुळे होते, ज्याला लसिका ग्रंथी व्हायरस देखील म्हणतात. एकदा शरीरात प्रवेश केल्यानंतर, ते बरेच वर्षे टिकून राहू शकते आणि पुन्हा सक्रिय होऊ शकते. हे विषाणू गंभीर समस्या उत्पन्न करू शकतात, विशेषकरुन रोगप्रतिकारक्षम रुग्णांमध्ये. संसर्गाच्या सुरुवातीला आणि आवर्तनानंतर ते गर्भावर प्रसारित होऊ शकते. पुनरुत्पादित संसर्गापेक्षा प्राथमिक संसर्गामुळे गर्भावर संसर्गा चा धोका जास्त असतो. संसर्गाची मुख्य वैशिष्ट्ये म्हणून विषाणूंमध्ये निष्क्रियता आणि विश्रांती कालावधीत आवर्तित झाल्याचे पाहिले जाऊ शकते.
शरीरातील द्रवांमध्ये विषाणू मिसळले गेल्याने संसर्ग होते जसे की:
- लाळ.
- मूत्र.
- रक्त.
- अश्रू.
- वीर्य.
- स्तनातील दूध.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
सामान्यतः, रुग्णाच्या वैद्यकीय इतिहासाची माहिती मागील कोणत्याही संसर्गाचे कारण समजण्यासाठी घेतली जाते. आयोजित टेस्टमध्ये खालील चाचण्या समाविष्ट आहेत:
- रक्त तपासणी.
- नवजात बाळांच्या लाळ किंवा मूत्राची चाचणी.
कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी एचआयव्ही संसर्गाची चाचणी केली जाऊ शकते.
सामान्यतः, प्रभावित व्यक्तिंना औषधांची आवश्यकता नसते. मुख्यतः दुर्बल प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी औषधे राखीव असतात. लक्षणांची काळजी घेण्यासाठी अँटी-व्हायरल औषधे दिली जाऊ शकतात. संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी संक्रमित शरीराच्या द्रवपदार्थांशी संपर्क टाळला जावा.
प्रतिबंधात्मक उपाय:
- चांगल्या गुणवत्तेच्या हँडवाश किंवा साबणाचा वापर करून हात स्वच्छता करा.
- अश्रू किंवा लाळ अशा शारीरिक स्रावांशी संपर्क टाळा.
- खाद्यपदार्थ आणि भांडी किंवा इतरांनी वापरलेल्या ग्लासमधून पेय घेणे टाळा.
- कचरा व शरीरातील स्रावांसह दूषित पदार्थांची योग्य विल्हेवाट केल्याची खात्री करा.
- मुलांचे खेळणी स्वच्छ ठेवा. मुलाची लाळ किंवा मूत्र यांच्याशी संपर्कात येणारा पृष्ठभाग स्वच्छ करा.
- सुरक्षित संभोगाची सवय करा.