सीएनएस उदासीनता काय आहे?
मेंदू आणि पाठीचा कणा किंवा स्पायनल कॉर्डद्वारे होणाऱ्या शरीराच्या नुरॉलॉजिकल क्रिया मंदावतात त्याला मध्यवर्ती मज्जासंस्थेची उदासीनता (सीएनएस) असे म्हणतात. सामान्यपणे सीएनएस उदासीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औषधांमुळे सीएनएस उदासीनता उद्भवू शकते. औषधांच्या या श्रेणीमध्ये मनःस्वास्थासाठी, उपशामक आणि ज्या मेंदूच्या ऍक्टिव्हिटीना मंद करतात अश्या पदार्थांचा समावेश असतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
सीएनएस उदासीनता लक्षणे खालील प्रमाणे आहेत:
- समन्वयाचा अभाव.
- अस्पष्ट बोलणे आणि बोलण्यात त्रास होणे.
- विचार व्यक्त करताना कठीण जाणे.
- थकवा.
- आळशीपणा.
- थोडा गोंधळ होणे.
- श्वास घेण्यात अडचण.
- ह्रदय गती मंदावणे (जर ती तीव्र नैराश्यात असेल तर).
- निर्णय घेण्यास अक्षमता.
- इतरांच्या सूचना किंवा शब्द समजून घेण्यात समस्या.
- आवश्यक असताना प्रतिसाद न देणे.
- वागणुकीत समस्या.
- संभाषण टाळणे.
गंभीर सीएनएस उदासीनतेच्या बाबतीत, व्यक्ती कोमाच्या स्थितीत जाऊ शकते. पुढच्या, सीएनएस उदासीनता घातक ठरु शकते.
याची मुख्य कारणं काय आहेत?
अमली पदार्थ सीएनएस उदासीनतेचे एक प्रमुख कारण आहे. या अमली पदार्थाचे न्यूरोट्रांसमीटर (मेंदूतीलरासायनिक संयुगे) वर प्रभाव पडतो, ज्याचा परिणाम म्हणजे मेंदूच्या क्रिया मंदावतात. सीएनएस उदासीनतेस असणारे सर्वात सामान्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- बार्बिटेरेट्स (हे औषध पटकन दिले जात नाही पण गंभीर चिंता असेल ती नियंत्रित करण्यासाठी किंवा सिएजर विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी डॉक्टर हे देऊ शकतात).
- झोपेची औषधे (नॉन-बेंजोडायजेपाइन झोपेची औषधे झोपेचे विकार किंवा त्रास असलेल्या व्यक्तींना दिली जातात. ह्यामुळे चिंता कमी होतात आणि ह्या औषधांचे दुष्परिणाम खूप कमी असतात).
- बेंजोडायजेपाइन्स (बेंझोडायझेपिनपासून तयार केलेली औषध चिंता, उदासपणा, अति तणाव प्रतिक्रिया आणि पॅनिक अटॅकचे उपचार करण्यासाठी दिले जातात. ते मेंदूचे कार्य शांत करतात. ह्यावर अवलंबून रहाणे किंवा सतत घेतल्याने व्यसन होऊ शकते म्हणून शक्यतो हे देणे टाळले जाते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
झोपेचे आणि चिंता मुळे होणाऱ्या त्रास जे माणसाच्या कार्य क्षमतेवर परिणाम करतात ते आटोक्यात आणण्यासाठी ह्यातले औषध दिले जातात.लक्षणे बघून त्यानुसार वैदयकीय निदनांमधून सिएनस उदासीनता कळते.
काही बाबतीत,डॉक्टर प्रतिसाद दर आणि एकाग्रता बघून मग लहान डोसच्या औषधा पासून सुरवात करतात. सीएनएस उदासीनताचे निदान करण्यासाठी रक्त तपासणी आणि सीटी स्कॅन देखील फायदेशीर ठरू शकतात.
लक्षणांची तीव्रता बघून हळूहळू डॉक्टर औषधांचे डोस कमी करू शकतात किंवा पूर्ण पणे बंद देखील करू शकतात. उपचार जास्त करून व्यक्ती का हे ड्रग्स घेत होता ह्यावर आधारित असतात.
याव्यतिरिक्त, अल्कोहोलिक पदार्थ घेणे टाळावे, कारण यामुळे तात्पुरता युफोरिया (आनंदीपणाची स्थिती) होऊ शकतो पण शेवटी केंद्रीय मज्जासंस्था मंदावते.