गर्भाशयाच्या बाहेर गर्भधारणा (इक्टोपिक प्रेग्नन्सी) काय आहे?
इक्टोपिक प्रेग्नन्सी ही एक अशी अवस्था आहे ज्यामध्ये प्रजननक्षम अंडी गर्भाशयाच्या बाहेर कुठेही रोपण होतात, सामान्यतः अंडनलिकेत किंवा क्वचितच अंडाशया मध्ये, ग्रीवा (सर्व्हीक्स) किंवा ओटीपोटात. अंडनलिका गर्भाशयाला जोडलेली एक लांब नलिका आहे जी अंडाशयापासून गर्भाशयाला जोडलेली असते आणि जी अंडाशयापासून गर्भाशयापर्यंत अंडी वाहत नेते. ती वाढणारी प्रजननक्षम अंडी धरून ठेऊ शकत नाही आणि त्यादरम्यान ती ताणली जाऊन फुटण्याची शक्यता आहे. सहसा यामध्ये गर्भ टिकत नाही आणि यामुळे आईच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे लवकर उपचार आवश्यक आहे.
इक्टोपिक प्रेग्नन्सीची होण्याची जागतिक सरासरी सुमारे 0.25-2% असून, प्रत्येक 161 गर्भधारणे पैकी एकाला ही होण्याची शक्यता असते.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
सामान्य गर्भधारणे दरम्यान, महिलांना सामान्यतः मळमळ आणि उलट्या या सारखी लक्षणे दिसून येतात. इक्टोपिक प्रेग्नन्सीची लक्षणे 4 ते 10 आठवड्यात दिसायला सुरुवात होते.
हइ काही सामान्य लक्षणे असू शकतात:
- पोटाच्या एकाबाजूला वेदना ज्याची तीव्रता आकस्मिक किंवा हळूहळू वाढू शकते. (अधिक वाचा: गर्भधारणादरम्यान पोटात वेदनेची कारणं)
- योनी रक्तस्त्राव जे सामान्य रक्तस्त्रावाच्या तुलनेत खूप जास्त किंवा कमी असू शकते आणि गडद रंगाचे (तपकिरी) आणि पाण्यासारखे असू शकते.
- अशक्तपणा.
काही वेळेस, इक्टोपिक प्रेग्नन्सीमुळे अंडनलिकेचे विघटन होऊ शकते आणि अतिरिक्त लक्षणं दिसू शकतात:
- जास्त प्रमाणात रक्तस्त्राव.
- खांद्याच्या टोकावर वेदना.
- लघवी किंवा मलविसर्जना दरम्यान वेदना.
- चक्कर येणे.
- घाम येणे.
- पांढरे पडणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
याचे मुळ कारण अजून समजले नाही आहे. खालील कारणे इक्टोपिक प्रेग्नन्सी होण्याचा धोका वाढवू शकतात:
- 40 वर्षापेक्षा अधिक वय.
- ओटीपोटाच्या शस्त्रक्रियेचा इतिहास, पेल्व्हीक शस्त्रक्रिया ज्यामध्ये नळी बांधण्यात येते (गर्भधारणा टाळण्यासाठी) आणि पेल्व्हीक इन्फ्लेमेटरी डिसीज.
- अंडनलिकेला कुठल्याही प्रकारची दुखापत
- मागील इक्टोपिक प्रेग्नन्सी.
- जन्म नियंत्रक गोळ्या किंवा इंट्रायूटरिन उपकरण.
- प्रजनन औषधं.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
गर्भधारणादरम्यान तुम्हाला वरील कोणत्याही लक्षणांचा अनुभव आल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या (स्त्री रोग विशेषज्ञ). वेदनेचे ठिकाण आणि त्यातील कोमलता जाणून घेण्यासाठी तुमचे डॉक्टर तुमच्या ओटीपोटाच्या खाली (पेल्व्हीस) शारीरिक तपासणी करतील. इक्टोपिक प्रेग्नन्सीची खात्री करण्यासाठी गर्भाशयाचे अल्ट्रासाऊंड स्कॅन आणि गर्भधारणेची चाचणी केले जाते. एचसीजी (HCG) आणि प्रोजेस्टेरॉन सारख्या गर्भावस्थेच्या हार्मोनच्या स्तराचे देखील निरीक्षण केले जाते.
सध्या उपलब्ध उपचारांमध्ये औषधे आणि शस्त्रक्रियांचा समाविष्ट आहे. जर नलिका फुटून, त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाला असेल, तर लॅपरोटॉमी नावाची एक शस्त्रक्रिया केली जाते.
इक्टोपिक प्रेग्नन्सी नंतर भविष्यातील गर्भधारणेची शक्यता कमी होऊ शकते, पण जर अंडनलिका खराब झाली नसेल तर अजूनही चांगली शक्यता आहे.