डोळ्यातील चिपाड काय आहे?
डोळ्याचे संरक्षण होण्यासाठी आणि त्याचे कार्य व्यवस्थित चालावे म्हणून आपले डोळे काही प्रमाणात म्युकस (श्लेष्म) सतत निर्माण करत असतात. प्रत्येकवेळी पापण्याची उघडझाप होताना हा म्युकस पातळ थराच्या स्वरुपात बाहेर टाकला जातो. माणूस झोपलेला असताना पापण्यांची उघडझाप होत नसल्याने हा म्युकस साठून राहतो आणि डोळ्याच्या किंवा पापण्यांच्या कडेला पापुद्र्याच्या स्वरुपात जमा होतो. पारदर्शी किंवा पांढर्या रंगाचे हे चिपाड जरी चांगले दिसत नसले तरी ते नेहेमी असे जमा होतेच. परंतु अति प्रमाणात चिपाड जमा होणे किंवा त्याचा रंग बदलणे (हिरवट किंवा पिवळट) हे योग्य मानले जात नाही.
याच्याशी निगडीत प्रमुख चिन्हे आणि लक्षणे कोणती आहेत?
डोळ्यातील चिपाडाची चिन्हे आणि लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
- डोळ्यात पस किंवा चिपाड (पिवळट किंवा हिरवट रंगाचे) जमा होणे.
- पापण्या किंवा पापण्यांच्या केसांवर सुकलेला पस जमा होणे.
- झोपेतून उठल्यावर पापण्यांच्या केसांना चिकटपणा जाणवणे किंवा त्या एकत्र चिकटणे.
- डोळ्यातील पांढरा भाग गुलाबी किंवा लालसर होणे (हे होतेच असे नाही). (वाचा: डोळे लालसर होणे)
- पापण्यांना सूज येणे हे सामन्यताः दिसून येते.
गंभीर प्रकारात खालील लक्षणे दिसण्याची शक्यता असते:
- 104°F पेक्षा जास्त ताप.
- डोळे अतिशय दुखणे आणि पापण्या सुजणे किंवा लाल होणे.
- दृष्टी धूसर होणे. (वाचा: धूसर दृष्टीवरील उपचार)
याची प्रमुख कारणे काय आहेत?
डोळ्यात चिपाड जमा होण्यामागची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
- सामान्य स्वरूपात चिपाड जमा होणे. अस्वच्छ हातांवरील इरिटण्ट्स डोळ्यात गेल्यामुळे थोड्याफार प्रमाणात क्रीम रंगाचा कोरडा म्युकस फक्त डोळ्याच्या कडेला जमा होते.
- अश्रु नलिकेत अडथळा निर्माण होणे.
- कंजंक्टीव्हायटीस – जीवाणुजन्य, अॅलर्जीक, किंवा विषाणूजन्य.
- केरॅटीसिस.
- ब्लेफॅरिटीस.
- डोळ्यांना इजा होणे.
- डोळ्यात बाहेरील कचरा जाणे.
- पापणीचा सेल्युलायटीस हा गंभीर प्रकार आहे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
सुरुवातीला डॉक्टर तुमच्या लक्षणांचा पूर्व इतिहास विचारून घेतील आणि मगचं तुमच्या डोळ्यांची काळजीपूर्वक तपासणी करतील.
डोळ्यातील चिपाडांवरील उपचार त्याच्या कारणांवर अवलंबून असतो. त्यावरील विविध उपचार पुढीलप्रमाणे आहेत:
- कापूस ओला करून कोमट पाण्याने डोळ्यातील चिपाड किंवा पस स्वच्छ करावा. स्वच्छता झाल्यावर कापूस काळजीपूर्वक डिस्पोज करावा आणि परत संसर्ग होऊ नये म्हणून हात स्वच्छ धुवावेत.
- डोळ्यांना किंवा पापण्यांना सतत हात लावू नये तसेच डोळ्यांचा मेकअप टाळावा.
- सांसर्गित प्रकारात अँटीबायोटिक किंवा अँटीव्हायरल आय ड्रॉप्स सुचवले जातात.
- जास्त प्रमाणात चिपाड डोळ्यात जमा होत असल्यास त्या व्यक्तीने कॉनटॅक्ट लेन्स वापरू नयेत. त्याऐवजी चष्म्याचा वापर करावा.