गर्भधारणेमधील मधुमेह म्हणजे काय?
गर्भधारणेमधील मधुमेह ही सामान्य स्थिती 100 पैकी 7 महिलांमध्ये दिसून येते. स्त्रियांच्या रक्तामधील सामान्य शुगरचे प्रमाण गर्भधारणेदरम्यान ग्लूकोज मुळे वाढते. बऱ्याच महिलांमध्ये गर्भधारणेदरम्यान हार्मोन्स च्या बदलांमुळे प्रमाण वाढते.
याची प्रमुख चिन्हे व लक्षणे काय आहेत?
बऱ्याच वेळेस गर्भधारणेमधील मधुमेहामध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. हे बदल इतके सामान्य असतात की बऱ्याच महिला ते ओळखू शकत नाहीत. तसेच शरीरामध्ये सामान्य गर्भधारणे मध्ये अनेक बदल होत असतात. तरी तुम्ही खालील गोष्टी पाहिल्या तर खबरदारी घ्यावी:
- मुत्रविसर्जनाची वाढती गरज.
- विनाकारण तहान लागल्याची जाणीव होणे.
- सारखे होणारे संसर्ग जे उपचारांनी बरे होत नाहीत.
- थकवा.
- मळमळ.
याची प्रमुख कारणं काय आहेत?
काहीवेळा महिलांमध्ये निदान न झालेला मधुमेह असतो, ज्याचे निदान गर्भधारणेदरम्यान होते. मुख्यतः हार्मोन्स च्या बदलांमुळे रक्तातील शुगरचे प्रमाण वाढते. प्लॅसेंटा, जे गर्भाच्या वाढीसाठी मदत करते, तेच महिलांच्या शरीरात हार्मोन्स तयार करते. हे हार्मोन्स मुख्यतः ग्लूकोज चे प्रमाण वाढवतात. ज्या महिलांना आधीच मधुमेहाचा धोका असतो, त्यांना गर्भधारणेदरम्यान मधुमेह होण्याचा धोका वाढतो. ज्या महिला स्थूल, मधुमेहाचा इतिहास असणाऱ्या, कुटुंबातील मधुमेहाचा इतिहास असणाऱ्या, उच्च रक्तदाब असणाऱ्या किंवा थायरॉइड चा त्रास असणाऱ्या व इतर यांसाठी धोका जास्त असतो.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
गर्भधारणेदरम्यान जन्मपूर्व व जन्मानंतरच्या चाचण्यांमध्ये रक्तातील शुगरची पातळी तपासली जाते. हे एका चाचणी मध्ये केले जाते, ज्यामध्ये तुम्हाला साखर युक्त द्रव्य प्यायला दिले जाते आणि तुमच्या रक्तातील शुगरचे प्रमाण तपासले जाते. याला तोंडावाटे केलेली ग्लूकोज ची तपासणी म्हणतात. तसेच एक रक्ताचा नमुना घेऊन त्याद्वारे शुगरचे प्रमाण तपासले जाते, त्यानंतर विशिष्ट ग्लूकोज तपासणी केली जाते.
या उपचाराचे मुख्य उद्दिष्ट हेच असते की शुगरचे प्रमाण सामान्य करणे. हे आहारातील बदल व नियमित व्यायामाने साध्य केले जाते. जर आहारातील बदलांमुळे काही फरक पडत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने मेटामॉर्फिन किंवा इन्सुलिन सारखी औषधे घेऊ शकता. रक्तातील शुगरची योग्य व नियमित तपासणी ही संपूर्ण गर्भधारणेमध्ये व नंतर आवश्यक असते.