गलगंड (गॉइटर) काय आहे?
गलगंड (गॉइटर), ज्याला आयोडीन डेफिशियन्सी डिसीज म्हणूनही ओळखले जाते, हे थायरॉईड ग्रंथीची असामान्य वाढ आहे. गलगंड (गॉइटर) चे मुख्य कारण आयोडीनची कमतरता आहे. आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉईड ग्रंथी थायरॉक्साइन हार्मोन तयार करण्यास असमर्थ ठरतात, ज्यामुळे थायरॉईड स्टीम्युलेटिंग हार्मोन (टीएसएच-THS) ची पातळी वाढते, परिणामी थायरॉईड ग्रंथी सुजतात ज्याला गलगंड (गॉइटर) म्हणतात.
गलगंड (गॉइटर) हा दोन प्रकारचा असतो,ते म्हणजे:
- डिफ्यूज गॉइटर: संपूर्ण थायरॉईड ग्रंथी वाढलेली असते.
- नोड्यूलर गोइटर: थायरॉईड ग्रंथीचे काही भाग किंवा नोड्यूल (गाठ) वाढलेले असते.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
गलगंड (गॉइटर) ची लक्षणे वेगवेगळी असतात मुख्यतः स्थितीवर आधारित असतात:
- गलगंड (गॉइटर) च्या सर्वात सामान्य लक्षण:
- मानेच्या पायथ्याशी सूज.
- इतर लक्षणांमध्ये हे असू शकतं :
- गळा आवरून येणे.
- आवाज खरखर करणे.
- खोकला.
- वाढलेली थायरॉईड ग्रंथी इसोफॅगस किंवा अन्न नलिकेवर दाब टाकल्यामुळे अन्न गिळण्यात समस्या.
- श्वासनलिकेवर दाब आल्याने श्वास घेण्यात समस्या.
- हायपरथायरॉईडीझम शी संबंधित लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे:
- उष्णता सहन न होणे.
- वजन कमी होणे.
- वाढलेली भूक.
- हायपोथायरॉईडीझमशी संबंधित लक्षणेंमध्ये हे समाविष्ट आहे:
- वजन वाढणे.
- थंडी सहन न होणे.
- बद्धकोष्ठता.
- त्वचा कोरडी होणे.
- थकवा.
याची मुख्य कारणं काय आहेत?
गलगंड (गॉइटर) च्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक आयोडीनची कमतरता आहे.
आयोडीनची कमतरता आहारातील कमी आयोडीनमुळे होऊ शकते, कोबी, फ्लावर, आणि ब्रोकोली सारख्या आयोडीनचे निराकरण करणारे खाद्य पदार्थांचा वापर केल्याने आयोडीनची कमतरता होऊ शकते.
- इतर कारणांमध्ये समाविष्ट आहे:
- हायपरथायरॉईडीझम - उच्च थायरॉईड हार्मोन पातळी.
- हायपोथायरॉईडीझम - थायरॉईड हार्मोनचा निम्न स्तर.
- ग्रेव्स डिसीज - थायरॉईड सेलद्वारे थायरॉईड हार्मोनचे वाढलेले उत्पादन.
- हाशिमोतोचा रोग - रोगप्रतिकारक प्रणालीतील असामान्यता यामुळे थायरॉईड ग्रंथीस नुकसान झाले.
- थायरॉईड कर्करोग.
- लिथियम आणि फेनिलबुटाझोन सारख्या काही औषधांमुळे गलगंड (गॉइटर) होऊ शकतात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
शारीरिक तापासणीसोबत काही तपासण्या गलगंड (गॉइटर) चे निदान करण्यात मदत करते.
तपासणी मध्ये समाविष्ट आहे :
- थायरॉईड हार्मोनची पातळी मोजण्यासाठी रक्त तपासणी.
- हाशिमोतो आणि ग्रेव्स रोगासाठी अँटीबॉडीज ओळखण्यासाठी रक्त तपासणी.
- अल्ट्रासाऊंड स्कॅन.
- मॅग्नेटिक रेसोनान्स इमेजिंग (एमआरआय-MRI) किंवा कंप्युटराइस टोमोग्राफी (सीटी-CT) स्कॅन.
- बायोप्सी.
- थायरॉईड च्या कार्याचे मूल्यांकन करण्यासाठी हार्मोन ची चाचणी.
गलगंड (गॉइटर)चा उपचार गॉइटर कारण, लक्षणे आणि आकारावर अवलंबून असतो.
- सामान्य थायरॉईड हार्मोन पातळीसह सौम्यपणे वाढलेले थायरॉईड ग्रंथी अवलोकना साठी ठेवले जाऊ शकते.
- असामान्य थायरॉईड क्रियेसाठी डॉक्टर औषधे सुचवू शकतात.
- गरज असल्यास आयोडीन च्या पातळी चे व्यवस्थापन करण्यासाठी आयोडीन पुरके दिली जाऊ शकतात.
- तुमचे डॉक्टर तुम्हाला जास्त सक्रिय थायरॉईडसाठी तोंडावाटे रेडिओएक्टिव थायरॉईड थेरपी घेण्याचा सल्ला देऊ शकतात.
- कर्करोगाच्या बाबतीत किंवा खूप मोठ्या गलगंड (गॉइटर) च्या बाबतीत, रेडिओॲक्टिव्ह थायरॉईड उपचारासोबत शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते.